Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘…आता फिल्मफेअर अवॉर्डही गुजरातला पळवला’; राज्य सरकारवर जयंत पाटील आक्रमक, ट्वीट व्हायरल

बॉलीवूडमधील मानाचा समजला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार देखील गुजरातमध्ये होणार आहे. यामुळे पुन्हा एकदा वादंग निर्माण झाला असून राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेते जयंत पाटील यांनी फिल्मफेअर पुरस्काराबद्दल ट्वीट केले.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 16, 2024 | 07:07 PM
‘…आता फिल्मफेअर अवॉर्डही गुजरातला पळवला’; राज्य सरकारवर जयंत पाटील आक्रमक, ट्वीट व्हायरल
Follow Us
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प हे गुजरातची वाट धरत आहेत. यामुळे महाराष्ट्राचे मोठे अर्थिक नुकसान होत आहे. याबाबत विरोधक देखील राज्य सरकारवर (State Govt) ताशेरे ओढत आहेत. अनेक उद्य़ोग तर शेजारच्या राज्यात जात असताना बॉलीवूडमधील (Bollywood) मानाचा समजला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार (Filmfare Award) देखील गुजरातमध्ये (Gujarat) होणार आहे. यामुळे पुन्हा एकदा वादंग निर्माण झाला असून राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी फिल्मफेअर पुरस्काराबद्दल (69th Filmfare Award) ट्वीट केले.

जयंत पाटील यांनी आपल्या ऑफिशियल अकाऊंटवरुन 69 वा फिल्मफेअर पुरस्कार गुजरातला गेल्यावर नाराजी व्यक्त केली आहे. जयंत पाटील यांनी लिहिले आहे की, “मुंबईला कमजोर करण्याचा हा घ्या आणखीन एक पुरावा! दरवर्षी मुंबईत होणारा मानाचा अवॉर्ड आता गुजरातच्या गांधीनगर गिफ्ट सिटी येथे होणार आहे. आधी महाराष्ट्रातून प्रकल्प पळवले गेले, डायमंड व्यवसाय पळवला गेला. आता फिल्मफेअर अवॉर्डही पळवला गेला आहे.” अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

पुढे त्यांनी लिहिले, “बॉलिवूड हे मुंबईचे अविभाज्य घटक आहे. बॉलिवूडला मुंबईची आर्थिक नाडी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे फिल्मफेअर अवॉर्ड गुजरातला हलवून मुंबईच्या आणखी एका आर्थिक स्त्रोतावर हात मारण्याचे पहिले पाऊल टाकले गेले आहे. मुख्यमंत्री महोदय यावर काय उत्तर द्याल?” असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

मुंबईला कमजोर करण्याचा हा घ्या आणखीन एक पुरावा! दरवर्षी मुंबईत होणारा मानाचा @filmfare अवॉर्ड आता गुजरातच्या गांधीनगर गिफ्ट सिटी येथे होणार आहे. आधी महाराष्ट्रातून प्रकल्प पळवले गेले, डायमंड व्यवसाय पळवला गेला. आता फिल्मफेअर अवॉर्डही पळवला गेला आहे. बॉलिवूड हे मुंबईचे… — Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) January 16, 2024

बॉलीवूडमधील महत्त्वाचा मानला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार दरवर्षी मुंबईमध्येच केला जातो. फक्त 2020 साली तो गुवाहटीमध्ये पार पडला होता. त्याव्यतिरिक्त फिल्मफेअर हा नेहमी महाराष्ट्रामध्ये पार पडतो. मात्र यंदाचा 69 वा ह्युंडाई फिल्मफेअर पुरस्कार सोहळा गुजरातच्या गांधीनगर गिफ्ट सिटी येथे 27 आणि 28 जानेवारी रोजी होणार आहे. गुजरात टुरिझमच्या सहकार्याने हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. पण मुंबईमध्ये दरवर्षी रंगणार हा सोहळा या वर्षी गुजरातमध्ये होणार असल्यामुळे विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

Web Title: Filmfare awards in gujarat jayant patil x post agaisnt maharashtra state government nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2024 | 07:06 PM

Topics:  

  • jayant patil

संबंधित बातम्या

फडणवीस-जयंत पाटील यांचा एकाच विमानातून प्रवास; राजकीय चर्चांना उधाण, गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य
1

फडणवीस-जयंत पाटील यांचा एकाच विमानातून प्रवास; राजकीय चर्चांना उधाण, गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.