Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फडणवीस-जयंत पाटील यांचा एकाच विमानातून प्रवास; राजकीय चर्चांना उधाण, गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य

देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांच्या एकाच विमानातील प्रवासाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यावर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया देत या प्रवासाचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नसल्याचं सूचित केलं.

  • By विवेक
Updated On: Aug 09, 2026 | 07:29 PM
Gulabrao Patil

Gulabrao Patil

Follow Us
Follow Us:
  • फडणवीस-जयंत पाटील यांचा एकाच विमानातून प्रवास 
  • “विमानातून प्रवास करायला मनाई आहे काय?” असा गुलाबराव पाटलांचा टोला
  • पंतप्रधानांकडे भेटीसाठी वेळ मागितल्यास वेळ मिळेल, उद्धव ठाकरेंनाही प्रत्युत्तर
 

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विविध घडामोडींमुळे चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी एकाच विमानातून प्रवास केल्याची माहिती समोर आली. या प्रवासामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.

या चर्चांवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. विमानातून प्रवास करणं ही सामान्य बाब असल्याचं सांगत त्यांनी या प्रवासाचा राजकीय अर्थ काढण्यावर प्रश्न उपस्थित केला.

‘विमानातून प्रवास करायला काय मनाई आहे?’

गुलाबराव पाटील यांनी म्हटलं की, विमानातून कोणताही नेता प्रवास करू शकतो. “विमानामध्ये काय कोणीही प्रवास करू शकतो. माझ्यासोबत राहुल गांधीदेखील प्रवास करू शकतात. प्रवास करायला काय मनाई आहे का?” असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे केवळ एकाच विमानातून प्रवास केला म्हणून राजकीय समीकरणांबाबत निष्कर्ष काढणं योग्य नसल्याचं त्यांनी सूचित केलं.

मनोज जरांगेंच्या ‘आमदार पाडू’च्या इशाऱ्यावर प्रवीण दरेकरांचं थेट चॅलेंज; म्हणाले, ‘उमेदवार उभे करा, क्षमता सिद्ध करा’

अमित शाह-सुनेत्रा पवार भेटीवरही भाष्य

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट झाली नसल्याच्या चर्चेवरही गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. अमित शाह यांचा कार्यक्रम व्यस्त असल्यामुळे भेट होऊ शकली नसेल, असं त्यांनी सांगितलं. एखाद्या कार्यक्रमादरम्यान एखाद्या नेत्याची भेट झाली नाही म्हणून त्याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नसल्याचंही पाटील म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर

दरम्यान, काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या सहा खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती.

सुप्रिया सुळेंची पंतप्रधान मोदींशी भेट; राजकीय चर्चांना संजय राऊतांनी दिलं स्पष्टीकरण, ‘कोणीही महाविकास आघाडी…’

उद्धव ठाकरेंच्या या टीकेला उत्तर देताना गुलाबराव पाटील यांनी पंतप्रधानांचा कार्यक्रम ठराविक वेळापत्रकानुसार चालतो, असं म्हटलं. “देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांचा मिनिट टू मिनिट कार्यक्रम असतो. ज्यांना वेळ दिलेली असते, त्यांना ते भेटतात,” असं ते म्हणाले. तसंच उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधानांकडे भेटीसाठी वेळ मागावी, त्यांनाही भेटीसाठी वेळ मिळेल, असा टोला त्यांनी लगावला.

बारामतीतील विमान अपघातावर चिंता

बारामतीमध्ये पुन्हा विमान अपघात झाल्याच्या घटनेवरही गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. अशा घटना घडणं योग्य नसल्याचं सांगत विमान वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजनांचा आढावा घेण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं. भारतीय विमान प्राधिकरणाने अशा घटनांची नोंद घेऊन त्यामागील कारणांचा अभ्यास करावा आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली.

Web Title: Devendra fadnavis jayant patil same flight gulabrao patil reaction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 07:27 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Gulabrao Patil
  • jayant patil

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा
1

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
2

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, बांधावर जा, पंचनामे करा’, एकनाथ शिंदेंनी दिल्या मंत्र्यांना सूचना
3

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, बांधावर जा, पंचनामे करा’, एकनाथ शिंदेंनी दिल्या मंत्र्यांना सूचना

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली उपसमिती तर मंत्र्यांना बांधावर जाण्याचे आदेश
4

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली उपसमिती तर मंत्र्यांना बांधावर जाण्याचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.