Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: नेवासे नगरपंचायतीत आर्थिक घोटाळा? मुख्याधिकाऱ्यांची चौकशी करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

उपनगराध्यक्षा शालिनी सुखधान यांच्यासह नगरसेवकांनी नेवासे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी निखिल फराटे यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 19, 2026 | 03:26 PM
Ahilyanagar News: नेवासे नगरपंचायतीत आर्थिक घोटाळा? मुख्याधिकाऱ्यांची चौकशी करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
Follow Us
Close
Follow Us:

नेवासे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी निखिल फराटे यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करत उपनगराध्यक्षा शालिनीताई सुखधान यांच्यासह नगरसेवकांनी त्यांच्या आर्थिक गैरकारभाराची सखोल चौकशी करून तातडीने कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. याबाबतचे निवेदन जिल्हा सहआयुक्त नगरपालिका प्रशासन विभाग यांना निवेदन देण्यात आले आहे.

मुख्याधिकारी फराटे यांनी पदभार स्वीकारल्यापासून कार्यालयात वेळेवर उपस्थित राहत नसून नागरिकांच्या कामांकडे दुर्लक्ष करत आहेत. फोनवर संपर्क साधल्यास ते जिल्हाधिकारी कार्यालयात असल्याचे सांगितले जाते, मात्र प्रत्यक्षात तेथेही ते अनुपस्थित असल्याचे समोर आले. नगरपंचायतीतील सदस्यांनी वारंवार मागणी करूनही सभांचे इतिवृत्त व ठराव उपलब्ध करून दिले जात नसल्याचा आरोप करण्यात आला. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ तसेच २५ जानेवारी २०१८ च्या शासन निर्णयानुसार ही माहिती नागरिकांसाठी खुली ठेवणे बंधनकारक असताना त्याचे उल्लंघन होत असल्याचे निवेदनात नमूद आहे.

Ahilyanagar News: निपुत्रिक महिलांना मी मूल देतो! असं म्हणणाऱ्या वडगावपानच्या गडगेबाबाला अटक, तिघे फरार

जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देतांना उपनगराध्यक्षा शालिनी सुखधान यांच्यासह जयश्री शिंदे, जितेंद्र कुडे, संभाजी धोत्रे, सागर मापारी, शहीदाबी पठाण, सोनल चव्हाण, नसरीन शेख, शोभा व्यवहारे, प्रतिभा गवळी, राजेंद्र काळे उपस्थित होते.

पाईपलाईन दुरुस्तीवर ७ महिन्यांत ४० लाख खर्च

३१ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या प्रशासकीय सभेच्या इतिवृत्तामध्ये १२ विषय मंजूर झाल्याची माहिती असूनही ती अधिकृतपणे देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने संशय निर्माण झाला आहे. शहरात पाईपलाइन दुरुस्तीवर अवघ्या ७ महिन्यांत सुमारे ४० लाख रुपये खर्च झाल्याचे दाखवले जात असताना नागरिकांना पाण्यासाठी ७ दिवस प्रतीक्षा करावी लागली.

दोषींवर कारवाई करा; अन्यथा आंदोलन

याप्रकरणी लवकरात लवकर चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला. शुक्रवारी दि. १७ एप्रिल रोजी उपनगराध्यक्ष शालिनीताई सुखधान व नगरसेवकांच्या वतीने मुख्याधिकारी फराटे यांच्या गैरकारभाराची चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाहीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

Sambhajinagar : पिण्याच्या पाण्यासाठी वणवण; टँकर प्रस्तावाकडे प्रशासनाकडून होतेय दुर्लक्ष, ग्रामस्थांनी दिला आंदोलनाचा इशारा

प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?

याशिवाय मुख्याधिका-यांकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून अनधिकृत कामे करून घेतली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. नगराध्यक्षांच्या पदग्रहण सोहळ्याच्या अनधिकृत पत्रिका प्रसारित झाल्याच्या प्रकरणातही कारवाई करण्यात आलेली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

Web Title: Financial irregularities alleged in nevasa nagar panchayat inquiry demand raised

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News

संबंधित बातम्या

Kalyan : निष्ठावान कार्यकर्ते डावलले जातात, छाया वाघमारे यांची खंत
1

Kalyan : निष्ठावान कार्यकर्ते डावलले जातात, छाया वाघमारे यांची खंत

IPL 2026: काय हा प्रकार? SRH च्या विजयापेक्षा Kavya Maran च्या ‘त्या’ कृतीचीच चर्चा! Dhoni च्या फॅन्सना डिवचलं? पाहा Video
2

IPL 2026: काय हा प्रकार? SRH च्या विजयापेक्षा Kavya Maran च्या ‘त्या’ कृतीचीच चर्चा! Dhoni च्या फॅन्सना डिवचलं? पाहा Video

50000 रुपयांपेक्षा जास्त रकमेचा चेक देताय? ‘हे’ काम नक्की करा नाहीतर Payment अडकणार; पाहा RBI चा नवीन नियम
3

50000 रुपयांपेक्षा जास्त रकमेचा चेक देताय? ‘हे’ काम नक्की करा नाहीतर Payment अडकणार; पाहा RBI चा नवीन नियम

Pune fertilizer Scam : युरिया साठ्यातील तफावत भोवली; पुणे जिल्ह्यातील १५ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित
4

Pune fertilizer Scam : युरिया साठ्यातील तफावत भोवली; पुणे जिल्ह्यातील १५ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.