Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune fertilizer Scam : युरिया साठ्यातील तफावत भोवली; पुणे जिल्ह्यातील १५ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

Pune Fertilizer Scam : पुणे जिल्ह्यात पॉस मशीनवरील नोंदी आणि प्रत्यक्ष साठ्यात मोठा घोटाळा समोर आला आहे. याअंतर्गत १५ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले. यामुळे खत विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 19, 2026 | 04:17 PM
Pune Fertilizer Scam

Pune Fertilizer Scam

Follow Us
Follow Us:
  • युरिया साठ्यातील तफावत भोवली
  • पुणे जिल्ह्यातील १५ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित
  • खत विक्रेत्यांमध्ये खळबळ
पुणे/आकाश ढुमेपाटील : एक मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे. पुण्यात पॉस (POS) मशीनवरील नोंद आणि गोदामातील प्रत्यक्ष साठा यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळली आहे. यामुळे पुणे (Pune) जिल्ह्यातील १५ कृषी सेवा केंद्रांचे परवाने जिल्हा अधीक्षक कृषी विभागाने निलंबित केले आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावर करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे खत विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

हे देखील वाचा : निकोप स्पर्धेमुळेच पुणे परिमंडलाची कामगिरी झळकली; डॉ. भूजंग खंदारे यांच्याकडून कौतुक

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी ही माहिती दिली. निलंबित करण्यात आलेल्या केंद्रांमध्ये दौंड (Daund)तालुक्यातील सर्वाधिक ७ केंद्रांचा समावेश आहे. १ एप्रिलपासून जिल्हाभरात युरिया खताच्या साठ्याची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान सुमारे ३५०० टन युरियाचा साठा केवळ कागदावर (पॉस प्रणालीत) असल्याचे समोर आले, जो प्रत्यक्षात विक्री होऊनही प्रणालीतून कमी करण्यात आला नव्हता. यामुळे खताच्या पुरवठा नियोजनात अडथळा येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तालुकानिहाय निलंबित कृषी सेवा केंद्रे:

  • दौंड: अदिती कृषी सेवा केंद्र (लिंगाळी), बळीराजा ॲग्रो एजन्सी (देऊळगाव राजे), शिवकृपा ॲग्रो एजन्सी (पिंपळगाव), नंदाई ॲग्रो सर्व्हिसेस (नंदादेवी), बिरोबा कृषी सेवा केंद्र (बिरोबावाडी), श्रीराम कृषी भंडार (हिंगणी बेर्डे), श्रीनाथ ॲग्रो सर्व्हिसेस (राहू).
  • इंदापूर: महेश फर्टिलायझर (आगोती नंबर १), गणेश ॲग्रो एजन्सी (कळस).
  • जुन्नर: विघ्नहर कृषी सेवा केंद्र (नारायणगाव), कृषी शक्ती ॲग्रो एजन्सी (जुन्नर).
  • शिरूर: विघ्नहर्ता कृषी सेवा केंद्र (मांडवगण फराटा).
  • भोर: श्री भैरवनाथ शेती भांडार (वेळू).
  • आंबेगाव: शेतकरीराजा कृषी उद्योग (गावडेवाडी).

खत विक्रीवर बंदी, शेतकऱ्यांना आवाहन

ज्या १५ केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, त्यांना निलंबन कालावधीत सर्व प्रकारच्या खतांची विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी देखील या केंद्रांकडून खते खरेदी करू नयेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. पॉस मशीनवर साठा अद्ययावत न ठेवणे आणि प्रत्यक्ष साठ्यात तफावत ठेवणे ही गंभीर बाब असून, यापुढेही अशी तपासणी मोहीम सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हे देखील वाचा : महिला आरक्षण विधेयकावरून हिंगोली तापले! काँग्रेसविरोधात शिंदे गटाची जोरदार घोषणाबाजी

Web Title: Pune fertilizer scam 15 agri centers licenses suspended

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 04:17 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • Daund
  • Marathi News
  • pune news

संबंधित बातम्या

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
1

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….
2

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….

MUMBAI News: मनसेच्या ‘मराठी मानाची दहीहंडी’चा जल्लोष, दिवंगत मराठी नेते अन् कलाकारांच्या आठवणींना उजाळा
3

MUMBAI News: मनसेच्या ‘मराठी मानाची दहीहंडी’चा जल्लोष, दिवंगत मराठी नेते अन् कलाकारांच्या आठवणींना उजाळा

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार
4

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.