Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्जत तालुक्यातील कंपनीला भीषण आग; लाखोंचे नुकसान

कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथील प्रविण ॲग्रो कोल कंपनीमध्ये भीषण आग लागली. या आगीत ब्रिकेट मशीनसह इतर साहित्य जळून खाक झाले. त्यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 05, 2022 | 01:52 PM
कर्जत तालुक्यातील कंपनीला भीषण आग; लाखोंचे नुकसान
Follow Us
Close
Follow Us:

कर्जत : कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथील प्रविण ॲग्रो कोल कंपनीमध्ये भीषण आग लागली. या आगीत ब्रिकेट मशीनसह इतर साहित्य जळून खाक झाले. त्यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, निमगाव डाकू येथील शेतकरी गोरख इंगळे व प्रविण इंगळे यांनी दहा वर्षांपासून प्रविण ॲग्रो कोल कंपनी चालवित आहेत. या कंपनीमार्फत ते पुणे, नगर व कुमकुम येथील एमआयडीसीला बाॅयलरसाठी लागणारे ब्रिकेट पुरविण्याचे काम या कंपनीमार्फत करीत आहेत.

या कंपनीचे संचालक प्रविण इंगळे हे पुणे येथे गेले होते. तर गोरख इंगळे हे जामखेड येथे लग्नाला गेले होते. दुपारी अचानक शाॅकसर्किट होऊन कंपनीत आग लागून पेट घेतला. वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात आग लागली. या आगीचा भडका मोठ्या प्रमाणात उडाला. त्यामुळे बचावकार्यात अडचणी येत होत्या. इंगळे पिता-पुत्रांना ही वार्ता कळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आगीने बरेच भस्म केले होते.

कर्जत नगर पंचायत, करमाळा नगरपरिषदचे अग्निशमक बंब दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण फारसे यशस्वी होऊ शकले नाहीत. या आगीत ब्रिकेट मशीनसह बग्याज, कच्चे साहित्य याशिवाय तयार झालेले ब्रिकेट यासह शेडचे मोठ्या प्रमाणात जळून गेल्याने मोठे नुकसान झाले. प्रवीण इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक कोटी दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

आगीची माहिती समजताच आमदार रोहित पवार यांच्या कार्यालयातील कर्मचारी संजय म्हस्के यांनी कर्जत, करमाळा, जामखेड व आष्टी तालुक्यातील अग्निशामक यंत्रणा यांना सुचना देऊन तातडीने आग आटोक्यात आणण्यासाठी रवाना केल्या तर शिवाजी फाळके व सचिन घुले यांनी घटनास्थळी दाखल होवून इंगळे कुटुंबाला धीर दिला.

Web Title: Fire in karjat taluka company heavy loss nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2022 | 01:52 PM

Topics:  

  • ahmednagar
  • maharashtra
  • आग

संबंधित बातम्या

कोराडी प्लांटमध्ये कोळशाचा तुटवडा, महाराष्ट्र राज्य खाण महामंडळाकडून सशर्त निविदा प्रक्रिया पूर्ण
1

कोराडी प्लांटमध्ये कोळशाचा तुटवडा, महाराष्ट्र राज्य खाण महामंडळाकडून सशर्त निविदा प्रक्रिया पूर्ण

Nashik News : अवकाळीने बिघडवले उन्हाळ कांद्याचे गणित, 9 दिवसात 1 हजार हेक्टरवरील अधिक रोपे नष्ट
2

Nashik News : अवकाळीने बिघडवले उन्हाळ कांद्याचे गणित, 9 दिवसात 1 हजार हेक्टरवरील अधिक रोपे नष्ट

Sugarcane Price Dispute : “ऊसाला साडेतीन हजाराचा दर द्या अन्यथा…”, शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधीचा इशारा
3

Sugarcane Price Dispute : “ऊसाला साडेतीन हजाराचा दर द्या अन्यथा…”, शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधीचा इशारा

Nashik kumbha mela : नाशिकमध्ये १,१५० तर त्र्यंबकेश्वर २२५ एकरवर साधूग्राम, झीरो आऊट ब्रेक डीसिसला प्राधान्य
4

Nashik kumbha mela : नाशिकमध्ये १,१५० तर त्र्यंबकेश्वर २२५ एकरवर साधूग्राम, झीरो आऊट ब्रेक डीसिसला प्राधान्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.