Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवी मुंबईत मासेमारी संकटात! गारठा वाढल्याने मासळीचे दर कडाडले; सुरमई, पापलेट ₹ १,००० पार

नवी मुंबईतील खाडी किनारी मिळणारी मासळी ही वातावरणातील गारठयामुळे आता कमी प्रमाणात मिळू लागली आहे. वातावरणातील बदलाचा फटका हा समुद्रातील मासळीच्या विविध प्रजातींना बसतो.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 20, 2025 | 07:04 PM
नवी मुंबईत मासेमारी संकटात! (Photo Credit - X)

नवी मुंबईत मासेमारी संकटात! (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • मासळीची आवक ४०% नी घटली
  • समुद्रातील प्रदूषणामुळे मासे तळाला गेले
  • मच्छीमार आणि खवय्ये आर्थिक संकटात
नवी मुंबई: गेल्या आठवड्यापासून वातावरणातील गारठा वाढल्याने ताज्या मासळीची आवक घटली आहे. परिणामी मासळीचे भाव देखील वाढले आहेत. नवी मुंबईतील खाडी किनारी मिळणारी मासळी ही वातावरणातील गारठयामुळे आता कमी प्रमाणात मिळू लागली आहे. वातावरणातील बदलाचा फटका हा समुद्रातील मासळीच्या विविध प्रजातींना बसतो. त्यात गारठा वाढला की समुद्रातील तापमानही कमी होते, त्यामुळे खोल समुद्रातील मासळीही गारठल्याने ती तळाला गेली आहे. परिणामी मासळीची आवक ४० टक्क्यांपेक्षा अधिक घटली असल्याने मासळीच्या दरातही वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे खवय्यांबरोबर मच्छीमारही आर्थिक संकटात सापडले आहेत.

वाढत्या प्रदूषणाचाही बसतोय फटका

नवी मुंबईतील बहुतांश मछिमार हे मुंबई येथील भाऊचा धक्का व कुलाबा येशून ताजी मासळी खरेदी करतात. मात्र त्या मासळीची देखील आवक कमी झाल्याने त्यांना देखील भाव वाढीचा फटका बसला आहे.

एकीकडे गारठा वाढला तर दुसरीकडे वाढते प्रदूषण याचा सगळा फटका मासळीच्या आवक वर होतो, त्यामुळे कमी मासळी मिळत असल्याने त्यांचे दरही वाढीव झाले आहेत.

दिवाळे खाडी पासून ते ऐरोली खाडी पर्यंत स्थानिक मच्छिमार मासेमारी करतात. या खाडीतून मासे, निवटी, बोईस, कोलंबी तसेच चिवणी मिळतात, पण गारठा वाढल्याने त्यांची देखील आवक खूपच कमी झाली आहे. त्यामुळे मच्छिमार बांधवांची दिवसभराची मेहनत वाया जात असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मासळीचे सध्याचे दर (प्रति किलो)

मासळीचे नाव दर (प्रति किलो)
खापरी पापलेट ₹ १५००
घौळ ₹ १३००
जिताडा ₹ १२००
सुरमई ₹ ११००
पापलेट ₹ १०००
हलवा ₹ ९५०
कोळंबी ₹ ७००

मासे विक्रेती, दिवाळे (नवी मुंबई) येथील सुरेखा कोबी यांनी सांगितले की, “प्रदूषणामुळे मासे कमी मिळत आहेत, त्यात गारठा वाढल्याने उष्णतेच्या शोधात मासे तळाला जात आहेत. यामुळे आवक घटून दर वाढले आहेत.”

परवडणारे मासेही महाग झाले

दरवर्षी प्रत्येक बदलत्या वातावरणाचा मासेमारी व्यवसायावर परिणाम होतो. त्यानुसार सध्या वातावरणातील गारव्यामुळे उष्णतेच्या शोधात मासे समुद्राच्या तळाला जाऊ लागले आहेत. त्यामुळे मासेमारीसाठी गेलेल्या बोटींना आवश्यक त्या प्रमाणात मासळी मिळत नसल्याने कधी कधी रिकाम्या हाती परतावे लागते. उन वाढले की जाळ्यात मासोळी सापडली जाते. समुद्रातील वाढते प्रदूषण आणि बदलत्या वातावरणामुळे अनेक प्रकारचे मासे गायब होऊ लागले आहेत.

मासेमारी संकटात

पापलेट, सुरमई, घोळ आणि इतर अनेक प्रजातीचे मासे मिळेनासे झाले आहेत. मांदेली आणि बोंचील, बांगडे हे सर्वसामान्य खवय्यांच्या पसंतीचे व परवडणारे मासेही महाग झाले आहेत. त्याचा परिणाम मासळीच्या दरवाडीवर झाला आहे. काहींना काही कारणाने मासेमारी संकटात येते. कधी समुद्रात घोगावणारे वादळ, प्रदूषण तर कधी बदलते वातावरण अशा विविध कारणाने मासळीच्या आवक वर परिणाम होत आहे.

Web Title: Fishing in navi mumbai in crisis fish prices have skyrocketed due to increased cold weather

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 07:03 PM

Topics:  

  • Fish Farming
  • Fish market
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: चोरीची गाडी ठोकली, पण बिट मार्शलच्या सतर्कतेने आरोपी गजाआड
1

Navi Mumbai Crime: चोरीची गाडी ठोकली, पण बिट मार्शलच्या सतर्कतेने आरोपी गजाआड

Navi Mumbai Crime : घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक , शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत
2

Navi Mumbai Crime : घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक , शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत

Navi Mumbai Crime : “ऐरोली ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपीला तात्काळ अटक करा,” नवी मुंबई पोलिसांकडे मागणी
3

Navi Mumbai Crime : “ऐरोली ऍट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपीला तात्काळ अटक करा,” नवी मुंबई पोलिसांकडे मागणी

नवी मुंबईत भंगार माफियांकडून दादागिरी, वाहतूक पोलिसांचे मात्र मौन, नागरिकांचा आरोप
4

नवी मुंबईत भंगार माफियांकडून दादागिरी, वाहतूक पोलिसांचे मात्र मौन, नागरिकांचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.