Betel nut to wrestlers to kill Sakhya's brother-in-law; Attack on youth on Apte street; PUNE CRIME
छत्रपती संभाजीनगर: घरमालक आणि भाडेकरू यांच्यामध्ये अनेकदा भांडणं होत असतात. मात्र सध्या एका घरमालकाने भलताच प्रकार केला आहे. भाड्याच्या घरात राहणाऱ्या चार विद्यार्थ्यांवर घरमालकाने दारू पिऊन चाकूने हल्ला (Knife Attack) केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) घडली आहे. या घटनेत सैनिकी पूर्व शिक्षण घेणारे चार विद्यार्थी जखमी झाले आहेत. या विद्यार्थ्यांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी रक्ताचा सडा पडलेला पाहून अनेकांना धक्का बसला आहे. याप्रकरणी अद्याप पोलिसात गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची माहिती घेतली असल्याचं समजतं. (Crime News)
प्रमोद पंढरीनाथ गायकवाड, निवृत्ती कडूबा कावळे, रवी जगन्नाथ गायकवाड आणि अभिषेक गोकुलादास गायकवाड हे फुलंब्री तालुक्यातील वाघोळा या गावचे चार विद्यार्थी आहेत. दहावी बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते शहरामध्ये आले. या चारही मुलांचे आई-वडील मोलमोजुरी करण्याचं काम करून उदरनिर्वाह भागवतात.
[read_also content=”आठ नद्यांच्या पाण्याने 11000 ब्राह्मणांच्या उपस्थितीत अभिषेक, 32 मण सोन्याचं सिंहासन आणि सप्तधातूंची तुला, 350 वर्षांपूर्वी कसा पार पडला होता शिवराज्याभिषेक सोहळा? https://www.navarashtra.com/maharashtra/rituals-took-place-at-chattrapati-shivaji-maharaj-rajyabhishek-sohala-happened-350-years-befure-nrsr-407900.html”]
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फुलंब्री तालुक्यातल्या वाघोळा येथील चार विद्यार्थी सैनिकी पूर्व शिक्षण घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको भागामध्ये राहत होते. ज्या भाड्याच्या घरामध्ये ते राहत होते. घरमालकाच्या मुलाने चाकू घेऊन विद्यार्थ्यांवर हल्ला केला. ज्यात चार जण जखमी झाले आहेत.
पैसे घेऊन घरमालकाचा मुलगा पसार
शिकवणीचे पैसे भरण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांनी त्यांना पैसे आणून दिले होते. यामुळे प्रत्येकाजवळ 40 ते 50 हजार रुपये होते. चार विद्यार्थ्यांचे मिळून दोन लाख रुपये रक्कम रूममध्ये ठेवली होती. घरमालकाच्या मुलाला याविषयी माहिती मिळाली. यानंतर घरमालकाचा मुलगा दारू पिऊन आला आणि त्याने मुलांना मारहाण करत पैशांची मागणी केली. एवढ्यावर न थांबता त्याने विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला केला. यानंतर घरमालकाचा मुलगा विद्यार्थ्यांजवळचे पैसे घेऊन पसार झाला. या हल्ल्यात एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला. त्याच्यासह इतर तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.