Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती संभाजीनगरचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत! जायकवाडीत वीज बिघाड, पंधरा दिवसांनंतरच स्थिती पूर्ववत होणार

छत्रपती संभाजीनगरमधील पाणीपुरवठा यंत्रणा जायकवाडी येथील वीज बिघाडामुळे कोलमडली आहे. पाण्याचे वेळापत्रक २ दिवसांनी पुढे ढकलण्यात आले असून, स्थिती पूर्ववत होण्यासाठी १५ दिवस लागतील.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 23, 2026 | 02:44 PM
छत्रपती संभाजीनगरचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत (Photo Credit- X)

छत्रपती संभाजीनगरचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • छत्रपती संभाजीनगरचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत!
  • जायकवाडीत वीज बिघाड
  • पंधरा दिवसांनंतरच स्थिती पूर्ववत होणार
Chhatrapati Sambhajinagar Water Supply: छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणीपुरवठ्यातील अंतर कमी करण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील असतानाच जायकवाडी येथील पंपगृहाचा वीजपुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण यंत्रणा पुन्हा कोलमडली. परिणामी पाण्याचे नियोजित टप्पे दोन दिवसांनी पुढे ढकलावे लागले असून पूर्ववत स्थिती येण्यासाठी किमान पंधरा दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ५६ आणि १०० दललिक्षमतेच्या जुन्या योजनांची अवस्था जीर्ण झाली आहे. वारंवार जलवाहिन्या फुटणे, सांधे निखळणे, गळती लागणे तसेच वीजपुरवठ्यातील अडथळे, ट्रान्सफॉर्मर जळणे आणि केबल बिघाड अशा कारणांमुळे पुरवठ्यावर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर ७५ दललि क्षमतेची नवीन योजना कार्यान्वित करण्यात आली असली तरी सध्या त्यातून केवळ २५ एमएलडी पाणी उपलब्ध होत आहे.

गॅप कमी करण्याचे प्रयत्न सुरूच

शहरातील पाणीपुरवठ्यातील अंतर कमी करण्यासाठी विभागीय पातळीवर समन्वय बैठका घेतल्या जात आहेत. पंपिंग यंत्रणेतील दोष दूर करणे, वीजपुरवठा स्थिर ठेवण्यासाठी पर्यायी व्यवस्था उभारणे आणि गळती नियंत्रणावर भर देण्यात येत आहे. मात्र वारंवार होणाऱ्या वीजबिघाडामुळे नियोजनावर परिणाम होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी पुढील पंधरा दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत.

पाणीपुरवठा योजनेच्या कामात गंभीर त्रुटी; हायकोर्टाचा संताप, मनपा आयुक्त आणि मजीप्रा अभियंत्यांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश

आठ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा

याआधी पंधरा दिवसांपूर्वीही वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरातील पाण्याचे वेळापत्रक बिघडले होते. त्यावेळी दहा ते बारा दिवसांच्या अंतराने पाणीप्रवठा करावा लागत होता. महापौर समीर राजूरकर यांनी २५ फेब्रुवारीपर्यंत पाण्याचा गॅप कमी करण्याचा आराखडा सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्यानंतर काही भागांत सुधारणा दिसून आली होती. चिकलठाणा, मुकुंदवाडी, जय विश्वभारती कॉलनी आणि गुरूगणेशनगर परिसरात बारा दिवसांच्या ऐवजी आठ दिवसांच्या अंतराने पाणी देण्यास सुरुवात झाली होती.

जायकवाडी येथील यंत्रणेत सलग होतोय बिघाड

मात्र शनिवारी सकाळी जायकवाडी येथील नवीन पंपगृहाचा वीजपुरवठा अचानक खंडित झाला. त्यानंतर यंत्रणेत सलग बिघाड वाढत गेला. रविवारी मध्यरात्री सुमारास वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर पंपिंग सुरू करण्यात आले आणि पहाटे जलकुंभात पाणी पोहोचले. दरम्यान, शनिवारी शहरात एकाही भागात पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठी धावपळ करावी लागली. सर्व भागांना एकाचवेळी पाणी देणे शक्य नसल्याने दोन दिवसांनी टप्पे पुढे ढकलण्यात आले आहेत. शहराततील पाण्याचा गॅप कमी करण्यासाठी तांत्रिक पातळीवर उपाययोजना सुरू असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

उन्हाळ्यात पाणीटंचाई रोखण्यासाठी महापौरांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; २५ फेब्रुवारीपर्यंत दिले कडक आदेश

Web Title: Chhatrapati sambhajinagars water supply disrupted again power outage in jayakwadi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 02:44 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Water Crisis
  • Water supply

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Weather: संभाजीनगरमध्ये उन्हाचा तडाखा! फेब्रुवारीतच पारा ३४ अंशांच्या पार; तज्ज्ञांनी दिला चिंतेचा इशारा
1

Chhatrapati Sambhajinagar Weather: संभाजीनगरमध्ये उन्हाचा तडाखा! फेब्रुवारीतच पारा ३४ अंशांच्या पार; तज्ज्ञांनी दिला चिंतेचा इशारा

Nashik News:पालखेड कालव्याला गुरूवारी पाणी, निवेदनावर कार्यकारी अभियंत्यांचं शिवसेनेच्या शिष्टमंडळाला आश्वासन
2

Nashik News:पालखेड कालव्याला गुरूवारी पाणी, निवेदनावर कार्यकारी अभियंत्यांचं शिवसेनेच्या शिष्टमंडळाला आश्वासन

Chhatrapati Sambhajinagar : पहिल्या दोन फेरीत पहिला, मात्र नंतरच्या फेरीत धावतांना कोसळला; पोलीस भरतीदरम्यान तरुणाचा मृत्यू
3

Chhatrapati Sambhajinagar : पहिल्या दोन फेरीत पहिला, मात्र नंतरच्या फेरीत धावतांना कोसळला; पोलीस भरतीदरम्यान तरुणाचा मृत्यू

छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचा होणार कायापालट! भव्य ‘आरमार दालन’ उभारणार; तोफांच्या संरक्षणासाठीही मोठा निर्णय
4

छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचा होणार कायापालट! भव्य ‘आरमार दालन’ उभारणार; तोफांच्या संरक्षणासाठीही मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.