Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Weather: संभाजीनगरमध्ये उन्हाचा तडाखा! फेब्रुवारीतच पारा ३४ अंशांच्या पार; तज्ज्ञांनी दिला चिंतेचा इशारा

छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमानाने ३४ अंशांचा टप्पा पार केला असून किमान तापमानात आठवड्याभरात ४.५ अंशांची वाढ झाली आहे. फेब्रुवारीतच जाणवणारी ही उष्णता आगामी कडक उन्हाळ्याचा इशारा मानली जात आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 23, 2026 | 03:10 PM
संभाजीनगरमध्ये उन्हाचा तडाखा! (Photo Credit- X)

संभाजीनगरमध्ये उन्हाचा तडाखा! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • संभाजीनगरमध्ये उन्हाचा तडाखा!
  • फेब्रुवारीतच पारा ३४ अंशांच्या पार
  • तज्ज्ञांनी दिला चिंतेचा इशारा
छत्रपती संभाजीनगर शहराच्या कमालसोबतच किमान तापमानात सातत्याने वाढची नोंद होत आहे. रविवारी कमाल तापमानाने ३४ अंश पार केला आहे तर किमान तापमानातदेखील आठवडाभरात तब्बल साडेचार अंशाची वाढ झाली आहे. रविवारी कमाल ३४. ६ आणि किमान तापमान २१. ४ अंश सेल्शियसची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे. ऐन फेब्रुवारीत हिवाळा संपत असताना शहरात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावरच सूर्य तळपू लागल्याने तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. परिणामी नागरिकांना उष्णतेचा त्रास जाणवू लागला आहे. साधारणपणे फेब्रुवारीत वातावरण आल्हाददायक असते. मात्र यंदा कमाल तापमान ३४ अंशांच्या पुढे गेल्याने दुपारच्या वेळेत उन्हाचा तीव्र चटका जाणवत आहे. सकाळी आणि रात्री गारवा जाणवत असला, तरी दुपारनंतर शहरातील रस्ते, बाजारपेठा आणि वर्दळीच्या भागांत उष्णतेची तीव्रता वाढलेली दिसून येत आहे.

आठ दिवसांपूर्वी सोमवार, १६ रोजी किमान तापमान १६. ९ अंश होते ते रविवार, २२ रोजी २१. ४ अंशांपर्यंत वधारले आहे. पुढील दिवसांत यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान अभ्यासकांच्या मते, ढगाळ वातावरणाचा अभाव, कोरडे हवामान, वार्याचा वेग कमी असणे आणि बदलते हवामान चक्र या कारणांमुळे तापमानात वाढ होत आहे.

छत्रपती संभाजीनगरचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत! जायकवाडीत वीज बिघाड, पंधरा दिवसांनंतरच स्थिती पूर्ववत होणार

दरम्यान, फेब्रुवारीतच अशी स्थिती राहिल्यास मार्च एप्रिलमध्ये उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फेब्रुवारीतच जाणवणारी ही उष्णता आगामी उन्हाळ्यासाठी चिंतेचा इशारा मानली जात असून, नागरिकांनी योग्य खबरदारी घेणे गरजेचे ठरत आहे.

घराबाहेर काम करणाऱ्यांना त्रास

तापमानवाढीचा परिणाम लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, तसेच उन्हात काम करणाऱ्या मजुरांवर अधिक जाणवत आहे. डोकेदुखी, थकवा, अंगाची लाही होणे अशा तक्रारी वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो बाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी व द्रवपदार्थ घ्यावेत, हलके व सुती कपडे परिधान करावेत असा सल्ला तज्ञ मंडळींकडून दिला जात आहे.

ढगांमुळे ऊन सावलीचा दिवसभर खेळ

रविवारी दुपारी उन्हाची काहिली सुरु असताना काही वेळ ढगांनी सूर्य झाकोळला गेला होता. यामुळे अधूनमधून उन्हापासून काहीसा दिलासा मिळाल्याने नागरिकांना हायसे वाटले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनावर असलेल्या पिक नुकसानीचे ओझे कमी झाले.

Chhatrapati Sambhajinagar : पहिल्या दोन फेरीत पहिला, मात्र नंतरच्या फेरीत धावतांना कोसळला; पोलीस भरतीदरम्यान तरुणाचा मृत्यू

Web Title: Summer heat hits sambhajinagar the mercury crosses 34 degrees in february itself

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Summer
  • Weather

संबंधित बातम्या

‘बंजारा समाजाला एसटी आरक्षण द्या, अन्यथा…’, गोर सेनेचे प्रा. संदेश चव्हाण यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
1

‘बंजारा समाजाला एसटी आरक्षण द्या, अन्यथा…’, गोर सेनेचे प्रा. संदेश चव्हाण यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा

Chhatrapati Sambhajinagar: पाणीप्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दरबारात! वाढीव पाणीपुरवठा रखडला; बुधवारी मुंबईत उच्चस्तरीय बैठक
2

Chhatrapati Sambhajinagar: पाणीप्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दरबारात! वाढीव पाणीपुरवठा रखडला; बुधवारी मुंबईत उच्चस्तरीय बैठक

बाबा फर्जनच्या जुन्या घराची झाडाझडती, मुलगा, युनियन पदाधिकारी अन् पत्नीची चौकशी; चौकशीत काय उघड झाले?
3

बाबा फर्जनच्या जुन्या घराची झाडाझडती, मुलगा, युनियन पदाधिकारी अन् पत्नीची चौकशी; चौकशीत काय उघड झाले?

FDA Raid: छत्रपती संभाजीनगर हादरले! तुकाराम मुंढेंच्या FDA ची मोठी कारवाई; २.९३ कोटींचे संशयास्पद तेल जप्त
4

FDA Raid: छत्रपती संभाजीनगर हादरले! तुकाराम मुंढेंच्या FDA ची मोठी कारवाई; २.९३ कोटींचे संशयास्पद तेल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.