Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पालकमंत्र्यांनी जपली वारकरी परंपरा! आषाढीनंतर विठ्ठल मंदिरातील कथित खरेदी गैरव्यवहाराची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत होणार चौकशी

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीतील कथित खरेदी गैरव्यवहाराची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. तसेच यंदा आषधी वारीला २० लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल होण्याचा अंदाज सुद्धा व्यक्त करण्यात आला आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 29, 2026 | 11:45 AM
पालकमंत्र्यांनी जपली वारकरी परंपरा! आषाढीनंतर विठ्ठल मंदिरातील कथित खरेदी गैरव्यवहाराची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत होणार चौकशी

पालकमंत्र्यांनी जपली वारकरी परंपरा! आषाढीनंतर विठ्ठल मंदिरातील कथित खरेदी गैरव्यवहाराची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत होणार चौकशी

Follow Us
Follow Us:

पंढरपूर: आषाढी यात्रेचा सोहळा सुरळीत पार पडल्यानंतर पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीतील कथित खरेदी गैरव्यवहाराची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. सध्या प्रशासनाचे संपूर्ण लक्ष आषाढी यात्रेच्या नियोजनावर केंद्रित असून यंदा सुमारे २० लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे यात्रा संपल्यानंतरच या प्रकरणातील चौकशीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पाचगणी प्राथमिक आरोग्य केंद्रात पल्स पोलिओ मोहीम संपन्न! पर्यटन स्थळवरील पर्यटक मुलांसाठी चार केंद्रावर डोस

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीतील चंदन खरेदी आणि महावस्त्र (वस्त्र खरेदी) प्रक्रियेत कथित आर्थिक अनियमितता झाल्याचे आरोप यापूर्वी मुकुंद बडवे यांनी जिल्हाधिकारी व विधी व न्याय खात्याकडे लिखित तक्रारी करण्यात आले होत्या. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याबाबत विधी व न्याय विभागाकडे पत्र पाठवले होते. मात्र, त्यानंतर या चौकशीचे पुढे काय झाले, याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आली नाही. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आता आषाढी यात्रा संपल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या कथित गैरव्यवहाराची चौकशी केली जाईल, असे स्पष्ट केल्याने मंदिर समितीतील खरेदी व्यवहार पुन्हा एकदा तपासाच्या केंद्रस्थानी आले आहेत.

नेमके प्रकरण काय?

मंदिर समितीने विठ्ठल-रुक्मिणीच्या पूजेसाठी आवश्यक असलेल्या चंदन खरेदी तसेच देवांच्या महावस्त्र खरेदी प्रक्रियेत नियमांचे पालन झाले नसल्याचे तसेच यामध्ये गैर व्यवहार झाल्याचा आरोप मुकुंद बडवे यांनी केला होता. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी यासंबंधीच्या तक्रारी विविध विभागाकडे केल्या होत्या. खरेदीची प्रक्रिया, दर, निविदा आणि खर्च याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या आरोपांमुळे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीसाठी विधी व न्याय विभागाकडे प्रस्ताव पाठविला होता.

संवर्धन कामाची केली पाहणी

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्यासाठी मंदिर विकास आराखड्यातून पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली कामे सुरू असून, मंदिर विकास आराखड्यातून झालेल्या कामांची तसेच करण्यात येणाऱ्या कामांची पाहणी करून माहिती घेतली तसेच सद्यस्थितीत सुरू असलेली कामे आषाढी यात्रेपूर्वी पूर्ण करावीत जेणेकरून दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, व्यवस्थापक प्रविणकुमार घम उपस्थित होते.यावेळी कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी मंदिर जतन व संवर्धन आराखड्यातून सुरू असलेल्या कामांची माहिती दिली.

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी वारी… जोरदार तयारी! झेडपीची पंढरीत प्रथमच सभा; साडेचार कोटींच्या कामांना मंजुरी

व्हीआयपी दर्शन नाकारत पालकमंत्र्यांनी जपली वारकरी परंपरा; मुखदर्शनातून दिला संवेदनशीलतेचा संदेश

आढावा बैठकीनंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या एका कृतीने उपस्थित अधिकारी, भाविक आणि नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करताना त्यांना व्हीआयपी दर्शनाची सुविधा सहज उपलब्ध होऊ शकत होती. मात्र, रविवारी मंदिरात दर्शनासाठी झालेली प्रचंड गर्दी आणि रांगेत उभ्या असलेल्या हजारो वारकऱ्यांचा विचार करून त्यांनी व्हीआयपी दर्शन नाकारत केवळ मुखदर्शन घेतले. पालकमंत्र्यांच्या या संवेदनशील आणि वारकरी भावनेचा सन्मान करणाऱ्या भूमिकेचे भाविक व नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.

Web Title: Following ashadhi an inquiry will be conducted through the district collector into the alleged procurement irregularities at the vitthal temple

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • aashadhi ekadashi
  • Ashadhi Wari
  • Ashadhi Wari 2026

संबंधित बातम्या

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी वारी… जोरदार तयारी! झेडपीची पंढरीत प्रथमच सभा; साडेचार कोटींच्या कामांना मंजुरी
1

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी वारी… जोरदार तयारी! झेडपीची पंढरीत प्रथमच सभा; साडेचार कोटींच्या कामांना मंजुरी

Pandharpur Ashadhi Wari 2026: ‘वारीत सुविधा, सेवेत कसूर नाही! साडेचार कोटींच्या कामांना जिल्हा परिषदेची ऐतिहासिक मंजुरी
2

Pandharpur Ashadhi Wari 2026: ‘वारीत सुविधा, सेवेत कसूर नाही! साडेचार कोटींच्या कामांना जिल्हा परिषदेची ऐतिहासिक मंजुरी

वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य शासनाचे व्यापक नियोजन; मुख्यमंत्री फडवणीस यांची माहिती
3

वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य शासनाचे व्यापक नियोजन; मुख्यमंत्री फडवणीस यांची माहिती

Ashadhi Wari 2026: पुणे महापालिकेची आषाढी वारीसाठी मेगा तयारी! मेट्रो मार्गाखालील अडथळे २ दिवसांत हटवण्याचे आदेश
4

Ashadhi Wari 2026: पुणे महापालिकेची आषाढी वारीसाठी मेगा तयारी! मेट्रो मार्गाखालील अडथळे २ दिवसांत हटवण्याचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.