
फोटो सौजन्य: Gemini
वनपरिक्षेत्र कार्यालय, अहिल्यानगर अंतर्गत येणाऱ्या मौजे कामरगाव येथे 23 December रोजी ही यंत्रणा बसविण्यात आली. या प्रणालीत Advanced Computer Vision आणि Deep Learning या प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश असून, बिबट या वन्यप्राण्याचा विशेष डेटाबेस या यंत्रणेत संग्रहित करण्यात आला आहे.
Ahilyanagar News: …तर रास्ता रोको आंदोलन करू! संगमनेरमधील मुख्याधिकाऱ्यांना थेट देण्यात आला इशारा
या यंत्रणेमध्ये बसविण्यात आलेल्या कॅमेऱ्यासमोर बिबट्याचा वावर आढळताच प्रणाली तात्काळ सक्रिय होते आणि सायरनद्वारे गावकऱ्यांना संभाव्य धोक्याचा इशारा दिला जातो. त्यामुळे नागरिकांना वेळीच सतर्क राहून आवश्यक खबरदारी घेणे शक्य होणार आहे. विशेष बाब म्हणजे, हे अत्याधुनिक तंत्रज्ञान कोणत्याही मोबाईल नेटवर्कशिवाय कार्यरत राहते.
बिबट-मानव संघर्ष रोखण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून वनविभागास तातडीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याच निधीतून प्रायोगिक तत्त्वावर ही यंत्रणा उभारण्यात आली आहे.
उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांच्या मार्गदर्शनाखाली कामरगाव येथील मुरलीनगर व खंडोबा मंदिर परिसरात हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या AI आधारित प्रणालीमुळे केवळ सायरनद्वारे इशारा मिळणार नाही, तर बिबट्यांच्या हालचाली व वर्तवणुकीचा अचूक डेटा देखील वनविभागाला उपलब्ध होणार आहे. बिबट-मानव संघर्ष व्यवस्थापनासाठी ही प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास उपवनसंरक्षक सालविठ्ठल यांनी व्यक्त केला आहे.