...तर रास्ता रोको आंदोलन करू! संगमनेरमधील मुख्याधिकाऱ्यांना थेट देण्यात आला इशारा
संगमनेर नगरपालिकेतील प्रशासक राजवट संपुष्टात येऊन नवीन नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आले असले, तरीही नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. संगमनेर शहराला निळवंडे धरणातून थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जात असतानाही शहरातील सर्वच प्रभागांमध्ये अत्यंत कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी सातत्याने नागरिकांकडून होत आहेत.
नवीन वर्षात कार मालकांना अच्छे दिन? CNG चे भाव ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता
त्याचप्रमाणे शहरातील बहुतांश भागांतील पथदिवे बंद अवस्थेत असून नियमित कचरा उचलला जात नसल्याने उपनगरांमध्ये कचऱ्याचे ढीग साचले आहेत. परिणामी नगरपरिषदेचे कचरा व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र दिसून येत आहे. या गंभीर समस्यांकडे नगरपरिषद प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप महायुतीने केला आहे.
या संदर्भात नागरिकांकडून वारंवार तक्रारी व निवेदने देऊनही प्रशासन गांभीर्याने दखल घेत नसल्याने शहरात तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नये, असा इशारा देत सर्व प्रभागांमध्ये तत्काळ पुरेशा दाबाने नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, बंद असलेले पथदिवे युद्धपातळीवर दुरुस्त करावेत तसेच शहरातील केरकचरा त्वरित उचलून शहर स्वच्छ ठेवावे, अशा ठोस मागण्या करण्यात आल्या आहेत.
Nissan च्या पाठोपाठ 2026 मध्ये ‘या’ कंपनीच्या कार देखील महाग होण्याची शक्यता
नगरपरिषद प्रशासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास नगरपरिषद कार्यालयासमोर शिवसेना महायुतीच्या शैलीत तीव्र आंदोलन तसेच लोकशाही मार्गाने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची राहील, असा इशारा देण्यात आला आहे.






