Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मावळ तालुक्यात बेकायदेशीर वन्यजीव शिकारीचा पर्दाफाश; आरोपींना अटक करत वन विभागाची मोठी कारवाई

वडगाव मावळमध्ये वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या व्यक्तीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. वन विभागाकडून ही कारवाई करण्यात आली असून यामध्ये 26 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: May 14, 2025 | 04:18 PM
Forest Department takes action against those hunting wild animals in Vadgaon Maval area

Forest Department takes action against those hunting wild animals in Vadgaon Maval area

Follow Us
Close
Follow Us:

वडगाव मावळ : मावळ तालुक्यामध्ये बेकायदेशीर वन्यजीव शिकारीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. वनविभागाने तत्परतेने केलेल्या कारवाईमध्ये शिकारीसाठी लागणारी शस्त्रास्त्रे व शिकार केलेल्या वन्यजीवांचे मांस जप्त करण्यात आले आहे. तसेच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

वनविभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे, मंगळवारी (दि. १३ मे) मावळ तालुक्यातील तिकोणा गावाच्या हद्दीतील सिंग बंगल्यावर वनविभागाने अचानक धाड टाकली. या कारवाईत सुखमित हरमित सिंग भुतालिया (वय २६, रा. तिकोणा गाव) या व्यक्तीला अटक करण्यात आली. त्याच्याकडून सुमारे ५२ किलो संशयित वन्यप्राण्याचे मांस, दोन शस्त्रास्त्रे, जिवंत व वापरलेले काडतुसे आणि शिकारी व सोलण्यासाठी वापरण्यात येणारे विविध साहित्य जप्त करण्यात आले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

या प्रकरणी वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ च्या कलम ९ व ५१ अंतर्गत वनगुन्हा नोंदविण्यात आला असून, आरोपीला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. ही कारवाई पुण्याचे उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक वनसंरक्षक मंगेश टाटे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या पथकात वनपरिक्षेत्र अधिकारी वडगाव प्रकाश शिंदे, वनपाल सीमा पलोडकर, गणेश मेहत्रे, संदीप अरुण आणि शेलके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

संपूर्ण कारवाई अत्यंत गोपनीयतेने व अचूकतेने पार पडली. जप्त करण्यात आलेल्या मांसाचा नमुना वन्यजीव संशोधन केंद्र, गोरेवाडा, नागपूर येथे न्यायवैद्यक तपासणीसाठी व प्राण्याच्या प्रजातीच्या ओळखीकरिता पाठविण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांबाबत मालकी व परवाना याची चौकशी पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने करण्यात येणार आहे.

वनविभागाकडून खास आवाहन

वनविभागाने सर्वसामान्य नागरिकांना आवाहन केले आहे की, बेकायदेशीर शिकार किंवा वन्यजीव व्यापारासंदर्भात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ जवळच्या वनकार्यालयात किंवा हेल्पलाइनवर माहिती द्यावी. वन्यजीव आणि जंगलांचे संरक्षण ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा  

पुणे मुंबई महामार्गावर ऑन ड्युटी पोलिसाचा अपघात

पुणे मुंबई महामार्गावर वडगाव तळेगाव फाटा चौकात कर्तव्यावर असणाऱ्या एका वाहतूक पोलिसाला भरधाव कंटेनरने चिरडले यात वाहतूक पोलिसाचा जागीच मृत्यू ही घटना मंगळवारी (दि.13) रात्री 9:40 वा. वडगाव तळेगाव दाभाडे फाटा पुणे मुंबई महामार्गावर घडली. मिथुन वसंत धेंडे वय 49 रा. उरुळी कांचन पुणे सध्या वडगाव पोलीस स्टेशन ता.मावळ जि.पुणे अपघातात मृत्यू झालेल्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे. मुंबईच्या  बाजू कडून चाकणकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनर चालकाने वाहतूक नियमन करणाऱ्या वाहतूक पोलिसाला चिरडले. यात धेंडे यांचा जागीच मृत्यू झाला. कंटेनर चालक चाकण बाजूला वेगाने निघून गेला. कंटेनर चालक हा कार्ला फाटा येथून धोकादायक भरधाव वाहन चालवत असतानाचा, एका तरुणाने व्हिडिओ काढला. पोलिसांना माहिती दिली. पुणे ग्रामीण कंट्रोल वरून कंटेनर थांबविण्याचे आदेश झाल्याने कंटेनर थांबवत असताना, भरभाव वेगाने वाहतूक पोलिसांना चिरडले.

Web Title: Forest department takes action against those hunting wild animals in vadgaon maval area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2025 | 04:03 PM

Topics:  

  • Forest Department
  • maval news
  • Wadgaon Maval

संबंधित बातम्या

वडगाव नगरपंचायतीच्या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध; हरकती नोंदविण्याचे मुख्याधिकाऱ्यांच्या आवाहन
1

वडगाव नगरपंचायतीच्या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध; हरकती नोंदविण्याचे मुख्याधिकाऱ्यांच्या आवाहन

Maharashtra Rain Alert : पवना धरण परिसरात मुसळधार पाऊसाची जोरदार बॅटिंग; पवना धरण 100 टक्के भरले
2

Maharashtra Rain Alert : पवना धरण परिसरात मुसळधार पाऊसाची जोरदार बॅटिंग; पवना धरण 100 टक्के भरले

Crime News : मावळात वाढली दादागिरी! सरपंचाकडून तरुणावर जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी
3

Crime News : मावळात वाढली दादागिरी! सरपंचाकडून तरुणावर जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी

वडगाव मावळात अंमली पदार्थांची खुलेआम विक्री! मेफेड्राॅन MD ड्रग्स विक्रीदार एक लाखांचा मुद्देमालासह गजाआड
4

वडगाव मावळात अंमली पदार्थांची खुलेआम विक्री! मेफेड्राॅन MD ड्रग्स विक्रीदार एक लाखांचा मुद्देमालासह गजाआड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.