राज ठाकरे आणि उदय सामंत यांच्या भेटीवर संजय राऊत यांची जोरदार टीका (फोटो - टीम नवराष्ट्र)
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेसह इतर पक्षांनी मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, मनसे नेते राज ठाकरे यांच्या भेटी वाढल्यामुळे ठाकरे गटाची धाकधुक वाढली आहे. राज ठाकरे आणि उदय सामंत यांची भेट झाल्यामुळे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. खासदार संजय राऊत हे राज ठाकरे यांना मुक्त विद्यापीठ म्हणाले आहेत.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. राऊत म्हणाले की, “महापालिकेच्या निवडणूक जवळ आल्या आहेत. महापालिकेत सध्या प्रशासक आहे, पण रस्त्यांवर पाणी साचत आहे, गटारी बघा. सरकारने राज्यात फक्त भ्रष्टाचार केला. सरकारला विनंती आहे, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे काम करावे. आता सैतानाच्या हातात राज्य आहे. मनपाला नगरसेवक देऊ शकत नाहीत. त्यांनी निवडणुका जाहीर करावी आमची तयारी आहे. त्यांची evm ची तयारी झाली नाही,” असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरु असताना त्यांनी उदय सामंत यांची भेट घेतली आहे. उदय सामंत यांनी ही भेट राजकीय नसल्याचे सांगितले. मात्र यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले. याबाबत संजय राऊत यांना विचारले असता त्यांनी राज ठाकरेंवर प्रहार केला. ते म्हणाले की, “राज ठाकरे हे मुक्त विद्यापीठ आहे. तिथं जाऊन कोणाही पदवी घेऊ शकते. राज ठाकरे यांनी एक प्रस्ताव माडंला उद्धव ठाकरेंसमोर. आम्ही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला, देत राहू. फक्त आमची एकच अट आहे, ज्यांनी महाराष्ट्रासंदर्भात टोकाच्या भूमिका घेतल्या, त्यांच्याशी उद्या आपण एकत्र आल्यावर अनैतिक संबंध ठेऊ नये,” असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष एकत्र लढणार की एकमेकांच्या विरोधात लढणार याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या जोरदार चर्चा सुरु आहे. याबाबत खासदार संजय राऊत म्हणाले की, “राज्यात जिथे शक्य असेल तिथे आम्ही एकत्र लढू. महाविकास आघाडीची डिलिव्हरी नॉर्मल आहे. 27 मनपाच्या निवडणुका एकत्र लढू हा प्रयत्न असेल तीन पक्षांच सरकार असल्याने नॉर्मल डिलिव्हरी होत नाही. वेळ लागतोय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाल्याचा प्रश्न एका पत्रकाराने विचारला. त्यावर “नॉर्मल डिलिव्हरी होत नाही. त्यावेळी फडणवीस यांना महिला डॉ. सल्ला घ्यावा लागेल. भाजपला दुसऱ्याचे पोरं खेळविण्याची सवय आहे,” असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याबाबत चर्चा सुरु आहे. यावर राऊत म्हणाले की, “अजित पवार हा एक गट आहे. तो अमित शाह यांचा गट. त्यांनी ही ठरवले आहे. अमित शहा यांनी खूप काही ठरवले आहे. हे किती डरपोक ते युद्धात दिसले, ढोंगी आहे. यांचा पक्ष डोनाल्ड ट्रम्प चालवतात, अशी टीका राऊत यांनी केली. राज ठाकरे आणि नारायण राणे यांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा त्यांनी शिवसेना आमची आहे असं म्हटलं नाही. अजित पवार हे रेम्या डोक्याचे आहे,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.