Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

औरंगाबादच्या महापौर ते भाजपा महिला आघाडी ते राष्ट्रीय सचिव, कोण आहेत विजया रहाटकर? राजस्थान निवडणुकांतही भाजपानं का दिलीय मोठी जबाबदारी?

भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील तीन नेत्यांना संधी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे, विनोद तावडे, विजया रहाटकर ( vijaya rahatkar pankaja munde vinod tawde) या तीन नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळं पुन्हा एकदा विजया रहाटकर राजकारणात सक्रीय होणार असून, त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. आपण पाहूया विजया रहाटकर यांचा सामाजिक आणि राजकीय प्रवास...

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 29, 2023 | 01:38 PM
vijaya rahatkar

vijaya rahatkar

Follow Us
Follow Us:

मुंबई – आगामी लोकसभा (Loksabha) निवडणुकीच्या धरतीवर अनेक पक्षांनी आत्तापासूनच मोर्चेबांधणीलास सुरुवात केली आहे. दरम्यान, आता भाजपाने (BJP) राष्टीय पातळीवर खांदेपालट करत भाकरी फिरवली आहे. भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय सचिव जे पी नड्डा यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे. यात जुन्या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यात दोन माजी मुख्यमंत्र्यांचा तर महाराष्ट्रातील तीन नेत्यांचा समावेश आहे. या घोषणेमुळं राज्यातील तीन नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील तीन नेत्यांना संधी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे, विनोद तावडे, विजया रहाटकर ( vijaya rahatkar pankaja munde vinod tawde) या तीन नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळं पुन्हा एकदा विजया रहाटकर राजकारणात सक्रीय होणार असून, त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. आपण पाहूया विजया रहाटकर (Vijaya Rahatkar) यांचा सामाजिक आणि राजकीय प्रवास…

कोण आहेत विजया रहाटकर?

विजया रहाटकर यांचा प्रवास अतिशय खडतर व संघर्षमय आहे.  नी भौतिकशास्त्रात पदवी, इतिहासात पदव्युत्तर शिक्षण, गायन व संगीतात गती, महापौर ते भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असा प्रवास असलेल्या विजया रहाटकर यांची आता नुकतीच भाजपा राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विजया रहाटकर या मूळच्या नाशिकच्या. भौतिकशास्त्रात पदवी घेता घेता त्यांनी पदव्युत्तर शिक्षण चक्क इतिहास हा विषय घेऊन केले. जोडीलाच ग्रंथालय शास्त्राची पदवीही मिळविली. अंगभूत हुशारी, विज्ञानाचा सखोल अभ्यास व ग्रंथालयाची आवड यातून वाचनाची व बरोबरीने लिहिण्याची सवय लागली. पुढे औरंगाबादचे किशोर रहाटकर या डाएटिशियन तरुणाशी विवाह झाला. भारतीय जनता युवा मोर्चा या संघटनेत काम करताना त्यांच्यातील नेतृत्वगुण खऱ्या अर्थाने बहरले. त्यांनी महिला सबळीकरणाच्या कामांना हात घालत भरपूर काम केले. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे संघटन करतानाच त्या महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याचे मोलाचे काम केले. त्याच जोरावर त्यांना नंतर दशकभर औरंगाबाद महापालिकेत विविध पदे भूषविता आली. औरंगाबादच्या महापौर झाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाला खऱ्या अर्थाने चार चाँद लागले. त्यांना महिला मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणिसपद व नंतर अध्यक्षपद भूषविले. आणि आता भाजपा राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती झाली आहे.

राजस्थान निवडणुकांचीही जबाबदारी

दरम्यान, आता भाजपाने विजया रहाटकर यांच्यावर राजस्थान निवडणुकांतही मोठी जबाबदारी दिली आहे. लोकसभेच्या धरतीवर या भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आलेली आहे. तसेच भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील तीन नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील तीन नेत्यांना संधी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे, विनोद तावडे, विजया रहाटकर ( vijaya rahatkar pankaja munde vinod tawde) या तीन नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: From mayor of aurangabad to bjp mahila aghadi to national secretary who is vijaya rahatkar why has bjp given a big responsibility in rajasthan elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2023 | 01:35 PM

Topics:  

  • maharashtra
  • MonsoonSession2023

संबंधित बातम्या

Mahape Jewellery Park: महाराष्ट्रात दागिने उद्योगाची मोठी झेप; २५ हजार कोटींची गुंतवणूक, १ लाख रोजगारांची अपेक्षा
1

Mahape Jewellery Park: महाराष्ट्रात दागिने उद्योगाची मोठी झेप; २५ हजार कोटींची गुंतवणूक, १ लाख रोजगारांची अपेक्षा

Ahilyanagar News: ‘सर्व आरोपींना अटक झालीच पाहिजे!’ भगवान बाबा मल्टीस्टेट प्रकरणी ठेवीदारांचा एल्गार
2

Ahilyanagar News: ‘सर्व आरोपींना अटक झालीच पाहिजे!’ भगवान बाबा मल्टीस्टेट प्रकरणी ठेवीदारांचा एल्गार

पुण्यातील समीर जैन यांची आर्थिक क्षेत्रात मोठी झेप! NJ Wealth सोबतच्या भागीदारीत २१५ कोटींचा AUM
3

पुण्यातील समीर जैन यांची आर्थिक क्षेत्रात मोठी झेप! NJ Wealth सोबतच्या भागीदारीत २१५ कोटींचा AUM

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे; मंत्री अतुल सावे यांचे आवाहन
4

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे; मंत्री अतुल सावे यांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.