Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Politics: शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवायला निधी नाही, पण महामार्गासाठी १ लाख कोटी? राजू शेट्टींचा गंभीर आरोप

राज्यामध्ये दररोज ८ हून अधिक शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत. या अशा काळातही राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यास हात आखडता घेत आहे. नागपूरमध्ये राज्याचे अधिवेशन सुरू होत आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 09, 2025 | 05:06 PM
Raju Shetti,

Raju Shetti,

Follow Us
Close
Follow Us:
  • केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बेजबाबदार
  • देशाची अर्थव्यवस्था ढासळत चाललेली आहे
  • मदत करण्यास सरकारचा आखडता हात
Kolhapur Politics: केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बेजबाबदार झाल्यानेच देशातील शेती व्यवसायाची अधोगती होत चालली आहे. देशातील मुठभर उद्योगपतींच्या हितासाठी ढीगभर शेतक-यांच्या माथी चुकीच्या धोरणांचा वरवंटा फिरवला जात असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली. शहादा (जि. नंदुरबार) येथे घेण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

Jai Anmol Ambani: अनिल अंबानीचा मुलगा जय अनमोलवर FIR दाखल, तब्बल 228 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

राजू शेट्टी म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था ढासळत चाललेली आहे, ही अर्थव्यवस्था टिकवून ठेवायची असेल तर केंद्र सरकारने शेती व्यवसायाकडे दुर्लक्षित करून चालणार नाही. राज्यातील शेतकरी अतिवृष्टी, महापूर, अस्मानी व सुल्तानी संकटे यासारख्या नैसर्गिक आपत्तीने खचला गेला आहे.

यावेळी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शेतकरी नेते राज्य संघटक घनश्याम चौधरी यांनी शिवसेनेला रामराम ठोकून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत घरवापसी केली. या कार्यक्रमास मराठवाडा प्रमुख किशोर ढगे, राज्य प्रवक्ते अनिल पवार, युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष अमर कदम, कोषाध्यक्ष बापू कारंडे, नंदुरबार जिल्हाध्यक्ष नथू पाटील, पवन पटेल यांच्यासह नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

8th Pay Commission: 1 जानेवारीपासून लागू होणार 8 वा वेतन आयोग? सरकारने संसदेत दिली पूर्ण माहिती, 

मदत करण्यास सरकारचा आखडता हात

राज्यामध्ये दररोज ८ हून अधिक शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत. या अशा काळातही राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यास हात आखडता घेत आहे. नागपूरमध्ये राज्याचे अधिवेशन सुरू होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकशाहीचे मंदिर असणाऱ्या विधानभवनात प्रवेश करण्याआधी विधानभवानाच्या पायऱ्यावर माथा टेकून अंर्तमुख होवून राज्यातील आत्महत्या करणारा शेतकरी डोळ्यांसमोर आणावा म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांचे वास्तव लक्षात येईल.

शेतकऱ्यांसाठी तिजोरीत पैसे नाहित हे शेतकऱ्यांचे दुर्दैव

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संस्थापक राजू शेट्टी म्हणाले, अदानीच्या हितासाठी जर राज्यामध्ये १ लाख कोटींचा शक्तीपीठ महामार्ग केला जात असेल, तर दररोज ८ शेतकरी व वर्षाला जवळपास ३ हजार आत्महत्या थांबवण्यासाठी राज्याच्या तिजोरीत ३५ हजार कोटी नाहीत हे कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे, नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यातील कापूस, ज्वारी, मका, तूर, बाजरी, गहू, हरभरा, ऊस, सोयाबीन, मिरची उत्पादक शेतक-यांचे अर्थकारण कोलमडले आहे, अशी खंतही राजू शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केली.

 

Web Title: Funds for farmers missing but 1 lakh crore for highway raju shetti slams government over agrarian crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 05:06 PM

Topics:  

  • Farmers Issue
  • Kolhapur Politics
  • Raju Shetti

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.