Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gadchiroli News : गडचिरोलीत उभा राहणार हरित पोलादाचा प्रकल्प; महाराष्ट्र सरकारचा जॉन कॉकरिलसोबत मोठा करार

Gadchiroli News : गडचिरोलीत हरित लोह आणि हरित पोलाद तंत्रज्ञानावर आधारित प्रात्यक्षिक प्रकल्प उभारण्याच्या दिशेने महाराष्ट्राने मोठे पाऊल टाकले आहे. जॉन कॉकरिल इंडिया लिमिटेडसोबत झालेल्या सामंजस्य करारातून कमी-कार्बन तंत्रज्ञान आणि हरित पोलाद उत्पादनाला चालना देण्याचे उद्दिष्ट आहे.

  • By विवेक
Updated On: Sep 04, 2026 | 10:08 PM
गडचिरोलीत उभा राहणार हरित पोलादाचा प्रकल्प; महाराष्ट्र सरकारचा जॉन कॉकरिलसोबत मोठा करार

गडचिरोलीत उभा राहणार हरित पोलादाचा प्रकल्प; महाराष्ट्र सरकारचा जॉन कॉकरिलसोबत मोठा करार

Follow Us
Follow Us:
  • गडचिरोलीत हरित लोह-हरित पोलादाचा प्रात्यक्षिक प्रकल्प उभारण्याचे नियोजन
  • जॉन कॉकरिल इंडिया लिमिटेडसोबत महाराष्ट्र शासनाचा सामंजस्य करार
  • तंत्रज्ञान हस्तांतरणासह स्थानिक कौशल्य विकास आणि रोजगारनिर्मितीवर भर
 

Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देणाऱ्या महत्त्वपूर्ण प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. महाराष्ट्र शासन आणि जॉन कॉकरिल इंडिया लिमिटेड यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराच्या प्रतींची मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये औपचारिक देवाणघेवाण करण्यात आली. भारत-बेल्जियम उच्चस्तरीय संवाद कार्यक्रमादरम्यान हा कार्यक्रम पार पडला.

गडचिरोलीत हरित पोलादाचा प्रयोग

2 सप्टेंबर 2026 रोजी झालेल्या सामंजस्य करारानुसार गडचिरोलीमध्ये हरित लोह आणि हरित पोलाद तंत्रज्ञानावर आधारित पायलट अथवा प्रात्यक्षिक प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. पोलाद निर्मिती प्रक्रियेत कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रगत कमी-कार्बन तंत्रज्ञानाचा वापर या प्रकल्पात केला जाणार आहे.

यामध्ये कमी तापमानावर आधारित इलेक्ट्रोलिटिक आयर्नमेकिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर राहणार आहे. पारंपरिक पद्धतींच्या तुलनेत अधिक पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हरित पोलाद उत्पादनाला चालना देण्याचा प्रयत्न या करारातून केला जाणार आहे.

मध्यरात्रीपर्यंत पाहणी अन् अधिकाऱ्यांची शाळा! Gadchiroli च्या विकासासाठी मंत्र्यांचा धडक दौरा; पाहा काय घडलं?

तंत्रज्ञानासोबत कौशल्य विकासावरही भर

या प्रकल्पाचा उद्देश केवळ उत्पादनापुरता मर्यादित नसून तंत्रज्ञान हस्तांतरण, संशोधन, संस्थात्मक सहकार्य आणि स्थानिक मनुष्यबळाचे कौशल्य विकास यावरही भर देण्यात आला आहे. त्यामुळे गडचिरोलीसह महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राला याचा दीर्घकालीन फायदा होण्याची अपेक्षा आहे.

हरित पोलादाच्या वाढत्या जागतिक मागणीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. गडचिरोलीला भविष्यात हरित पोलाद उत्पादन आणि निर्यातीचे केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.

फडणवीस, पीयूष गोयल यांची उपस्थिती

भारत-बेल्जियम उच्चस्तरीय संवाद कार्यक्रमाला बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डे वेव्हर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि राजशिष्टाचार, एफडीआय व प्रवासी भारतीय कार्य मंत्री जयकुमार रावल उपस्थित होते.

Gadchiroli news: उपचारासाठी १८ किमीची पायपीट, आरोग्य कर्मचाऱ्यांचा सेवाभाव; ग्रामस्थांच्या धाडसाने वाचले प्राण

महाराष्ट्र शासनाच्या वतीने उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बळगन आणि डॉ. राजेश गवांदे यांनी, तर जॉन कॉकरिल समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जीन-ल्युक मॉरांज आणि जॉन कॉकरिल इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक फ्रेडरिक मार्टिन यांनी कराराच्या प्रतींची देवाणघेवाण केली.

प्रकल्पासाठी आवश्यक मंजुरी, परवानग्या आणि प्रोत्साहनपर सवलती उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून सहकार्य केले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Web Title: Gadchiroli green steel project maharashtra government john cockerill mou

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 10:08 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Gadchiroli News
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

अनुसूचित जातींच्या उमेदवारांना मोठा दिलासा; MPSC मुलाखतीच्या तयारीसाठी BARTI कडून मिळणार 10 हजारांची मदत
1

अनुसूचित जातींच्या उमेदवारांना मोठा दिलासा; MPSC मुलाखतीच्या तयारीसाठी BARTI कडून मिळणार 10 हजारांची मदत

Pune News : पुणे ठरतेय GCC चे हब; वर्षभरात 800 पेक्षा अधिक ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास
2

Pune News : पुणे ठरतेय GCC चे हब; वर्षभरात 800 पेक्षा अधिक ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास

‘म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला फसवणीस नाव दिले’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर घणाघाती हल्ला
3

‘म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला फसवणीस नाव दिले’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर घणाघाती हल्ला

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाला मोठं यश? जरांगेंच्या मागण्यांवर सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा
4

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाला मोठं यश? जरांगेंच्या मागण्यांवर सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.