Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आमदार सुनील शेळकेंच्या विकासाचा पुराव्यानिशी पंचनामा करणार..; गणेश भेगडे यांचे थेट आव्हान

मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये जोरदार राजकारण रंगले आहे. विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्या विकासकामांना आणि दाव्यांवर अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी थेट आव्हान दिले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 09, 2024 | 06:46 PM
Ganesh Bhegde directly challenged incumbent MLA Sunil Shelke

Ganesh Bhegde directly challenged incumbent MLA Sunil Shelke

Follow Us
Close
Follow Us:

टाकवे : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीमुळे राजकारण रंगले आहे. मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये देखील प्रचाराचा धुराळा उडाला आहे. आता अपक्ष उमेदवार गणेश भेगडे यांनी आमदार सुनील शेळके यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागलं आहे. मावळातील एका गावातील रस्त्यासाठी 42 लाख रुपये खर्च केले. पण रस्ता, पूलही अस्तित्वात नाही. त्यामुळे पूल, रस्ता हरवला आहे, अशा तक्रारी पोलीस स्टेशनला द्याव्यात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आम्ही पुराव्यासह आमदार सुनील शेळके यांच्या विकासाचा पंचनामा करणार आहोत, असा इशारा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी दिला.

सर्वपक्षीय अपक्ष व जनतेचे उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या प्रचारार्थ आज आंदर मावळातील राजपुरी, बेलज, टाकवे, फळणे, माऊ, वडेश्वर नागाथली, वहाणगाव, कुसवली, बोरवली, कांब्रे, डाहुली, कुसुर, खांडी, निळशी, सावळा, माळेगाव खुर्द, तळपेवाडी आदी गावांमध्ये प्रचारदौरा झाला. मतदारांनी प्रत्येक गावात फुलांच्या पायघड्या, फुलांच्या पाकळ्यांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी करीत स्वागत केले. महिलांनी औक्षण करीत विजय तिलक लावला. यावेळी या सर्व गावांच्या ग्रामस्थानसह शिवसेना (उबाठा) पक्षाचे तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा : पंढरपूर-मंगळवेढ्यात काँग्रेसमध्ये फूट; शहराध्यक्षासह काँग्रेसच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचा अनिल सावंतांना पाठिंबा…

पुढे बोलताना गणेश भेगडे म्हणाले, “माणसाने नम्र असावे, मीपणा रावणाचाही अंत करून गेला, हे विरोधकांनी लक्षात ठेवावे. तालुक्यात कार्यकर्ते संकल्पना संपुष्टात आणली आहे. मलिदा गँगचे यांचे कार्यकर्ते असतील, तर यांचा अध्यक्ष कोण ? आमदार शेळकेंच्या भोवतीच पोलिसांचा गराडा असेल, तर ते नागरिकांना सुरक्षा काय देणार ?” असा सवालही गणेश भेगडे यांनी केला.

हे देखील वाचा : महायुतीच्या सरकारच्या योजनांविषयी विरोधकांकडून अपप्रचार…; दिलीप वळसे पाटलांनी घेतला विरोधकांचा समाचार

मावळची संस्कृती बिघडवण्याचा प्रयत्न केला जातोय. खोटे बोलून नको त्या विकासाच्या गप्पा मारू नका. विद्यमान आमदाराने तालुक्याची लिमिटेड कंपनी करून टाकली आहे, असे होऊ द्यायचे नसेल, तर परिवर्तन घडवण्याची जबाबदारी मतदारांवर आहे. विद्यमान आमदारांनी प्रत्येक घटकाला दुखावण्याचे काम केले आहे. गाव संघटित ठेवण्यासाठी, गावगाडा चालवण्यासाठी सर्वांनी एकत्र राहून प्रयत्न करण्याची आवश्यकता असते. टाकवे गावातून कंपन्या बाहेर का गेल्या, दूध व्यवसाय येथून स्थलांतरित का झाले याचा गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे का नाही ? कान्हे येथील पूल अद्याप का केला गेला नाही. हा पूल झाला असता तर इंडस्ट्री बाहेर जाण्याचा प्रश्नच नव्हता. इंडस्ट्रीज बाहेर गेल्यामुळे तरुणांना रोजगार देणे देखील कठीण बनले आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षात हा पूल होणं आवश्यक होतं. महिला सक्षमीकरण तरुणांच्या हाताला काम हेच आपले व्हिजन आहे.
– बापूसाहेब भेगडे, अपक्ष उमेदवार, मावळ विधानसभा

Web Title: Ganesh bhegde directly challenged incumbent mla sunil shelke in maval assembly constituency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2024 | 06:25 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Sunil Shelke

संबंधित बातम्या

Sunil Shelke: “…ही लोकांच्या जिवाशी थट्टा”; रस्त्यांच्या दुरावस्थेवर आमदार शेळके आक्रमक; केली ‘ही’ मोठी मागणी
1

Sunil Shelke: “…ही लोकांच्या जिवाशी थट्टा”; रस्त्यांच्या दुरावस्थेवर आमदार शेळके आक्रमक; केली ‘ही’ मोठी मागणी

Sunil Shelke Conspiracy: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; एसआयटी स्थापन
2

Sunil Shelke Conspiracy: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; एसआयटी स्थापन

इंद्रायणी तांदळाच्या बियाण्यांच्या तुटवड्यावर विधानसभेत आवाज…; आमदार शेळकेंकडून ठोस उपायांची मागणी
3

इंद्रायणी तांदळाच्या बियाण्यांच्या तुटवड्यावर विधानसभेत आवाज…; आमदार शेळकेंकडून ठोस उपायांची मागणी

अजित पवार गटाच्या ‘या’ आमदाराने बुडवली हजारो कोटीची रॉयल्टी? संजय राऊतांचा गंभीर आरोप
4

अजित पवार गटाच्या ‘या’ आमदाराने बुडवली हजारो कोटीची रॉयल्टी? संजय राऊतांचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.