
फोटो सौजन्य सोशल मिडिया
या दोघांनीही एकमेकांविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केली असून आमदार सुनील शेळके यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याचे तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप गुजर यांनी केला आहे. आरटीआय अंतर्गत मिळालेली माहिती विरोधकांना पुरवत असल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी केलाय.
पुणे जिल्हाअधिकारी कार्यालयात मारहाण झाल्याची माहीती समोर येत असून गौण खनिज उत्खन्न आणि जमिनीच्या व्यवहारीवरातून ही मारहाण झाल्याची घटना आहे. यामध्ये कागपत्रे गहाळ झाल्याचे आरोप सुनील गुजर यांनी केले आहेत. तर अॅट्रोसिटी कायद्या अंर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके हे एका कामासाठी जिल्हाअधिकारी कार्यालयात एकत्र आले होते, यावेळी सुनील गुजर आणि करुणा सरोदे एकत्र आले होते, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्या कार्यकर्त्यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते सुनील गुजर आणि करुणा सरोदे यांनी केला आहे.
जमिनीच्या वादातून आधिपासून दोंघामध्ये वैर असल्याचे सांगितले जात आहे. कार्यकर्त्यांनी सुनील गुजर शेळके यांना जाब विचारला त्याच्या बॅगा तपासण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी मारहाण केल्याप्रकरणी सुनील गुजर हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेटणार असल्याचे सांगितले जात आहेत.