
गणेश चतुर्थी 2026
पंचांगानुसार, पुण्यात हरतालिका तृतीया तिथी १३ सप्टेंबर रोजी सकाळी ७.०८ वाजता सुरू होऊन १४ सप्टेंबर रोजी सकाळी ७.०६ वाजता संपते. त्यानंतर लगेच शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी सुरू होते. त्यामुळे एकाच दिवशी सकाळी हरतालिका व्रत आणि त्यानंतर गणेश चतुर्थीची पूजा असा दुर्मीळ योग साधला जाणार आहे.
हरतालिका व्रत हे प्रामुख्याने महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी करतात. शिव-पार्वतीच्या मातीच्या मूर्ती तयार करून त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे. यंदा सकाळी हरतालिकेची पूजा केल्यानंतर दुपारच्या सुमारास घराघरांत गणरायाच्या प्रतिष्ठापनेची तयारी सुरू होणार आहे.
Hartalika 2025: हरतालिकेच्या पूजेसाठी कोणत्या साहित्याचा वापर करावा? जाणून घ्या
पुण्यात गणेश चतुर्थीच्या पूजेसाठी सकाळी ११.१६ ते दुपारी १.४४ हा मुहूर्त दिला आहे. त्यामुळे महिलांना हरतालिकेच्या व्रताची पूजा आणि गणरायाची प्रतिष्ठापना या दोन्ही धार्मिक विधींचे नियोजन करावे लागणार आहे. एकीकडे हरतालिकेच्या व्रताची भक्तिमय तयारी, तर दुसरीकडे गणरायाच्या आगमनाची लगबग, अशी दुहेरी उत्सवी वातावरणाची अनुभूती यंदा पुणेकरांना घेता येणार आहे. तिथींच्या या संयोगामुळे यंदाचा गणेशोत्सव धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्याही वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे.
Hartalika 2025: तुम्ही हरतालिकेचा उपवास पहिल्यांदा करत आहात का? लक्षात ठेवा हे नियम
ह्यावर्षी हरितालिका आणि गणेश स्थापना दोनही व्रते एकाच दिवशी येत आहेत तृतीया तिथीची वृद्धी होऊन ती 14 सप्टेंबरला सात वाजेपर्यंत आहे शास्त्रातील वचनानुसार हरितालिका व्रतासाठी चतुर्थीने युक्त अशीच तृतीया निवडावी आणि गणेश स्थापनेसाठी मात्र मध्यान्ह वेळी ज्या दिवशी चतुर्थी आहे तीच तिथी ग्राह्य असते म्हणून कुठलीही शंका मनात न बाळगता दोनही व्रते हरितालिका व गणेश स्थापना एकाच दिवशी करावी. गणेश स्थापनेसाठी राहुकाळ इत्यादी बघायची गरज नाही पहाटेपासून दुपारी साडेबारा एक पर्यंत कधीही गणेश स्थापना करू शकतो.
निनाद रवींद्र कुलकर्णी, गुरुजी