Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गॅस एजन्सीचालक मस्त, ग्राहक मात्र त्रस्त! भर उन्हात तासनतास रांगेत उभे राहून गॅस मिळविण्याची वेळ

नांदेड शहरात गॅस टंचाईचे संकट अद्याप कायम असून नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. मंगळवारी सकाळी महावीर गॅस एजन्सीवर ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळल्याचे दिसून आले

  • By प्रीति माने
Updated On: Mar 18, 2026 | 03:06 PM
gas shortage has arisen in Nanded city, resulting in long queues of customers

gas shortage has arisen in Nanded city, resulting in long queues of customers

Follow Us
Close
Follow Us:

Nanded Gas Shortage : नांदेड: आखाती देशांमध्ये युद्ध सुरु असल्यामुळे गॅस आणि तेलाचा प्रश्न निर्माण होत आहे. व्यावसायिक गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून घरगुती गॅससाठी (LPG Gas) तासनतास रांगा लागल्या आहेत. ऑनलाईन बुकिंग सेवा देखील बंद झाली आहे. यामुळे ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आखाती देशातील युद्धाचा फटका देशातील सामान्य कुटुंबांना बसला आहे. याचाच प्रत्यय नांदेडमध्ये (Nanded News) देखील दिसून येत आहे.

शहरात गॅस टंचाईचे संकट अद्याप कायम असून नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. मंगळवारी सकाळी महावीर गॅस एजन्सीवर ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळल्याचे दिसून आले. भर उन्हात तासनतास रांगेत उभे राहून गॅस मिळविण्याची वेळ ग्राहकांवर आली होती.

एजन्सीचे कार्यालय सकाळी ९.३० वाजता सुरू झाले असले तरी नागरिकांनी सकाळी ८ वाजल्यापासूनच रांगा लावण्यास सुरुवात केली होती. काही वेळातच ही रांग गांधी पुतळ्यापर्यंत पोहोचली. कडक उन्हामुळे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे हाल झाले. अनेकांनी डोक्यावर रुमाल ठेवून उन्हापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, ग्राहकांना ३ ते ४ दिवस उशिराने गॅस मिळत असल्याने नाराजी वाढली आहे.

हे देखील वाचा : “एकनाथ शिंदेंचा पक्ष म्हणजे भाजपची अंगवस्त्र…; खासदार संजय राऊतांची खरपूस टीका

खासदार रवींद्र चव्हाण यांनी केली केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

लोकांनी पॅनिक होण्याची गरज नाही. पुढील तीन दिवस पुरेल एवढा स्टॉक उपलब्ध आहे. उद्या जिल्हाधिकारी साहेबांनी सर्व गॅस एजन्सी चालकांची बैठक बोलावली असून ग्राहकांना व्यवस्थित बोलणे, सावलीची व्यवस्था करण्याबाबत सूचना दिल्या जातील.

देतायेत उडावाउडवीची उत्तरे
‘आज मिळेल, उद्या मिळेल या आशेवर नागरिकांना वारंवार एजन्सीच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. विशेष म्हणजे, काही ग्राहकांनी उन्हापासून बचावासाठी एजन्सी कार्यालयात आसरा घेण्याचा प्रयत्न केला असता, कर्मचाऱ्यांनी त्यांना हुसकावून लावल्याचा आरोप आहे. काही कर्मचा-यांनी ग्राहकांशी उद्धट आणि अश्लील भाषेत संवाद साधल्याची तक्रारही नागरिकांनी केली. एका व्यक्तीने हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रीत करण्याचा प्रयत्न केला असता, संबंधित कर्मचा-यांनी ‘व्हिडिओ लो, हमारा कुछ नहीं होता असे म्हणत उडवाउडवीची भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले.

हे देखील वाचा : मराठा आरक्षणाचा एल्गार! जरांगे पाटलांची पुन्हा ‘चलो मुंबई’ची हाक; आंदोलनाचा नवा इशारा

नांदेडचे जिल्हा पुरवठा अधिकारी जगदीश बारदेवाड यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले की, लोकांनी पॅनिक होण्याची गरज नाही. पुढील तीन दिवस पुरेल एवढा स्टॉक उपलब्ध आहे. उद्या जिल्हाधिकारी साहेबांनी सर्व गॅस एजन्सी चालकांची बैठक बोलावली असून ग्राहकांना व्यवस्थित बोलणे, सावलीची व्यवस्था करण्याबाबत सूचना दिल्या जातील, असे जगदीश बारदेवाड यांनी सांगितले आहे.

Web Title: Gas shortage has arisen in nanded city resulting in long queues of customers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 03:06 PM

Topics:  

  • LPG Gas
  • LPG gas cylinder
  • Nanded
  • nanded news

संबंधित बातम्या

LPG सिलिंडरच्या किमती बदलल्या! तुमच्या खिशावर किती भार पडणार? पाहा आजचे ताजे दर
1

LPG सिलिंडरच्या किमती बदलल्या! तुमच्या खिशावर किती भार पडणार? पाहा आजचे ताजे दर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.