Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अकोल्यात गॅस टँकर उलटून अपघात; चालक जखमी, अपघातामुळे वाहतुकीचा खोळंबा

गॅस टँकरचा अपघात झाल्यावर सुदैवाने त्यातून गॅस गळती झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा जयपूर येथील गॅस टँकरच्या भीषण अपघात प्रकरणाची पुनरावृत्ती अकोला जिल्ह्यात घडण्याची शक्यता नाकारता आली नसती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 30, 2024 | 11:53 AM
अकोल्यात जयपूरची पुनरावृत्ती सुदैवाने टळली

अकोल्यात जयपूरची पुनरावृत्ती सुदैवाने टळली

Follow Us
Close
Follow Us:

अकोला : जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर व्याळा गावाजवळ एक गॅस टँकर उलटल्याची दुर्घटना रविवारी दुपारी घडली. या अपघातात टँकर चालक गंभीर जखमी झाला आहे. गॅस टँकरचा अपघात झाल्यावर सुदैवाने त्यातून गॅस गळती झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा जयपूर येथील गॅस टँकरच्या भीषण अपघात प्रकरणाची पुनरावृत्ती अकोला जिल्ह्यात घडण्याची शक्यता नाकारता आली नसती. अपघातामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

हेदेखील वाचा : ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा राहणार चोख बंदोबस्त; अमरावतीत 80 अधिकाऱ्यांसह 800 पोलिस असणार तैनात

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर अकोल्यावरून बाळापूरकडे इंडियन कंपनीचा गॅस टँकर (क्र. एमएच ०४ जेके १८७८) जात होता. दरम्यान, महामार्गावरील व्याळा गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर रस्त्याच्या बाजूला उलटला. गॅस टँकरचा अपघात होताच परिसरात भीतीचे वातावरण पसरले. महामार्गावरून धावणाऱ्या इतर वाहन चालकांनी दूरच आपली वाहने रोखून धरली होती. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. या अपघातात चालक आलोक विरेंद्र सिंह गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जयपूरमध्ये 15 जणांचा झाला होता मृत्यू

राजस्थानातील जयपूर-अजमेर महामार्गावर २० डिसेंबर रोजी सकाळी एलपीजी गॅसने भरलेल्या एका टँकरने अन्य टँकर व ट्रकला धडक देऊन भीषण अपघात घडला होता. त्या अपघातात टँकरचा मोठा स्फोट झाला. त्यामुळे आजूबाजूची अन्य वाहने देखील आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली होती. या भीषण अपघातात 15 पेक्षा अधिक नागरिकांचे प्राण गेले, तर अनेक जण जखमी झाले आहेत. जयपूर येथील अपघाताची ही घटना ताजी असतांनाच अकोला जिल्ह्यात महामार्गावर गॅस टँकर उलटला. चालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. नशीब बलवत्तर म्हणून अपघातग्रस्त टँकरला आग लागली नाही. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

मुंबईच्या घाटकोपर येथे अपघात

मुंबईच्या कुर्ला येथील बेस्ट बसच्या अपघाताची घटना ताजी असताना घाटकोपरमध्ये असाच एक भीषण अपघात घडला आहे. मुंबईमधील घाटकोपर येथे एक भरधाव वेगाने धावणाऱ्या टेम्पोने अनेक जणांना धडक दिल्याचे समजते आहे. अत्यंत वेगाने असणाऱ्या या टेम्पोने 5 ते 6 जणांना चिरडले असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच या भीषण अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याचे समजते आहे.

हेदेखील वाचा : ‘राजगुरूनगर, लोणावळ्यात घडलेल्या घटना भयंकर’; रुपाली चाकणकर यांनी दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना

Web Title: Gas tanker overturns in akola nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2024 | 11:53 AM

Topics:  

  • Akola Accident
  • akola news

संबंधित बातम्या

अकोल्यात ‘१०८’ रुग्णवाहिका ठरली ‘देवदूत’! २ लाख नागरिकांचे प्राण वाचवण्याचा विक्रमी टप्पा पार
1

अकोल्यात ‘१०८’ रुग्णवाहिका ठरली ‘देवदूत’! २ लाख नागरिकांचे प्राण वाचवण्याचा विक्रमी टप्पा पार

Road Accident: शहरात अपघातांचे सत्र कायम! १० महिन्यांत १५७ जणांचा मृत्यू; वाढत्या ‘हिट अँड रन’ घटनांनी चिंता वाढवली
2

Road Accident: शहरात अपघातांचे सत्र कायम! १० महिन्यांत १५७ जणांचा मृत्यू; वाढत्या ‘हिट अँड रन’ घटनांनी चिंता वाढवली

नाफेड खरेदी केंद्राच्या ‘कठीण अटीं’मुळे शेतकरी संतप्त; बाळापूर तालुक्यात रास्ता रोको आंदोलन
3

नाफेड खरेदी केंद्राच्या ‘कठीण अटीं’मुळे शेतकरी संतप्त; बाळापूर तालुक्यात रास्ता रोको आंदोलन

Akola News: पोदार प्रेप शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन! साऱ्यांचा उत्साह भिडला गगनाला
4

Akola News: पोदार प्रेप शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन! साऱ्यांचा उत्साह भिडला गगनाला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.