Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुष्काळ निवारणासाठी कृती आराखडा; पाण्यासाठी गावोगावी उपाययोजनांचे नियोजन

वारंवार पाणीटंचाई निर्माण होणाऱ्या गावांसाठी तातडीच्या उपाययोजना करण्यासोबतच कायमस्वरूपी जलस्रोतांचे बळकटीकरण आणि नवीन जलस्रोतांची निर्मिती करण्यावरही बैठकीत चर्चा होणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 22, 2026 | 02:21 PM
दुष्काळ निवारणासाठी कृती आराखडा; पाण्यासाठी गावोगावी उपाययोजनांचे नियोजन

दुष्काळ निवारणासाठी कृती आराखडा; पाण्यासाठी गावोगावी उपाययोजनांचे नियोजन

Follow Us
Follow Us:
  • टंचाई निवारणासाठी अकोला जिल्ह्याचा जिल्हास्तरीय कृती आराखडा तयार होणार
  • गावोगावी पिण्याचे पाणी, जनावरे आणि दुष्काळ निवारणासाठी उपाययोजनांचे नियोजन
  • अनावश्यक नवीन बांधकामांना तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय होण्याची शक्यता
अकोला : टंचाई निवारणासाठी जिल्हास्तरीय कृती आराखडा तयार करण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हाधिकारी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक नियोजन करणार आहेत. ही बैठक पुढील पाच ते सहा दिवसांत होण्याची शक्यता आहे. अनावश्यक नवीन बांधकामांना तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला जाणार असून, त्यासाठी निश्चित निकषही ठरविण्यात येणार आहेत.

जून व जुलै महिन्यांत अत्यल्प आणि खंडित पाऊस झाल्याने पेरणीला विलंब झाला. त्यानंतर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांतही पावसाचे प्रमाण अनियमित राहिल्याने सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आणि मका यांसह सर्वच खरीप पिकांना मोठा फटका बसला. जमिनीतील ओलावा संपल्याने अनेक ठिकाणी पिके कोमेजली असून, उत्पादनात मोठी घट झाली आहे. विहिरी आणि बोअरवेल आटल्याने पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाच्या दीर्घ खंडामुळे शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या असून, दुष्काळ जाहीर झाल्यानंतर आता दुष्काळ निवारणासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हास्तरीय कृती आराखडा तयार केला जाणार आहे.

याशिवाय, मदत व पुनर्वसन विभाग आणि पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडून तयार करण्यात येणाऱ्या टंचाई कृती आराखड्यातील ज्या कामांसाठी राज्य शासनाचा निधी उपलब्ध आहे, त्याच कामांना अन्य निधीतून पुन्हा मंजुरी देण्यात येऊ नये, अशी तरतूद करण्यात आली आहे. संबंधित विभागांकडून आवश्यक माहिती प्राप्त करून १५ दिवसांच्या आत तालुकानिहाय व कामनिहाय जिल्हास्तरीय कृती आराखडा तयार करून तो टंचाई कृती आराखड्‌याशी एकात्मिक करावा लागणार आहे.

संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा मंजूर

जिल्ह्यात जून २०२७ पर्यंत उद्भवू शकणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १२९ कोटी ८४ लाख ४ हजार रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा मंजूर केला आहे. हा आराखडा अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे सादर करण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील ७३९ गावांसाठी विविध प्रकारच्या २ हजार २९९ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता आवश्यक उपाययोजनांना प्राधान्य देऊन त्यांची प्रभावी व वेळेत अंमलबजावणी करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

कायमस्वरूपी जलस्रोतांचे बळकटीकरण करा

वारंवार पाणीटंचाई निर्माण होणाऱ्या गावांसाठी तातडीच्या उपाययोजना करण्यासोबतच कायमस्वरूपी जलस्रोतांचे बळकटीकरण आणि नवीन जलस्रोतांची निर्मिती करण्यावरही बैठकीत चर्चा होणार आहे. कृती आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने शासन निर्णयात विविध मार्गदर्शक तत्त्वे नमूद करण्यात आली आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संबंधित विभागांच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.

FAQ

1. अकोला जिल्ह्यात कृती आराखडा कशासाठी तयार करण्यात येणार आहे?
दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरीय कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे.

2. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक कधी होणार आहे?
पुढील पाच ते सहा दिवसांत जिल्हाधिकारी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची शक्यता आहे.

3. पावसाअभावी कोणत्या पिकांना फटका बसला आहे?
सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आणि मका यांसह सर्वच खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे.

Web Title: Action plan for drought mitigation nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 02:21 PM

Topics:  

  • akola news
  • drought news

संबंधित बातम्या

Akola News: अकोल्यातील तरुणाचा इंदूरमध्ये संशयास्पद मृत्यू! जादूटोणा अन् नरबळीचा कुटुंबीयांचा गंभीर आरोप
1

Akola News: अकोल्यातील तरुणाचा इंदूरमध्ये संशयास्पद मृत्यू! जादूटोणा अन् नरबळीचा कुटुंबीयांचा गंभीर आरोप

Akola News: अकोल्यातील २९ वर्षीय तरुणाचा इंदूरमध्ये संशयास्पद मृत्यू; गुप्तधनासाठी नरबळी दिल्याचा कुटुंबीयांचा आरोप
2

Akola News: अकोल्यातील २९ वर्षीय तरुणाचा इंदूरमध्ये संशयास्पद मृत्यू; गुप्तधनासाठी नरबळी दिल्याचा कुटुंबीयांचा आरोप

Akola News: रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गर्भवती महिलेकडे कर्जवसुलीचा तगादा; मायक्रो फायनान्स कर्मचाऱ्याला जाब
3

Akola News: रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गर्भवती महिलेकडे कर्जवसुलीचा तगादा; मायक्रो फायनान्स कर्मचाऱ्याला जाब

अकोल्यात विनानंबर टँकरचा अक्षरश: सुळसुळाट; महानगरपालिका प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष
4

अकोल्यात विनानंबर टँकरचा अक्षरश: सुळसुळाट; महानगरपालिका प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.