Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ग्लोबल कोकण महोत्सव गाजला ! 2 लाखांहून अधिक लोकांचा प्रतिसाद, कोकणच्या उद्योग आणि संस्कृतीला नवी चालना!

ग्रामीण कोकणच्या विकासासाठी संजय यादवराव यांनी बनवलेली व्यवस्था शासकीय कारणांमुळे मागे पडली होती.मात्र ग्राम विकास मंत्री योगेश कदम यांनी ती प्रभावीपणे राबवण्याचं आश्वासन दिलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 10, 2025 | 07:06 PM
ग्लोबल कोकण महोत्सव गाजला !  2 लाखांहून अधिक लोकांचा प्रतिसाद, कोकणच्या उद्योग आणि संस्कृतीला नवी चालना!
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई 10 मार्च 2025 : ग्लोबल कोकण महोत्सवाने यंदा सगळे विक्रम मोडले! तब्बल 2 लाखांहून अधिक लोकांनी 4 दिवसाच्या या महोत्सवाला भेट दिली, तर शेवटच्या दिवशीच 1लाख लोकांनी कोकणाचं वैभव अनुभवायला हजेरी लावली. कोकणात व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्या 1000 नवोदित उद्योजकांनी बिझनेस कॉन्क्लेव्हमध्ये मार्गदर्शन घेतलं.

उद्योग मंत्री उदय सामंत, भरत गोगावले, ग्लोबल कोकण फेस्टिवलचे अध्यक्ष्य संजय यादवराव यांच्या मागर्दशनाखाली आता ग्लोबल कोकण महोत्सव आता कोकणातल्या समुद्रकिनाऱ्यांवरही रंगणार, ज्यामुळे स्थानिकांना अधिक संधी मिळतील आणि कोकणात पर्यटक देखील येतील .ग्रामीण कोकणच्या विकासासाठी संजय यादवराव यांनी बनवलेली व्यवस्था शासकीय कारणांमुळे मागे पडली होती.मात्र ग्राम विकास मंत्री योगेश कदम यांनी ती प्रभावीपणे राबवण्याचं आश्वासन दिलं आहे. यामुळे कोकणच्या पर्यटन आणि कृषी पर्यटन व्यवसायाला अधिक गती मिळणार आहे.विदेशातून कोकणात परतलेली नुपूर हिने गुहागरमध्ये होमस्टे सुरू करून पुन्हा कोकणातच राहण्याचा निर्णय घेतला, तर पूर्ण मानसी यादवराव यांनी कोकणला डेस्टिनेशन वेडिंग आणि फॅमिली व्हेकेशनसाठी लोकप्रिय करण्यासाठी स्वतःची पर्यटन कंपनी सुरू केली.

महोत्सवाचं उद्घाटन फलोत्पादन मंत्री भारत गोगावले व इतर मान्यवरांच्या हस्ते झाले.यावेळी ते म्हणाले, “अस्सल कोकण पाहायचं असेल, त्याची चव घ्यायची असेल, तर हा महोत्सव नक्की अनुभवावा.” ‘स्टार्ट अप कोकण – मेक इन कोकण’ या भन्नाट संकल्पनेमुळे कोकणच्या विकासाला मोठी चालना मिळाली. राहुल कॉलेज ऑफ एजुकेशन संस्थेच्या मदतीने कोकणातील स्टार्टअप्सना थेट आयपीओपर्यंत पोहोचवण्याची योजना आहे!ग्लोबल कोकण फेस्टिव्हलमध्ये 500 हून अधिक उद्योजकांनी सक्रिय सहभाग नोंदवला, ज्यामुळे कोकणातील उद्योग क्षेत्राला मोठा चालना मिळाला आहे. उद्योग विस्तार, गुंतवणूक आणि नवे उपक्रम यावर भर देत कोकणातील उद्योगसृष्टी समृद्ध करण्यासाठी हे व्यासपीठ महत्त्वाचे ठरले आहे.

या फेस्टिव्हलमध्ये1000 हून अधिक लोकांनी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले, ज्यामुळे नवउद्योजक आणि विद्यार्थ्यांना व्यवसाय व रोजगाराच्या संधींबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. नवीन तंत्रज्ञान, स्टार्टअप आणि उद्योग धोरणांबाबत जागरूकता निर्माण होत असून, युवकांचा व्यवसाय व उद्योग क्षेत्रातील सहभाग वाढताना दिसत आहे.या फेस्टिव्हलमध्ये पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त उद्योगांवर विशेष भर देण्यात आला. निसर्गसंपत्तीचे संरक्षण आणि विकास यांचा समतोल राखत पुढे जाण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. औद्योगिक प्रगतीसोबतच कोकणातील पारंपरिक शेती, मत्स्यव्यवसाय आणि पर्यावरणपूरक व्यवसायांना चालना देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

कोकणातील उद्योग आणि व्यवसाय क्षेत्राला चालना मिळावी म्हणून कोकण चेंबर ऑफ कॉमर्समध्ये ३०० नवीन नोंदण्या झाल्या आहेत. यामुळे स्थानिक उद्योजकांना अधिक संधी मिळणार असून, व्यावसायिक नेटवर्क वाढण्यास मदत होणार आहे. संपूर्ण वर्षभर नवनवीन उपक्रम, उद्योग मेळावे आणि व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जाणार आहेत, जे नवउद्योजक आणि व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरणार आहेत. या उपक्रमांमुळे कोकणातील आर्थिक प्रगतीला चालना मिळेल आणि नवीन रोजगार संधीही निर्माण होतील.

चार दिवस चाललेल्या महोत्सवात लोककला सादरीकरण, कोळी नृत्य, पालखी नृत्य, तारपा, गोंधळ, जाखडी, आणि गौरी नृत्य यासारख्या पारंपरिक कलांनी रंगत आणली. ग्लोबल कोकण महोत्सवात संगीतप्रेमींसाठी खास कार्यक्रम सादर करण्यात आला – ‘लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी’. प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा कार्यक्रम मराठी भाषेचा, संस्कृतीचा आणि अभिमानाचा अनोखा उत्सव ठरला.

यंदा पहिल्यांदाच मराठी तरुणांसाठी हिप-हॉप आणि रॅप संगीताचा भव्य कार्यक्रम झाला. Rukus Avenue Radio (USA) च्या सहकार्याने हिप-हॉप, रॅप, बीटबॉक्सिंग, आणि फ्रीस्टाईल परफॉर्मन्समुळे तरुणाईला जागतिक व्यासपीठ मिळालं.त्याचसोबत, हिंदू धर्मातील समृद्ध परंपरेचं दर्शन घडवणारा दशावतार नाट्यप्रकारही लोकांना भावला. भगवान विष्णूंच्या दहा अवतारांची भव्य सादरीकरणं पाहताना प्रेक्षक भारावून गेले.हा महोत्सव म्हणजे कोकणाच्या गौरवशाली वारशाला ग्लोबल स्तरावर नेणारी क्रांती आहे. पुढच्या वर्षी कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांवरही हा सोहळा गाजेल, हे नक्की! असं सांगण्यात आलं आहे.

Web Title: Global konkan festival a hit response from more than 2 lakh people new impetus to konkans industry and culture

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2025 | 07:06 PM

Topics:  

  • Kokan News
  • maharashtra
  • Sindhudurg District

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.