Golden data by Maharashtra government help to identify bogus beneficiaries
Maharashtra Golden Data : मुंबई : राज्य सरकारकडून अनेक योजना जाहीर करण्यात येतात. राज्यातील जनेतेचे याचा लाभ घ्यावा असेच आवाहन केले जाते. मात्र अनेकदा एका समाजातील घटकासाठी किंवा समुदायासाठी जाहीर केलेल्या योजनेचा लाभ दुसरा घटक पात्र नसताना योजनेचा लाभ घेत असतो. राज्य सरकारला याचा मोठा प्रत्यय लाडकी बहीण योजनेच्या वेळेस आला आहे. यानंतर सरकारकडून मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. राज्यातल्या नागरिकांचा ‘गोल्डन डेटा’ तयार करण्यात आला आहे. यामधून बोगस लाभार्थी लगेच लक्षात येणार आहेत.
आगामी 2 ऑक्टोबर 2025 रोजी सरकार गोल्डन डेटा जाहीर करणार आहे. सरकारी योजनांतील बोगस लाभार्थी शोधण्यासाठी गोल्डन डेटा तयार करण्यात आला आहे. यामध्ये राज्यातील नागरिकांची संपूर्ण माहिती असणार आहे. या माहितीचा वापर सरकारला योजना आखताना, जाहीर करताना आणि नंतर आढावा घेताना होणार आहे. राज्य सरकारच्या या गोल्डन डेटामुळे कोणता नागरिक कोणकोणत्या योजनांचा लाभ आणि फायदा घेत आहे याची इत्यंभूत माहिती मिळणार आहे. यामुळे बोगस लाभार्थ्यांना वचक बसवण्यास मदत होणार आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सरकारच्या या गोल्डन डेटामध्ये महाराष्ट्रातील सर्व नागरिकांची माहिती असणार आहे. प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकाचा एका क्लिकवर संपूर्ण डेटा उपलब्ध होणार आहे. यामध्ये आर्थिक, सामाजिक, भौगोलिक माहिती असणार आहे. यासाठी राज्यसरकारकडून साधारणतः 14 ते 15 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. सरकारच्या या गोल्डन डेटामुळे सरकारचे पुढील अनेक पैसे वाचणार आहेत. कारण यापुढे कोणतीही योजना जाहीर करताना किंवा आखताना सर्व्हे करण्याची गरज राहणार नाही. सरकारकडे राज्यातील सर्व नागरिकांची माहिती उपलब्ध असणार आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
एवढेच नाही तर गोल्डन डेटामधूनच लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थ्यांना शोधता आले आहे. या डेटामधूनच जवळपास 26 लाख बोगस लाभार्थी लाडकी बहीण योजनेतून पुढे आलेत. त्यामुळे इथून पुढे जर कोणती योजना राबवायची असेल, तर कोणत्या जिल्ह्यात किती आर्थिक उत्पन्न असलेले किती वयोगटापर्यंत लाभार्थी आहेत. यापासून सर्व माहिती एका क्लिकवरती उपलब्ध होणार आहे. या गोल्डन डेटाचा वापर करून अनेक बोगस लाभार्थी राज्य सरकारच्या योजनेतून कमी करण्यास मोठी मदत होणार आहे. यामुळे सरकारी तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या बोगस लाभार्थ्यांना मोठा फटका बसणार आहे.
बोगस लाडक्या बहिणींना टोला
राज्य सरकारकडून गोल्डन डेटा तयार करताना तो योग्य आणि परिपूर्ण राहिल याची काळजी घेण्यात आली होती. यासाठी अंगणवाडी सेविकांना घरोघर जाऊन सर्व्ह करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यात 65 वर्षांवरील महिला आणि एकाच घरातील दोन पेक्षा जास्त लाभ घेत असलेल्या महिलांचा सर्व्हे करण्यात आला आहे. एकाच घरातील दोनपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेणाऱ्यांची संख्या 7 लाख 97 हजार एवढी असल्याचं समोर आलंय. या महिलांच्या खात्यात अद्याप 1 हजार 197 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. तर 65 वयाच्या पुढील 2 लाख 87 हजार महिलांनी या योजनेचा लाभ उचलल्याचं समोर आलंय. या महिलांच्या खात्यात 431 कोटी 70 लाख रुपये जमा झालेत. या महिलांवर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही.संपूर्ण अहवाल राज्य सरकारच्या हाती आल्यानंतर काय कारवाई करायची यावर निर्णय घेतला जाणार आहे.