मयुर फडके, मुंबई : गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणात (Goregaon Patrachawl Scam Case) एचडीआयएलचे प्रवर्तक सारंग आणि राकेश वाधवान (HDIL Promoters Sarang and Rakesh Wadhawan) हे मुख्य आरोपी (Main Accused) होते. त्यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचे (Money Laundering) आरोप असतानाही त्याना या प्रकरणी अटक का केली नाही ? अशी विचारणा शनिवारी उच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालय(Ed) कडे केली. तसेच संजय राऊत (Sanjay Raut) यांचा जामीन रद्द (Bail Cancel) करण्याबाबत ठोस पुरावे असल्यास पुढील सुनावणीदरम्यान सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने ईडीला दिले.
गोरेगाव पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणात ईडीने बेकायदेशीरपणे अटक केल्याचे स्पष्ट करून विशेष पीएमएलए न्यायालयाने संजय राऊतांची ९ नोव्हेंबर रोजी दोन लाखांच्या वैयक्तिक मुचलक्यावर जामीनावर सुटका केली. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात ईडीने उच्च न्यायालयात अपील दाखल करून जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. त्यानुसार, शनिवारी न्या. नितीन बोरकर यांच्यासमोर ईडीच्यावतीने अतिरिक्त सॉलीसिटर जनरल अनिल सिंग यांनी युक्तिवाद केला.
[read_also content=”शेजारच्या भाडेकरूने केला गोळीबार, वडील-मुलगा जखमी, कशावरून झालं भांडण; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/crime/delhi-crime-news-father-son-duo-shot-at-over-parking-dispute-in-yamuna-vihar-nrvb-370553.html”]
सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी चुकीच्या आणि अप्रासंगिक माहितीच्या आधारावर राऊतांना जामीन मंजूर केला. तसेच न्यायाधीशांनी अधिकार क्षेत्राची मर्यादा ओलांडून या प्रकरणात आवश्यक नसलेलीही निरीक्षणे नोंदवली. त्यांनी मूळ (ज्या आधारे ईडीने प्रकरणात गुन्हा दाखल केला) गुन्ह्याविरोधात निकाल दिला आहे. याप्रकणात प्रतिवादी नसलेल्या म्हाडाविरोधातही न्यायाधीशांनी निष्कर्ष नोंदवले आहेत. ज्यांची काही आवश्यकता नव्हती, अशी काही निरीक्षणेही न्यायालयाने आदेशात नोंदवली आहेत. आदेशात जामीन मंजूर करताना मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) कलम ४५ अंतर्गत दुहेरी अटीं चुकीच्या पद्धतीने लागू केल्या आहेत. हा एक स्वतंत्र गुन्हा असून हत्येपेक्षा गंभीर आहे. त्यामुळे हे कृत्य करणार्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणीही एएसजी सिंग यांनी न्यायालयाकडे केली.
दुसरीकडे, सारंग आणि राकेश वाधवन या प्रकरणातील मुख्य आरोपींविरुद्ध दाखल केलेल्या आरोपपत्राचे वाचन एएसजी करत असताना ईडीने या दोघांना अटक का केली नाही?, अशी विचारणा न्यायालायने केली. दोघेही वाधवान इतर काही गुन्ह्यांसाठी आधीच न्यायालयीन कोठडीत असल्याने त्यांच्या अटकेची आवश्यकता नव्हती, तथापि, त्यांचे जबाब ईडीने नोंदवल्याचे एएसजींनी न्यायालयाला सांगितले.
[read_also content=”काळजाचा थरकाप उडवणारी बातमी! माता न तू वैरिणी, ७ वर्षाच्या मुलीला कोळसा टाकून जाळलं, पंख्याला लटकवलं; वाचा कुठे घडलीये ही धक्कादायक घटना https://www.navarashtra.com/crime/horrible-crime-delhi-seven-year-old-daughter-burnt-coal-hanged-on-fan-shocking-incident-accused-arrested-nrvb-370546.html”]
त्यांची बाजू ऐकल्यानंतर राऊतांच्या विरोधात ठोस पुरावे आणि त्यासंबंधित अन्य काही खटल्यांचे संदर्भ असल्यास न्यायालयात सादर करण्याचे आदेश देऊन न्यायालयाने सुनावणी २ मार्च रोजी निश्चित केली.