Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Government Employees: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियाचे नवे नियम; सरकारवर टीका केली तर होणार कडक कारवाई

राज्य सरकारने सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापरासाठी नवी नियमावली लागू केली आहे. सरकारच्या धोरणांवर किंवा राजकीय घडामोडींवर प्रतिकूल टिप्पणी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. गोपनीय माहिती शेअर करणे, शासकीय पदनाम किंवा लोगोचा गैरवापर केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 29, 2026 | 12:48 PM
maharashtra (फोटो सौजन्य: AI)

maharashtra (फोटो सौजन्य: AI)

Follow Us
Follow Us:
  • सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारच्या धोरणांवर सोशल मीडियावर टीका करण्यास मनाई.
  • शासकीय पदनाम, लोगो, गणवेश किंवा गोपनीय माहितीचा वापर करण्यावर निर्बंध.
  • नियमांचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार कडक शिस्तभंगाची कारवाई.
मुंबई: राज्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापरावर आता अधिक कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्य सरकारने नव्या मार्गदर्शक सूचना जारी करत सोशल मीडियावर सरकारच्या धोरणांवर किंवा राजकीय घडामोडींवर प्रतिकूल टिप्पणी करण्यास मनाई केली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रकाद्वारे दिला आहे.

गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियाचा वापर झपाट्याने वाढला आहे. अनेक सरकारी अधिकारी आणि कर्मचारी वैयक्तिक सोशल मीडिया खात्यांवर विविध प्रकारच्या पोस्ट करत असल्याचे समोर आले होते. काही प्रकरणांमध्ये सरकारी धोरणांवर सार्वजनिक भाष्य करणे, गोपनीय माहिती उघड करणे, तसेच शासकीय पद, लोगो किंवा गणवेशाचा वापर करून पोस्ट आणि रील्स तयार केल्याचेही निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय शिस्त आणि गोपनीयता कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारने ही नियमावली लागू केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाकडून SD Corporation ला दिलासा! कथित मानहानीकारक सोशल मीडिया पोस्ट्सवर अंतरिम निर्बंध

नवीन नियम काय?

टीका करण्यास मनाई

राज्य सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, राज्य अथवा केंद्र सरकारच्या विद्यमान किंवा अलीकडील धोरणांवर, निर्णयांवर किंवा राजकीय घडामोडींवर प्रतिकूल टिप्पणी अथवा टीका करण्यास सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मनाई करण्यात आली आहे. तसेच आक्षेपार्ह, द्वेषमूलक, मानहानीकारक किंवा समाजात तेढ निर्माण करणारा कोणताही मजकूर सोशल मीडियावर पोस्ट, शेअर किंवा फॉरवर्ड करता येणार नाही.

शासकीय गणवेश आणि…

सरकारी कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक आणि कार्यालयीन सोशल मीडिया खाती पूर्णपणे स्वतंत्र ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. वैयक्तिक खात्यावर शासकीय पदनाम, विभागाचा लोगो, गणवेश, सरकारी वाहने किंवा शासकीय इमारतींचा वापर करून फोटो, व्हिडिओ किंवा रील्स पोस्ट करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

शासकीय कागदपत्रे शेअर करण्यात मनाई

याशिवाय सक्षम प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणतेही गोपनीय दस्तऐवज, शासकीय कागदपत्रे किंवा संवेदनशील माहिती सोशल मीडियावर शेअर करता येणार नाही. शासकीय कामाशी संबंधित माहिती पोस्ट करताना त्यातून स्वतःची प्रसिद्धी किंवा स्वयंप्रशंसा होणार नाही, याचीही विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

WhatsApp आणि Telegramचा अधिकृत वापर

शासकीय योजना, जनजागृती आणि कार्यालयीन समन्वयासाठी व्हॉट्सअॅप, टेलिग्राम यांसारख्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा अधिकृत वापर करता येणार आहे. मात्र, केंद्र किंवा राज्य सरकारने बंदी घातलेल्या कोणत्याही संकेतस्थळांचा किंवा मोबाईल अॅप्सचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.

काय होणार कारवाई ?

राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की, ‘महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९’ हे सोशल मीडिया वापरासाठीही लागू राहतील. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर ‘महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९’ अंतर्गत कडक शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही परिपत्रकात देण्यात आला आहे.

मान्सूनची मेहरबानी! मुंबईला पाणीपुरवठा करणारे ७ तलाव ८८.८१% भरले. १०% पाणी कपात कायम !

💡

Frequently Asked Questions

  • Que: राज्य सरकारने नवे नियम कोणासाठी लागू केले आहेत?

    Ans: सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी.

  • Que: सोशल मीडियावर कोणत्या प्रकारच्या पोस्टवर बंदी घालण्यात आली आहे?

    Ans: सरकारच्या धोरणांवरील प्रतिकूल टिप्पणी आणि गोपनीय माहिती शेअर करण्यावर.

  • Que: नियमांचे उल्लंघन केल्यास काय कारवाई होणार?

    Ans: महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार शिस्तभंगाची कारवाई.

Web Title: Government employees new social media rules for government employees strict action to be taken for criticizing the government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 12:48 PM

Topics:  

  • Government Employees
  • maharshtra
  • Social Media

संबंधित बातम्या

भारतात 18 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंदी? सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडून मागितले उत्तर
1

भारतात 18 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंदी? सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडून मागितले उत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.