Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जुनी पेन्शनसह इतर मागण्यांसाठी तंत्रशिक्षण विभाग महाविद्यालयातील शासकीय कर्मचारी बेमुदत संपावर

महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण विभाग कर्मचारी संघटना यांनी १४ डिसेंबरपासून जुनी पेन्शन लागू करणे आणि इतर अन्य मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 15, 2023 | 02:47 PM
जुनी पेन्शनसह इतर मागण्यांसाठी तंत्रशिक्षण विभाग महाविद्यालयातील शासकीय कर्मचारी बेमुदत संपावर
Follow Us
Follow Us:

कराड : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण विभाग कर्मचारी संघटना यांनी १४ डिसेंबरपासून जुनी पेन्शन लागू करणे आणि इतर अन्य मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला. या संपात कराड येथील शासकीय औषधनिर्माण महाविद्यालय शासकीय अभियांत्रिकी महावि‌द्यालय आणि शासकीय तंत्रनिकेतन कराड येथील सर्व कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झाले आहेत.

या संपासाठी राजपत्रित अधिकारी महासंघाने पाठिंबा दिला असून, तिन्ही संस्थेतील राजपत्रित अधिकाऱ्यांनी १४ डिसेंबरला एक दिवसाची सामुदायिक रजा घेतली होती, अशी माहिती महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण विभाग कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष दिलीपराव कांबळे यांनी दिली.

यावेळी दिलीपराव कांबळे म्हणाले की, नवीन पेन्शन योजना कर्मचाऱ्यांसाठी अन्यायकारक असून, कर्मचाऱ्यांच्या हिताची नाही. त्यामुळे शासनाने नवी पेन्शन योजना लवकरात लवकर रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी. ही लढाई आर या पारची असून, जुनी पेन्शनबाबतचा ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या मार्गदर्शनाखाली लढा चालू राहील. यावेळी त्यांनी संपात सामील झालेल्या जुनी पेन्शन घेत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे विशेष आभार मानले.

१४ डिसेंबर रोजी सकाळी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तिन्ही संस्थेच्या प्रवेशव्दारावर एकत्र येऊन निदर्शने केली. त्यानंतर तहसीलदार कार्यालय कराड येथे कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. यावेळी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण विभाग कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष दिलीपराव कांबळे, पुणे विभागाचे अध्यक्ष राजेश गायकवाड, स्थानिक संघटनेचे अध्यक्ष राहुल जाधव, सचिव गहिनीनाथ काळे, ए. एस, वाडते, सोमनाथ ताटे, धनाजी कांबळे, संजय निकम, बबन सूर्यवंशी, पुष्पा खाडे, तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी, सर्व राजपत्रित अधिकारी, कर्मचारी, महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Government employees of technical education department college on indefinite strike for old pension and other demands nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2023 | 02:47 PM

Topics:  

  • maharashtra
  • old pension scheme

संबंधित बातम्या

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
1

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
2

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
3

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
4

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.