Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

गोंदियातील मुंडीपार एमआयडीसी परिसरात रात्रपाळीसाठी निघालेल्या 58 वर्षीय व्यक्तीची धारदार शस्त्राने हत्या झाली. अवघ्या 24 तासांत पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत 2 प्रौढांसह 2 विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 25, 2026 | 07:44 PM
Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
Follow Us
Follow Us:
  • मुंडीपार एमआयडीसी परिसरात रात्रपाळीसाठी जात असलेल्या वृद्धाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली.
  • जादूटोण्याच्या संशयातून हल्ल्याचा कट रचल्याचा पोलिसांचा तपास, 2 प्रौढांसह 2 बालके ताब्यात.
  • स्थानिक गुन्हे शाखेने गावातील चर्चेच्या आधारे तपास करत अवघ्या 24 तासांत हत्येचा उलगडा केला.
गोंदिया मधील मुंडीपार मध्ये एमआयडीसी येथे रात्रपाळीच्या कामावर जात असलेल्या व्यक्तीची धारदार शस्त्राने हत्या केल्याच्या घटनेचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासात उलगडा केला. जादूटोण्याच्या संशयातून हा खून केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. याप्रकरणी जितेंद्र कोहळे (४५) आणि कमलेश अशोक नेवारे (१९), दोघेही रा. टॉवरटोली, मुंडीपार यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई गुरुवारी करण्यात आली. याबाबत विक्की रविशंकर रहांगडाले (३१, रा. मुंडीपार) यांनी गंगाझरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांचे वडील रविशंकर (५८) हे रविवारी रात्रपाळीच्या कामासाठी दुचाकीने व्यंकटेश राईस मिल, एमआयडीसी मुंडीपार येथे जात होते. दरम्यान, चमडा फॅक्टरीजवळील रस्त्यावर रात्री ७.४५ ते८.१५ वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यावर धारदार हत्याराने वार करून त्यांची हत्या केली. या प्रकरणी गंगाझरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Gondiya News: बाळापाठोपाठ मातेचाही मृत्यू! गंगाबाई रुग्णालयातील घटना; डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप!

२४ तासात लावला खुनाला छडा, गावातील चर्चेतून संशयितांपर्यंत धागा

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना मृत रविशंकर हे जादूटोणा करीत असल्याची गावात चर्चा असल्याची माहिती मिळाली. या कारणावरून काही जणांचा त्यांच्यावर रोष असल्याचेही समोर आले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कमलेशला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत त्याने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या कुटुंबातील दोन व्यक्तीच्या मृत्यूला तसेच कुटुंबातील सदस्यांच्या वारंवार बिघडणाऱ्या प्रकृतीला रविशंकरने केलेला जादूटोणा कारणीभूत असल्याचा त्याचा समज होता. त्याचप्रमाणे गावातील अन्य कुटुंबांतील मृत्यू आणि आजारपणासाठीही रविशंकरला जबाबदार धरले जात असल्याचे तपासात समोर आले.

Gondiya News: रोजगाराचा शोध काळाने रस्त्यावरच संपवला!  गोंदियामध्ये ट्रकच्या धडकेत मध्य प्रदेशातील ६ मजुरांचा मृत्यू

पाठलाग करून केला हल्ला

जादूटोण्याच्या संशयातून कमलेश, जितेंद्र आणि दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांनी रविशंकर यांचा खून करण्याचा कट रचला. रविवारी सायंकाळी आरोपींनी रविशंकरचा पाठलाग करून कुऱ्हाडीने डोक्यावर वार करून त्यांची हत्या केली.

Web Title: Mundipar murder case witchcraft suspicion police investigation auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 07:44 PM

Topics:  

  • gondiya
  • india
  • maharashtra

संबंधित बातम्या

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
1

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
2

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट
3

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट

Ganeshotsav 2026: गणेश विसर्जनासाठी मीरा-भाईंदर महापालिका सज्ज; यंदा जेट्टीमधून मोठ्या मूर्तींचे विसर्जन
4

Ganeshotsav 2026: गणेश विसर्जनासाठी मीरा-भाईंदर महापालिका सज्ज; यंदा जेट्टीमधून मोठ्या मूर्तींचे विसर्जन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.