Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : गरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव; कोल्हापुरात शिक्षण हक्क परिषद आक्रमक

१५ मार्च २०२५ रोजी नवीन संच मान्यतेचा अध्यादेश प्रसिद्ध केला. ही संच मान्यता करून सध्या शिक्षक समायोजन करण्याची प्रक्रिया सुरू केली. या संचमान्यतेनुसार २३४ शाळा बंद केल्याची कबुली शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 01, 2026 | 12:59 PM
Kolhapur News : गरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव; कोल्हापुरात शिक्षण हक्क परिषद आक्रमक
Follow Us
Close
Follow Us:
  • गरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव
  • कोल्हापुरात शिक्षण हक्क परिषद आक्रमक
कोल्हापूर : १५ मार्च २०२५ रोजी नवीन संच मान्यतेचा अध्यादेश प्रसिद्ध केला. ही संच मान्यता करून सध्या शिक्षक समायोजन करण्याची प्रक्रिया सुरू केली. या संचमान्यतेनुसार २३४ शाळा बंद केल्याची कबुली शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सभागृहात नुकतीच दिली आहे. त्यामुळे भांडवलदारांच्या सरकारने सर्वसामान्यांच्या शिक्षणावर घाला घालण्याचे काम केले आहे, असा आरोप करत राज्यातील २० पटाखाली एकही शाळा बंद होऊ देणार नाही, असा सूर कोल्हापुरातील शिक्षण हक्क परिषदेत उमटला. कोल्हापूर येथील चंदगड येथून शिक्षण हक्क यात्रेला प्रारंभझाला. ही यात्रा आजरा, भुदरगड, राधानगरी मार्गे कोल्हापुरात शनिवारी दाखल झाली. त्यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून समाधी स्थळ येथे शिक्षण हक्क परिषद घेण्यात आले.

सरकारचे धोरण रत्यावरच्या लढाईने हाणून पाडणार
अध्यक्षस्थानावरून बोलताना खासदार श्रीमंत छत्रपती यांनी, कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचे धोरण रस्त्यावरची तीव्र लढाई करून आम्ही हाणून पाडू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विधानसभा व लोकसभेत बोटावर मोजण्याइतके पुरोगामी विचाराचे आमदार, खासदार आहेत. त्यांना सभागृहात प्रश्न मांडून, एकमताने मंजूर करण्यास मर्यादा येतात. त्यामुळे भविष्यात पुरोगामी विचाराचे आमदार, खासदार निवडून दिले तरच सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळेल, असा विश्वास खासदार श्रीमत शाहू छत्रपती यांनी व्यक्त केला.

देशात २ कोटी ९६ लाख विद्यार्थी शाळाबाह्य होण्याची शक्यता यावेळी वर्तविण्यात आली
आ. जयंत आसगावकर म्हणाले, २० पटाखालील शाळा बंद करणार नाही, असा शब्द दिला. दुसरीकडे १५ मार्च २०२५ ला संच मान्यतेचा नवा अध्यादेश जाहीर करून शाळा बंद करण्याचा डाव आखला आहे. जोपर्यंत नवीन संच मान्यतेचा आदेश रद्द होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा विश्वास आ. आसगावकर यांनी व्यक्त केला. संपत देसाई यांनी परिषदेची भूमिका मांडली. जिल्ह्यातील माध्यमिक ३६ तर प्राथमिकच्या २३४ शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे त्यांनी सांगितले, शैक्षणिक व्यासपीठचे अध्यक्ष एस. डी. लाड, निमंत्रक विजय देवणे, भरत रसाळे यानी राज्यातील एकही शाळा बंद होऊ देणार नाही, यासाठी राज्यभर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला. रसाळे यांनी आमदार सतेज पाटील यांचा संदेश वाचून दाखवला. देशभरातील ९३ हजार शाळा बंद होत असून जवळपास २ कोटी ९६ लाख विद्यार्थी शाळाबाह्य होण्याची शक्यता आहे, असे सांगितले.

Shaktipeeth Highway : महामार्गासाठी इंचभरही जमीन देणार नाही; तहसीलदार कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा

मंत्र्यांचे पीए आता बातम्या वाचतील
सध्याच्या सरकारमधील मंत्र्यांना बातम्या वाचणे हे जमत नसल्याने त्यांचे पीए या बातम्या वाचून त्यांना त्याचा अर्थ सांगतील. शिक्षण मंत्र्यांना त्यांच्या खात्याचा कारभार सांभाळता येतो का, असा आरोप राऊत यांनी नाव न घेता दादा भुसे यांच्यावर केला. तसेच मंत्री फिरतात आणि पीए लाच घेतात म्हणूनच मंत्रालयात घुसून धाडी पडू लागले आहेत, हे दुर्दैव आहे, अशी टीकाही राऊत यांनी मंत्री झिरवळ यांच्यावर केली.

गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव
या परिषदेचे प्रमुख पाहुणे माजी खा विनायक राऊत होते. तर खा. श्रीमंत शाहू छत्रपती यांनी अध्यक्षस्थान भूषवले. खा. विनायक राऊत यांच्या हस्ते मशाल पेटवून परिषदेला सुरुवात करण्यात आली. माजी खा. विनायक राऊत म्हणाले, राज्य सरकारने शिक्षणाचे व्यापारीकरण सुरू केले आहे. भांडवलदाराच्या सरकारने गोरगरिबांच्या मुलाना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव सुरू केला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करून खासगी शाळा सुरू करायचे असल्याचे लक्षात येते. सध्याचे सरकार दिशाहीन झाले आहेत. मंत्री भुसे यांनी शाळा बंद झाल्याची कबुली दिली. तर मुख्यमंत्री एकही शाळा बंद होणार नाही, असा निर्वाळा देतात यातून समन्वय नसल्याचे स्पष्ट होते.

Kolhapur News : गाळेधारकांकडे ३५ कोटी थकीत, भाडेवसुलीसाठी मार्ग काढा; महापौरांच्या इस्टेट विभागाला सूचना

 

Web Title: Governments plan to deprive the children of the poor from education education rights council aggressive in kolhapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 12:59 PM

Topics:  

  • kolhapur news

संबंधित बातम्या

Kolhapur News : शिवरायांच्या विचारांनी भारावला उत्तराखंडचा छोरा ; थेट सायकलवरुन 315 किल्ल्यांना भेट देण्याचा संकल्प
1

Kolhapur News : शिवरायांच्या विचारांनी भारावला उत्तराखंडचा छोरा ; थेट सायकलवरुन 315 किल्ल्यांना भेट देण्याचा संकल्प

Kolhapur News : कडाक्याच्या उन्हाळ्य़ात दरवाढीचा चटका ; आवक घटल्याने लिंबू महागला
2

Kolhapur News : कडाक्याच्या उन्हाळ्य़ात दरवाढीचा चटका ; आवक घटल्याने लिंबू महागला

Sangali News : लिंगायत समाजाचं प्रशासनाला निवेदन; मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाचा दिला इशारा
3

Sangali News : लिंगायत समाजाचं प्रशासनाला निवेदन; मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाचा दिला इशारा

Kolhapur News : आरोग्य यंत्रणेचे निघाले धिंडवडे;आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात डॉक्टरच मद्यधुंद
4

Kolhapur News : आरोग्य यंत्रणेचे निघाले धिंडवडे;आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात डॉक्टरच मद्यधुंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.