Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शस्त्रक्रियेनंतर १२ तासांत चालले आजोबा; जे.जे रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया, याआधीही झाली आहे बायोपोलर हेमीआर्थोप्लास्टी

तंत्रज्ञानातील आधुनिकतेमुळे , आधुनिक उपकरणांमुळे, साधन सामुग्रीतल्या सुसज्ज यंत्रणेमुळे व ही कौशल्ये आत्मसात करणाऱ्या प्रशिक्षित तज्ज्ञांमुळे शस्त्रक्रियेतली अचूकता वाढली आहे, धोकेही कमी झाले आहेत.

  • By Vivek Bhor
Updated On: Jan 15, 2023 | 10:06 PM
शस्त्रक्रियेनंतर १२ तासांत चालले आजोबा; जे.जे रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया, याआधीही झाली आहे बायोपोलर हेमीआर्थोप्लास्टी
Follow Us
Follow Us:

मुंबई : सांताक्रुझ (Santacruz) येथील ६९ वर्षीय सहव्याधीग्रस्त आजोबांनी (Grandpa) खुब्याच्या सांध्याच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर अवघ्या १२ तासांत स्वतःच्या पायावर उभे राहिले (Walking In 12 Hours). पाच वर्षांपूर्वी जे.जे. रुग्णालयात (J J Hospital) बायोपोलर हेमीआर्थोप्लास्टी (Bipolar Hemiarthroplasty) झालेल्या या रुग्णाला पुन्हा पायाच्या उजव्या बाजूला खुब्याच्या ठिकाणी फ्रॅक्चर असल्याचे निदान झाले. जे.जे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी जटील आणि गुंतागुतींची शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडल्याने आता आजोबांची प्रकृती स्थिर असून त्यांना पुन्हा पूर्ववत आयुष्य जगता येत आहे.

या रुग्णबाबत जे जे रुग्णालयाच्या अस्थिव्यंगरोग विभागाचे प्रमुख , सह प्राध्यापक डॉ. नदिर शाह यांनी सांगितले, या रुग्णावर रिव्हीजन हिप रिप्लेंसमेंट शस्त्रक्रिया (Revision Hip Replacement Surgery) करण्यात आली. प्रत्येक शस्त्रक्रिया ही जशी फायदेशीर आहे, तसे त्यात काही अंशी धोके असतातच.

[read_also content=”निळ्या रंगाच्या दोन पंखांनी उर्फी जावेदची लाज राखली, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले- इस ड्रेस को क्या नाम दूं? https://www.navarashtra.com/viral/urfi-javed-uorfi-share-new-viral-video-amid-chitra-wagh-controversy-netizens-funny-reaction-is-dress-ko-kya-naam-doon-nrvb-361935.html”]

तंत्रज्ञानातील आधुनिकतेमुळे , आधुनिक उपकरणांमुळे, साधन सामुग्रीतल्या सुसज्ज यंत्रणेमुळे व ही कौशल्ये आत्मसात करणाऱ्या प्रशिक्षित तज्ज्ञांमुळे शस्त्रक्रियेतली अचूकता वाढली आहे, धोकेही कमी झाले आहेत. मात्र वैद्यकीय इतिहास असणाऱ्या रुग्णांवरही शस्त्रक्रियापूर्व तपासणी व योग्य काळजी घेऊन आता शस्त्रक्रिया यशस्वी होतात.

सहज-सुलभ हालचाली करता येतात, दैनंदिन स्वतःची कामे, प्रवास करता येतो. आयुष्य परावलंबित्व होऊन जगण्यापेक्षा वेदनांपासून मुक्त होऊन जगण्याचा पर्याय केव्हाही चांगला आहे. जे. जे रुग्णालयात नुकतचं रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

…अन् १२ तासांत चालले

रुग्णाला उच्चरक्तदाब आणि मधुमेहाची समस्या आहे. त्यामुळे अशा रुग्णांना या शस्त्रक्रिया करताना अधिक धोका असतो. मात्र या रुग्णाने शस्त्रक्रियेनंतर अवघ्या १२ तासांत उभ राहून चालण्याचा प्रयत्न केला, तो यशस्वीही झाला. वय, आजार यानुसार असणारे धोके लक्षात घेऊन योग्य काळजी घेत शस्त्रक्रिया केली, त्यामुळे रुग्णास वेदनांपासून मुक्ती मिळाली.

[read_also content=”लैच भयंकर! करवतीसारख्या धारदार शस्त्राने केले श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे-तुकडे; एम्समध्ये झालं हाडांचं पोस्टमॉर्टम https://www.navarashtra.com/crime/shraddha-walkar-murder-case-update-bones-of-shraddha-postmatam-done-body-was-cut-with-saw-like-object-report-nrvb-361932.html”]

शस्त्रक्रिया अद्ययावत पद्धतीने

सहा वर्षांपूर्वी झालेल्या शस्त्रक्रियेत सिमेंटचा वापर करण्यात आला होता, यामुळे पाच वर्षांच्या कालावधीपर्यंत हालचाल सामान्य राहते. मात्र आता शस्त्रक्रियेची पद्धती अद्ययावत झाली आहेत. नव्याने झालेल्या शस्त्रक्रियेत सिमेंटचा वापर करण्यात आला नाही, मात्र तरीही वीस वर्षांपर्यंत खुब्याच्या सहाय्याने हालचालीस त्रास होत नाही.

Web Title: Grandpa walked 12 hours after revision hip replacement surgery bipolar hemiarthroplasty has been successfully performed at j j hospital mumbai nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2023 | 10:04 PM

Topics:  

  • Mumbai
  • walk

संबंधित बातम्या

Lalbaugcha Raja 2026: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आला अन्…; कुटुंबाने एकुलता एक कर्ता मुलगा गमावला
1

Lalbaugcha Raja 2026: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत आला अन्…; कुटुंबाने एकुलता एक कर्ता मुलगा गमावला

IIT Bombay Suicide: ChatGPT अन् आत्महत्या..! विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर IIT बॉम्बेत संताप; ४०० हून अधिक विद्यार्थ्यांचे आंदोलन
2

IIT Bombay Suicide: ChatGPT अन् आत्महत्या..! विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर IIT बॉम्बेत संताप; ४०० हून अधिक विद्यार्थ्यांचे आंदोलन

Devendra Fadnavis: मुंबईत UWA च्या इंडिया कॅम्पसचे उद्घाटन; शिक्षण-नवोपक्रमाला मिळणार जागतिक बळ
3

Devendra Fadnavis: मुंबईत UWA च्या इंडिया कॅम्पसचे उद्घाटन; शिक्षण-नवोपक्रमाला मिळणार जागतिक बळ

ED Officers Extortion:  ED च्या अधिकाऱ्यांनीन घातला व्यापाऱ्याला 2.25 कोटींचा गंडा; नेमकं घडलं काय?
4

ED Officers Extortion:  ED च्या अधिकाऱ्यांनीन घातला व्यापाऱ्याला 2.25 कोटींचा गंडा; नेमकं घडलं काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.