Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर्व कामे दर्जेदार अन् वेळेत पूर्ण करा, कामात हयगय करणाऱ्या ठेकेदारांवर…; नितेश राणे यांचे निर्देश

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पत्तन विभागाच्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयातील दालनात आयोजित बैठकीत घेण्यात आला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 08, 2026 | 06:30 PM
सर्व कामे दर्जेदार अन् वेळेत पूर्ण करा, कामात हयगय करणाऱ्या ठेकेदारांवर...; नितेश राणे यांचे निर्देश

सर्व कामे दर्जेदार अन् वेळेत पूर्ण करा, कामात हयगय करणाऱ्या ठेकेदारांवर...; नितेश राणे यांचे निर्देश

Follow Us
Follow Us:

सिंधुदुर्ग : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अपूर्ण व रखडलेल्या विकासकामांचे तातडीने वर्गीकरण करून आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. निधीअभावी, परवानगीअभावी किंवा इतर प्रशासकीय कारणांमुळे रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी विशेष यंत्रणा उभारून ती कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. तसेच विकासकामांमध्ये दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पत्तन विभागाच्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयातील दालनात आयोजित बैठकीत घेण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेताना त्यांनी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी प्रभावी नियोजन करण्यावर भर दिला.

यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता दिनेश बागुल तसेच पूजा इंगावले हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

जिल्ह्यातील नियोजित विकासकामांची घेतली सविस्तर माहिती

बैठकीत पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील नियोजित विकासकामांची सविस्तर माहिती घेतली. त्याचबरोबर विविध कारणांमुळे रखडलेल्या प्रकल्पांची स्थिती जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. विशेषतः जागेचा प्रश्न, विविध विभागांच्या परवानग्या किंवा स्थानिक पातळीवरील अडचणींमुळे प्रलंबित असलेल्या कामांबाबत संबंधित नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यासोबत बैठक घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. अशा बैठकीत सर्व संबंधितांचे म्हणणे ऐकून सकारात्मक आणि सर्वमान्य तोडगा काढण्यावर भर देण्यात यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा : प्राजक्त तनपुरे विधान परिषदेवर बिनविरोध; अहिल्यानगर ठरला राज्यातील सर्वाधिक आमदार असलेला जिल्हा!

अपूर्ण कामांचा नियमित आढावा घेण्याची आवश्यकता

पावसाळ्याच्या काळात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये आणि विकासकामांचा वेग मंदावू नये यासाठी अपूर्ण कामांचा नियमित आढावा घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्ह्यातील महत्त्वाच्या रस्ते, पूल, शासकीय इमारती तसेच पत्तन विभागाच्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा राहू नये यासाठी आवश्यक त्या सर्व प्रशासकीय प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

हे सुद्धा वाचा : किशोर मासाळ यांच्या वक्तव्यावरुन नगरसेवक आक्रमक; सुनेत्रा पवारांच्या ओएसडीकडे सह्यांचे निवेदन सादर

Web Title: Guardian minister nitesh rane took a detailed review of development works in sindhudurg district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • maharashtra
  • Nitesh Rane
  • Sindhudurg

संबंधित बातम्या

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
1

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
2

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज
3

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले
4

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.