Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Impact of Gulf War: आखाती युद्धाचा दूध व्यवसायाला मोठा फटका! प्लास्टिक दरवाढीमुळे डेअरी चालक संकटात

आखाती देशांतील (Middle East) युद्धाचा थेट संबंध महाराष्ट्रातील दूध व्यवसायाशी असणे सुरुवातीला कदाचित स्पष्ट वाटणार नाही, परंतु जागतिक बाजारपेठेतील साखळीमुळे याचे दूरगामी परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होतात.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 26, 2026 | 04:00 PM
Gulf War Impact: Rising Plastic Prices Put Dairy Business in Crisis

Gulf War Impact: Rising Plastic Prices Put Dairy Business in Crisis

Follow Us
Follow Us:
  • आखाती देशांतील युद्धामुळे प्लास्टिकच्या किमतीत मोठी वाढ
  • त्याचा थेट फटका दूध डेअरी व्यवसायाला बसत आहे
  • पॅकिंगचा खर्च वाढल्याने आणि निर्यात थांबल्याने व्यावसायिक अडचणीत
 

आखाती देशांत सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता स्थानिक स्तरावरही जाणवू लागला असून, प्लास्टिकच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे दूध डेअरी व्यवसायिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. दूध पॅकिंगसाठी लागणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांचे दर वाढल्याने प्रति लिटर दूधामागे एक ते दीड रुपयांचा अतिरिक्त खर्च वाढला आहे. तसेच दूध विक्रीचे बाजार भाव वाढले नसल्यामुळे दूध डेअरी व्यवसाय तिहेरी अडचणीत सापडले आहे. आखाती देशांतील (Middle East) युद्धाचा थेट संबंध महाराष्ट्रातील दूध व्यवसायाशी असणे सुरुवातीला कदाचित स्पष्ट वाटणार नाही, परंतु जागतिक बाजारपेठेतील साखळीमुळे याचे दूरगामी परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होतात.

Chhatrapati Sambhajinagar News: गरिबांचा आठवडी ‘मॉल’ बंद! वाहतूककोंडी

 

एकीकडे दूध खरेदी दरात वाढ झाली आहे, दुसरीकडे पॅकिंगचा खर्च वाढला आहे, तर तिसरीकडे दुग्धजन्य पदार्थांची आखाती देशांमध्ये होणारी निर्यात युद्धामुळे थांबली आहे.परिणामी, देशांतर्गत बाजारात दुग्धजन्य पदार्थांचा साठा वाढत असून विक्री मंदावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.विशेष म्हणजे, उत्पादन खर्च वाढूनही दूध विक्रीचे दर वाढलेले नाहीत. त्यामुळे व्यवसायिकांना नफ्याऐवजी तोट्याला सामोरे जावे लागत आहे.लहान व मध्यम डेअरी व्यवसायिकांसाठी ही परिस्थिती अधिकच कठीण ठरत असून, त्यांचा आर्थिक समतोल बिघडत आहे.या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्लास्टिक दरवाढीवर नियंत्रण ठेवावे तसेच डेअरी व्यवसायिकांना दिलासा देणाऱ्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

“दूध खरेदी दर वाढलेत, पॅकिंगचा खर्चही वाढलाय, पण विक्री दर तसेच आहेत. निर्यात बंद असल्याने साठा वाढतोय. या तिहेरी अडचणीमुळे आमचा व्यवसाय टिकवणे कठीण होत चालले आहे.”संजय थोरात.दूध विक्रेते मंचर.

आखाती युद्धाचा महाराष्ट्राच्या दूध व्यवसायावर होणारा परिणाम

१. पशुखाद्याच्या किमतीत वाढ (Input Cost)
दूध उत्पादनाचा सर्वात मोठा खर्च पशुखाद्यावर होतो. आखाती देशांतील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती वाढतात.

वाहतूक खर्च: डिझेल महागल्यामुळे पेंड, सरकी, मका आणि इतर पशुखाद्य शेतकरी किंवा डेअरीपर्यंत पोहोचवण्याचा वाहतूक खर्च वाढतो.

खते आणि औषधे: पेट्रोकेमिकल्सच्या किमती वाढल्यामुळे वैरण उत्पादनासाठी लागणारी खते महागतात, ज्यामुळे दूध उत्पादनाचा खर्च (Cost of Production) वाढतो.

तिकीट गैरवापर रोखण्यासाठी रेल्वेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; आता खऱ्या प्रवाशांना मिळणार दिलासा

२. दूध भुकटी (Milk Powder) निर्यातीवर गदा
महाराष्ट्र हा भारतभरातील दूध भुकटी निर्यातीचा एक प्रमुख केंद्र आहे. आखाती देश हे भारतीय दुग्धजन्य पदार्थांसाठी मोठी बाजारपेठ आहेत.

मागणीत घट: युद्धामुळे आखाती देशांतील अर्थव्यवस्था डळमळीत होते, ज्यामुळे तिथे होणाऱ्या दूध भुकटी, लोणी आणि तूप यांसारख्या पदार्थांच्या मागणीत घट होते.

शिपिंग मार्ग आणि लॉजिस्टिक: तांबड्या समुद्रातील (Red Sea) तणावामुळे मालवाहतूक जहाजांना लांबचा फेरा घ्यावा लागतो. यामुळे जहाजांचे भाडे (Freight charges) वाढते आणि दूध भुकटी निर्यात करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही.

३. अतिरिक्त दुधाचा प्रश्न (Glut in Local Market)
जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यातीचे मार्ग बंद होतात, तेव्हा निर्यात होणारी दूध भुकटी आणि तूप स्थानिक बाजारपेठेत येते.

दर घसरणे: स्थानिक बाजारात दुग्धजन्य पदार्थांची आवक वाढल्यामुळे दुधाच्या खरेदी दरात (Milk Procurement Price) मोठी घसरण होते. याचा थेट फटका महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसतो.

४. विदेशी गुंतवणुकीवर परिणाम
महाराष्ट्रातील अनेक मोठ्या सहकारी आणि खासगी डेअरी प्रकल्पांमध्ये विदेशी गुंतवणूक असते किंवा त्यांचे आखाती देशांतील कंपन्यांशी करार असतात. युद्धाच्या अनिश्चिततेमुळे अशा नवीन गुंतवणुकीला खीळ बसते, ज्याचा परिणाम प्रक्रिया उद्योगाच्या विस्तारावर होतो.

 

Web Title: Gulf war impact rising plastic prices put dairy business in crisis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Middle East War Impact
  • World War 3

संबंधित बातम्या

Solapur News: देवस्थान की रंगमंच? कुंभारीच्या गेनसिद्ध महाराज मंदिरातील ‘त्या’ नृत्याचा व्हिडिओ व्हायरल; भाविकांमध्ये तीव्र संताप
1

Solapur News: देवस्थान की रंगमंच? कुंभारीच्या गेनसिद्ध महाराज मंदिरातील ‘त्या’ नृत्याचा व्हिडिओ व्हायरल; भाविकांमध्ये तीव्र संताप

US Military Bases : अमेरिकेची आखाती देशांतून मोठी माघार; 89 लष्करी तळांपैकी निवडक तळ बंद होणार, का वाढली भारताची चिंता?
2

US Military Bases : अमेरिकेची आखाती देशांतून मोठी माघार; 89 लष्करी तळांपैकी निवडक तळ बंद होणार, का वाढली भारताची चिंता?

राज्यासाठी धोक्याची घंटा! एका वर्षात जन्मलिंग गुणोत्तर 912 वरून 897 वर; आरोग्य विभागाच्या अहवालाने चिंता वाढली
3

राज्यासाठी धोक्याची घंटा! एका वर्षात जन्मलिंग गुणोत्तर 912 वरून 897 वर; आरोग्य विभागाच्या अहवालाने चिंता वाढली

West Asia LIVE : इस्त्रायल-लेबनॉनमध्ये शांती करारावर स्वाक्षरी; अमेरिकेने केली मध्यस्थी भूमिका
4

West Asia LIVE : इस्त्रायल-लेबनॉनमध्ये शांती करारावर स्वाक्षरी; अमेरिकेने केली मध्यस्थी भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.