Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News: देवस्थान की रंगमंच? कुंभारीच्या गेनसिद्ध महाराज मंदिरातील ‘त्या’ नृत्याचा व्हिडिओ व्हायरल; भाविकांमध्ये तीव्र संताप

सोलापूर जिल्ह्यातील कुंभारी येथील प्रसिद्ध श्री गेनसिद्ध महाराज मंदिर परिसरातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. धार्मिक स्थळाचे पावित्र्य राखण्याची मागणी होत आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 01, 2026 | 09:19 PM
कुंभारीच्या गेनसिद्ध महाराज मंदिरातील 'त्या' नृत्याचा व्हिडिओ व्हायरल

कुंभारीच्या गेनसिद्ध महाराज मंदिरातील 'त्या' नृत्याचा व्हिडिओ व्हायरल

Follow Us
Follow Us:
  • देवस्थान की रंगमंच?
  • कुंभारीच्या गेनसिद्ध महाराज मंदिरातील ‘त्या’ नृत्याचा व्हिडिओ व्हायरल
  • भाविकांमध्ये तीव्र संताप!
सोलापूर, शहर प्रतिनिधी: दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील प्रसिद्ध ग्रामदैवत श्री गेनसिद्ध महाराज मंदिर परिसरात कारहुणवी सणानिमित्त झालेल्या एका कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गावासह परिसरात संतापाची लाट उसळली आहे. मंदिराच्या पवित्र परिसरात महिलांचे नृत्य झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात असून, या प्रकारामुळे भाविकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

श्री गेनसिद्ध महाराज हे केवळ कुंभारी गावाचे ग्रामदैवत नसून संपूर्ण दक्षिण सोलापूर परिसरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान मानले जातात. वर्षभर हजारो भाविक दर्शनासाठी येथे येत असतात. अशा पवित्र स्थळाच्या परिसरात घडल्याचा दावा होत असलेल्या या प्रकारामुळे धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

विशेष म्हणजे, अवघ्या वर्षभरापूर्वी श्री गेनसिद्ध महाराज मंदिराचा भव्य कळसारोहण सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला होता. तसेच ५१ पालख्यांचा ऐतिहासिक भेटी सोहळाही राज्यभर चर्चेचा विषय ठरला होता. अशा समृद्ध धार्मिक परंपरा लाभलेल्या मंदिर परिसराशी संबंधित व्हायरल व्हिडिओमुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मंदिर परिसर हा मनोरंजनाचा मंच नसून श्रद्धेचे केंद्र आहे, धार्मिक स्थळांचे पावित्र्य अबाधित राहिले पाहिजे, परंपरा आणि संस्कृतीचा मान राखला गेला पाहिजे, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात उमटत आहेत. काही नागरिकांनी या प्रकरणाची चौकशी करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करण्याची मागणी केली आहे.

सोलापुरात अन्न व औषध प्रशासनाचा मोठा धडाका; डेअरीवर छापा मारून ७ लाखांची भेसळयुक्त बर्फी जप्त, १,८०७ किलो मुद्देमाल हस्तगत!

दरम्यान, कार्यक्रम कोणाच्या परवानगीने झाला आणि त्यामागील वस्तुस्थिती काय आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाकडे ग्रामस्थांसह भाविकांचे लक्ष लागले आहे. गावातील ज्येष्ठ नागरिकांनी मंदिर परिसरात होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमात शिस्त, परंपरा आणि धार्मिक भावनांचा आदर राखणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. भविष्यात अशा वादांना तोंड फुटू नये, यासाठी मंदिर प्रशासन, ग्रामपंचायत आणि संबंधितांनी योग्य नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.

श्री गेनसिद्ध महाराज हे आमच्या गावाचे आराध्य दैवत आहेत. मंदिर परिसरात होणारा प्रत्येक कार्यक्रम श्रद्धा आणि परंपरेचा सन्मान राखणारा असला पाहिजे. व्हायरल झालेल्या व्हिडिओची सत्यता तपासून योग्य ती कारवाई करावी. शिरीष कदम, भाविक

नेमका वाद काय?

कारहुणवीनिमित्त मंदिर परिसरातील कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

  • व्हिडिओवरून भाविक आणि नागरिकांमध्ये तीव्र चर्चा सुरू
  • धार्मिक स्थळांचे पावित्र्य आणि परंपरा जपण्याची मागणी
  • संबंधित कार्यक्रमाच्या परवानगी व वस्तुस्थितीबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा
Pandharpur Ashadhi Wari 2026: ‘वारीत सुविधा, सेवेत कसूर नाही! साडेचार कोटींच्या कामांना जिल्हा परिषदेची ऐतिहासिक मंजुरी

Web Title: Solapur kumbhari gensiddha maharaj temple controversial video viral devotees protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 09:19 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Solapur
  • Solapur News

संबंधित बातम्या

राज्यासाठी धोक्याची घंटा! एका वर्षात जन्मलिंग गुणोत्तर 912 वरून 897 वर; आरोग्य विभागाच्या अहवालाने चिंता वाढली
1

राज्यासाठी धोक्याची घंटा! एका वर्षात जन्मलिंग गुणोत्तर 912 वरून 897 वर; आरोग्य विभागाच्या अहवालाने चिंता वाढली

सोलापुरात अन्न व औषध प्रशासनाचा मोठा धडाका; डेअरीवर छापा मारून ७ लाखांची भेसळयुक्त बर्फी जप्त, १,८०७ किलो मुद्देमाल हस्तगत!
2

सोलापुरात अन्न व औषध प्रशासनाचा मोठा धडाका; डेअरीवर छापा मारून ७ लाखांची भेसळयुक्त बर्फी जप्त, १,८०७ किलो मुद्देमाल हस्तगत!

लातूर पोलिसांचा दणका:- वाहनचोरी करणाऱ्या आरोपीला अटक ६ मोटारसायकली पोलिसांच्या ताब्यात
3

लातूर पोलिसांचा दणका:- वाहनचोरी करणाऱ्या आरोपीला अटक ६ मोटारसायकली पोलिसांच्या ताब्यात

Pandharpur Ashadhi Wari 2026: ‘वारीत सुविधा, सेवेत कसूर नाही! साडेचार कोटींच्या कामांना जिल्हा परिषदेची ऐतिहासिक मंजुरी
4

Pandharpur Ashadhi Wari 2026: ‘वारीत सुविधा, सेवेत कसूर नाही! साडेचार कोटींच्या कामांना जिल्हा परिषदेची ऐतिहासिक मंजुरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.