Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nilesh Rane : ‘हळदीचे नेरुर गावच्या विकासासाठी कटिबद्ध,’ आमदार निलेश राणे यांच्या हस्ते नवीन पुलाच्या बांधणीचे भूमिपूजन संपन्न

Nilesh Rane : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हळदीचे नेरुर येथे नवीन पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते पार पडले. सुमारे ५ कोटी रुपये खर्चाच्या या पुलाचे काम दर्जेदार व्हावे आणि नागरिकांची गैरसोय दूर व्हावी, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  • By विवेक
Updated On: Oct 29, 2026 | 07:07 PM
nilesh rane haldiche nerur bridge

nilesh rane haldiche nerur bridge

Follow Us
Follow Us:
  • हळदीचे नेरुर पुलाच्या कामाचे भूमिपूजन संपन्न
  • ५ कोटींच्या पुलाचे काम दर्जेदार करण्यावर भर
  • रखडलेल्या विकासकामांवरून निलेश राणेंचा विरोधकांना सवाल
 

कुडाळ प्रतिनिधी : हळदीचे नेरुर गावच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून येत्या वर्षभरात म्हणजेच ८ सप्टेंबर २०२७ पर्यंत हा पूल पूर्णत्वास येईल आणि येथील नागरिकांची गैरसोय दूर होईल, असे आश्वासन आज आमदार निलेश राणे यांनी हळदीचे नेरुर येथे पुलाच्या भूमिपूजनप्रसंगी आयोजित कार्यक्रमावेळी केले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, कुडाळ पंचायत समिती सभापती मिलिंद नाईक, जिल्हा परिषद सदस्य दीपक नारकर, जिल्हा परिषद सदस्या दीपलक्ष्मी पडते, जिल्हा परिषद बांधकाम सभापती संतोष साटविलकर, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, मोहन सावंत, दिलीप सावंत, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, तालुकाप्रमुख विनायक राणे, देवेंद्र नाईक, निवृत पोलीस अधिकारी सतीश कविटकर, राजा धुरी आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार निलेश राणे म्हणाले की, “एक वर्षाच्या आतमध्येच हा पूल पूर्ण होईल तसा पाठपुरावा केला जाईल. ८ सप्टेंबर २०२७ या दिवशी या पुलाची “कंपलीशन डेट” आहे त्यामुळे या पुलाचे काम कसे वर्षभरात पूर्ण होईल यासाठी मी ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे नेहमीच पाठपुरावा करणार आहे. मात्र, ठेकेदार यांनी आताच स्पष्ट केले आहे की, मार्च महिन्यापर्यंत हा पूल आपण पूर्णत्वास येईल. मात्र, या पुलाचे काम दर्जेदार व्हावे हीच माझी अपेक्षा आहे.”

“या पुलाच्या कामासाठी स्थानिक ग्रामस्थ दिलीप सावंत यांनी माझ्याकडे नेहमीच पाठपुरावा केला. त्यामुळेच आज या पुलाचे कामाचे भूमिपूजन होत आहे. मी ज्यावेळी आमदार झालो त्यावेळी ज्या ज्यावेळी मला दिलीप सावंत भेटायचे त्यावेळी हळदीच्या नेरुर पुलाचा विषय माझ्या डोक्यात येत असे. त्यांचा जरी फोन आला तरी हळदीच्या नेरूर पुलासाठी असणार असे माझ्या डोक्यात येई.”

MLC Election 2026 : महायुतीत ठिणगी! ‘महायुतीत मातोश्रीप्रेमी आहेत का?’ नितेश राणेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

मागील १० वर्षात येथील विकासकामे रखडली

यावेळी आमदार निलेश राणे म्हणाले की, “आज अनेक विकासकामे या मतदारसंघांमध्ये होणे आवश्यक आहेत. अनेक पुलांची कामे मागील १० वर्षात रखडली आहेत. मला ही कामे पूर्ण करायची आहेत. कारण मला लोकांनी काम करण्यासाठीच निवडून दिले असून टीका करण्यासाठी नाही. हा ५ कोटींचा पूल पूर्ण करून या लगतचा जो रस्ता आहे तो सुद्धा पूर्ण करण्याचा माझा मानस आहे.”

मागच्या १० वर्षात येते काम का झाले नाही? हे जर समोरचे आले तर त्यांना विचारा !

“या मतदारसंघांमध्ये अनेक कामे आपल्याला करावयाची आहेत. या पुलाचे काम झाले म्हणजे गावातील सर्व कामे झाली असे नाही. हा मतदारसंघ १० वर्षात विकासापासून वंचित राहिला. महाराष्ट्राच्या नकाशावर २८८ मतदारसंघ आहेत. मात्र, या नकाशावरून कुडाळ-मालवण मतदारसंघ मागील दहा वर्षात हरवला गेला. हा मतदारसंघ पुन्हा जिवंत करण्याचे काम आम्ही २०२४ पासून सुरू केले आहे. मतदारसंघाचा विकास काय असतो हे दाखवायची माझी धडपड सुरू आहे. मी फक्त कर्तव्य बजावतोय मी कोणावरही उपकार करत नाही. उपकार हा शब्द तुमच्या शब्दकोशातून बाहेर काढून टाका. माझे काम आहे ते मला केलेच पाहिजे. मागच्या १० वर्षात येते काम का झाले नाही? हे जर समोरचे आले तर त्यांना विचारा,” असा सल्ला आमदार निलेश राणे यांनी उपस्थित नागरिकांना दिला.

माझ्याकडे दीड वर्षातील हिशेब मागत मागतायत त्यांचे आव्हान स्वीकारले : निलेश राणे

यावेळी आमदार निलेश राणे उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, “पुढील दीड वर्षांमध्ये निलेश राणे या मतदारसंघात काय काय करतो हे तुम्ही नक्की पहा ! मी कुणावर टीका करणार नाही, पण माझ्यावर दररोज टीका होते. मिटींगला उशिरा पोचलो तरी तरी टीका होते. कारण माझ्या लक्षात आले आहे की, काही लोक हे रिकामटेकडे आहेत. त्यांना काहीच काम नाही, ज्यांनी १० वर्षे काही काम केली नाहीत ते आता माझ्याकडे दीड वर्षातील हिशेब मागत आहेत. मी त्यांचे आव्हान स्वीकारले आहे, असे आमदार निलेश राणे म्हणाले. येणाऱ्या पाच वर्षांमध्ये मी जे काम करेन ते कोणीही करून दाखविले तर मी माझ्या हातातील शस्त्रे टाकायला तयार आहे. माझी स्पर्धा ही बौद्धिक स्तरावर व्हावी, मी विधानसभेमध्ये प्रश्न मांडत असताना बघत नाही की मी कुठल्या भागावर बसलो आहे. कोणासमोर गुडघे टेकण्याची भाषा मी बघत नाही. राणे साहेबांनी मला आधीच सांगितले आहे की, तुझा मतदारसंघ पहिला तू कुठल्या बाकावर बसतोस ते महत्त्वाचे नाही.”

माझी स्पर्धा कोणाशीच नाही

“माझी स्पर्धा कोणाशीच नाही. मी २५ वर्षे इथे टिकायला आलो नाही. जी मला लोकांनी पाच वर्षांसाठी निवडून दिले आहे. ज्या मतदारसंघात माझ्या वडिलांचा पराभव झाला, त्याच मतदारसंघात मला लोकांनी निवडून दिले. या जिल्ह्यातूनच माझे वडील आता खासदार आहेत. माझा भाऊ पालकमंत्री आहे. हे उपकार आम्ही कसे विसरायचे? राणे कुटुंबाला जे येथील लोकांनी दिले ते आम्ही उभ्या आयुष्यात फेडू शकत नाही.”

टाळंबा प्रकल्प होणार नाही

“टाळंबा प्रकल्प होणार नाही हे नक्की, मी जिवंत असेपर्यंत हा प्रकल्प होऊ देणार नाही,” असे आश्वासन आमदार निलेश राणे यांनी उपस्थितीतांना दिले.

“२०१४ पासून मी या भागात विकास शोधत आहे. या भागामध्ये मी उच्च दर्जाचे काम करणार आहे. त्यामुळे माझ्या नंतर जो येणारा असेल त्यांना समजेल की येथे किती काम झाले? मागील १० वर्षात कणकवली आणि सावंतवाडी मतदारसंघाचा विकास होत होता. मात्र, कुडाळ-मालवणमध्ये विकास होत नव्हता. अधिकारी दखलच घेत नव्हते. कुडाळ-मालवण मतदारसंघासाठी जो २०० कोटींचा निधी येत होता ते कधी आपल्याला मिळायचे नाहीत. जिल्हा नियोजनच्या आराखड्यामध्ये आपल्या मतदारसंघाला ३५!कोटी रुपये सुद्धा मिळायचे नाहीत. आज पुन्हा कुडाळ-मालवण मतदारसंघाचा आराखडा हजार-बाराशे कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. याच्यावर आपण थांबणार नाही हा आराखडा किमान ५ हजार कोटी रुपयांपर्यंत गेला पाहिजे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू राहतील,” असे आश्वासन आमदार निलेश राणे यांनी दिले.

“विकास हा फक्त महायुतीच्या सरकारमध्येच होऊ शकतो. आता आपल्या जिल्हा परिषदेचे काम सुद्धा पारदर्शकपणे सुरू आहे. आमचे नेते एकनाथ शिंदे यावेळी सिंधुदुर्ग आले होते त्यांनी सुद्धा ५० कोटींचा निधी जिल्हा परिषदेसाठी देऊ असे आश्वासन दिले होते. तो ५० कोटींचा निधी लवकरात लवकर आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे,” असे आश्वासन आमदार निलेश राणे यांनी दिले.

Karjat Saidongar Deforestation : ‘सह्याद्रीचा वारसा विकू देणार नाही’; हर्षवर्धन सपकाळांचा सरकारवर हल्लाबोल

💡

Frequently Asked Questions

  • Que: हळदीचे नेरुर पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन कोणी केले?

    Ans: हळदीचे नेरुर येथील नवीन पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते पार पडले.

  • Que: हळदीचे नेरुर पुलाच्या कामासाठी किती खर्च अपेक्षित आहे?

    Ans: आमदार निलेश राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पुलाच्या कामासाठी सुमारे ५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

  • Que: हळदीचे नेरुर पूल कधी पूर्ण होणार?

    Ans: पुलाची अधिकृत पूर्णत्वाची तारीख ८ सप्टेंबर २०२७ असल्याचे आमदार निलेश राणे यांनी सांगितले. ठेकेदाराने मार्चपर्यंत काम पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केल्याचेही त्यांनी नमूद केले.

Web Title: Haldiche nerur bridge construction nilesh rane vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 07:03 PM

Topics:  

  • Kudal
  • nilesh rane
  • Sindhudurg News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.