राजकारणात मोठी घडामोड; हर्षवर्धन पाटील यांनी घेतली बावनकुळे यांची भेट, निवांत झोपेची चर्चा पुन्हा रंगली...
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यावर मला आता शांत झोप लागत आहे. कोणतीही चौकशी नाही, काही नाही. त्यामुळे आनंदात आहे, असे म्हटले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील यांच्या शांत झोपेची नावाची चर्चा सुरू आहे. हर्षवर्धन पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे.
हर्षवर्धन पाटील हे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. त्यातच आता त्यांनी बावनकुळे यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये काही चर्चा झाल्याचीही माहिती आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निवांत झोपेची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी जेव्हा भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हा त्यांच्या असलेल्या भावनाही मोकळेपणाने व्यक्त केल्या होत्या. भाजपमध्ये गेल्याने आता मला शांत झोप लागते आहे. कोणतीही चौकशी नाही काही नाही. त्यामुळे आनंदात आहे असे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले होते.
विधानसभा निवडणुकीपूर्वी हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादीत
हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यानच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. जनतेचा आवाज असल्याने मी निवडणूक लढवली पाहिजे, असे त्यांनी त्यावेळी सांगितले. मी शरद पवारांना भेटलो, त्यांनीही मला सांगितलं की तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवली पाहिजे. त्यानुसार, त्यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत दत्तात्रय भरणे यांच्याविरोधात हर्षवर्धन पाटील यांनी निवडणूक लढवली होती.