Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाडच्या चवदार तळ्यातील पाणी घेऊन जा अन्…; हर्षवर्धन सपकाळांचे कार्यकर्त्यांना आवाहन

महाडच्या चवदार तळ्यातील पाणी हे 'समतेचे अमृत' असून या चवदार तळ्याचे पाणी घेऊन गावा-गावतील तलाव, नदी , धरणात सोडून 'समतेचा संदेश' सर्वदूर पोहचवा, असे आवाहन हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 20, 2026 | 05:32 PM
महाडच्या चवदार तळ्यातील पाणी घेऊन जा अन्...; हर्षवर्धन सपकाळांचे कार्यकर्त्यांना आवाहन

महाडच्या चवदार तळ्यातील पाणी घेऊन जा अन्...; हर्षवर्धन सपकाळांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Follow Us
Follow Us:
  • महाडमध्ये ‘चवदार तळे सत्याग्रह समता शताब्दी वर्ष’ सोहळ्याचा शुभारंभ
  • हर्षवर्धन सपकाळांचे कार्यकर्त्यांना आवाहन
  • तुषार गांधीही उपस्थित
महाड : मनुवादी व्यवस्थेने जसे अनेक घटकांवर नियंत्रण ठेवले होते तसेच पाण्यावरही नियंत्रण ठेवून समाजातील एका घटकाला पाण्यापासून वंचित ठेवले होते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ साली महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करून ऐतिहासिक क्रांती केली. या ऐतिहासिक क्रांतीने जातीयवादी, स्पृश्य अस्पृश्य व्यवस्थेला मूठमाती देत समता, बंधुता व सामाजिक न्यायाचा संदेश दिला. महाडच्या चवदार तळ्यातील पाणी हे ‘समतेचे अमृत’ असून या चवदार तळ्याचे पाणी घेऊन गावा-गावतील तलाव, नदी , धरणात सोडून ‘समतेचा संदेश’ सर्वदूर पोहचवा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

 

महाडमध्ये ‘चवदार तळे सत्याग्रह समता शताब्दी वर्ष’ सोहळ्याचा शुभारंभ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बोलत होते. या कार्यक्रमानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सभागृहापासून चवदार तळ्यापर्यंत पदयात्रा करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले व चवदार तळ्यातील पाणी कलशात भरून काँग्रेस पदाधिकाऱ्यांना दिले. हे पाणी सर्व जिल्ह्यांमध्ये गावागावात जाऊन नदी, तलाव व धरणातही सोडले जाणार आहे.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे यासाठी महाडचा सत्याग्रह करण्यात आला. या सत्याग्रहासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनेक अप्रिय घटनांचा सामना करावा लागला पण त्यांनी कशाचीही पर्वा न करता हा सत्याग्रह केला. नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशावेळीही बाबासाहेब यांना अशाच अप्रिय घटनांचा सामना करावा लागला होता. महाडच्या चवदार तळ्याच्या क्रांतीत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, महात्मा गांधी यांचा विचार होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केल्यानंतर मनुवादी प्रवृत्तींनी या चवदार तळ्याचे शुद्धीकरण केले होते, त्याच विचाराचा वारसा महाराष्ट्राचे आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे, आजही या मनुवादी विचाराचा सामना आपल्याला करावा लागत आहे, आजही हा विचार अनेक व्यवस्थेपासून बहुजन समाजाला वंचित ठेवत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

हे सुद्धा वाचा : अध्यक्षपदाचा ‘फॉर्म्युला’ अद्याप गुप्तच; जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांचा डाव की संभ्रम?

Web Title: Harshvardhan sapkal has appealed to congress workers to take water from mahads chavdar lake to every village

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 05:32 PM

Topics:  

  • Congress
  • Harshvardhan Sapkal
  • Mahad

संबंधित बातम्या

IIT Bombay Sahil Wakode Case : साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV आला समोर, वर्षा गायकवाडांनी उपस्थित केले गंभीर सवाल
1

IIT Bombay Sahil Wakode Case : साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV आला समोर, वर्षा गायकवाडांनी उपस्थित केले गंभीर सवाल

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
2

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

Goa News  : गोय राखण यात्रेच्या पार्श्वभूमीवर ‘खोका रन’ उपरोधिक गेमद्वारे गोवा काँग्रेसवर निशाणा
3

Goa News : गोय राखण यात्रेच्या पार्श्वभूमीवर ‘खोका रन’ उपरोधिक गेमद्वारे गोवा काँग्रेसवर निशाणा

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं
4

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.