Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Harshvardhan Sapkal Interview: ‘भाजप म्हणजे पक्ष खाणारी चेटकीण; हर्षवर्धन सपकाळांनी बोचरी टीका, पाहा व्हिडीओ

पण त्यावेळीही देवेंद्र फडणवीसांनी हे सर्व ब्लॉक करून ठेवलं जे नियमबाह्य होतं. याचा अंदाज आम्हाला आला नाही. अशी कोणत्याही राज्याची विधानसभा नसेल जिथे एवढा काळ विधानसभा अध्यक्षपद रिक्त ठेवलं गेलं.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 20, 2025 | 09:56 AM
Harshvardhan Sapkal Interview: ‘भाजप म्हणजे पक्ष खाणारी चेटकीण; हर्षवर्धन सपकाळांनी बोचरी टीका, पाहा व्हिडीओ
Follow Us
Close
Follow Us:

पुणे:  राज्याच्या राजकारणात तीन वर्षांपूर्वी झालेल्या सत्तांतरानंतर काँग्रेसलाही मोठी गळती लागली आहे. अनेक दिग्ग्जांनी काँग्रेसची साथ सोडत सत्ताधारी पक्षात प्रवेश केला. पुण्याच्या राजकीय वर्तुळातही याचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले, काही दिवसांपूर्वी माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसला रामराम करत कमळ हाती घेतले. त्यानंतर अवघ्या महिनाभरातच काँग्रेसचे निष्ठावंत अशी ओळख असलेल्या संग्राम थोपटे यांनीदेखील काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला, संग्राम थोपटे यांच्या राजीनाम्याची चर्चेला काल प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीदेखील दुजोरा दिला. पण त्याचवेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. भाजप हा पक्ष खाणारी चेटकीण असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

हर्षवर्धन सपकाळ यांनी काल नवराष्ट्र वृत्तसमुहाला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी काँग्रेस सोडून जाणाऱ्या नेत्यांना थांबण्याचे आवाहनही केले. संग्राम खोपटे यांच्यावर काँग्रेसकडून अन्याय झालाय का, असा प्रश्न विचारला असता, सपकाळ म्हणाले, तीन वर्षांपूर्वी ज्यावेळी नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, त्यावेळी नाना पटोले याना प्रदेध्याध्यक्ष पद द्यायचं आणि संग्राम थोपटे यांना विधानसभा अध्यक्षपद द्यायंच असं ठरवण्यात आले होतं. पण रिक्त झालेलं पद ताबडतोब भरले गेले नाही. ते कायदेशीर संकेत आहेत. ती पाळलं जाईल असं वाटलं होतं. पण त्यावेळीही देवेंद्र फडणवीसांनी हे सर्व ब्लॉक करून ठेवलं जे नियमबाह्य होतं. याचा अंदाज आम्हाला आला नाही. अशी कोणत्याही राज्याची विधानसभा नसेल जिथे एवढा काळ विधानसभा अध्यक्षपद रिक्त ठेवलं गेलं. गंमत म्हणजे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होताच आठ दिवसात सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या गेल्या.

Shaktipeeth Mahamarg: ‘शक्तीपीठ महामार्ग कुणाच्या फायद्यासाठी…’? हर्षवर्धन सपकाळांनी केली राज्य सरकारची पोलखोल

संग्राम थोपटे यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा पाठवल्याचं समजत आहे. त्यांनी मेल केला आहे. पण अशा काळात त्यांनी संयमाने घ्यावं अशी माझी त्यांना विनंती आहे. संग्राम थोपटे हे उमदं नेतृत्त्व आहे, संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसशी निष्ठावंत अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या प्रतिष्ठेला साजेशी पावलं टाकावीत अशी माझी इच्छा आहे. ही भाजप म्हणजे नेते खाणारी मंडळी आहे, दुसऱ्या पक्षातील नेते घ्यायचे आणि त्यांना संपवायचं ही भाजपची रणनीती आहे. ज्या शिवसेनेसोबत त्यांनी इतके वर्ष युती केली, त्या शिवसेनेच्या मुळावर उठले आहेत. आता भविष्यातही भाजप अजित दादांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या मुळावर उठतील, हे भविष्यात दिसून येईल. आपल्याकडे एक मुलं खाणारी चेटकीण अशी दंतकथा आहे, तसा हा भाजप पक्ष खाणारी चेटकीण आहे. त्यांच्या गळाला न लागता, संग्राम थोपटेंनी काँग्रेसमध्येच राहावं अशी माझी अपेक्षा आहे. त्यांच्याबाबत पक्षाला कोणतीही तक्रार किंवा आक्षेप नाही, असं असतनाना असा निर्णय घेऊ नये. हा काळ बिकट आहे. या काळात संयम आणि संघर्ष हेच महत्त्वाचं आहे.

देवेंद्र फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना

औरंगजेबाच्या कबरीवरून झालेल्या वादासंदर्भात तुम्ही फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली होती, त्यावरूनही मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावर तुमची भूमिका काय आहे,असा प्रश्न विचारला असता, हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, औरंगजेब हा क्रुर आहे. त्याची क्रुरता आणि त्याच जे प्रशासन होतं. त्या पद्धतीचे फडणवीसांचं प्रशासन आहे, या दोघांच्या कार्यकाळाची मी तुलना केली होती. औरंगजेबाने जरी संभाजी महाराजांचा छळ केला, आमचा धर्म स्वीकारा नाहीतर मी तुमचा छळ करेल, तुम्हाला मारून टाकेल अशी धमकी औरंगजेबाने दिली होती. तसाच छळ आता फडणवीस करत आहे. तुम्ही आमच्या पक्षात या नाहीतर मी तुमच्या मागे ईडी, लावेल सीबीआय लावेल, एकंदरीत दोघांचा कारभार एकसारखाच आहे. हा माझा आशय होता. दोघांची तुलना कारभार आणि प्रशासनाच्या अनुषंगाने केली होती. त्यात काहीच गैर होत नाही.

 

Web Title: Harshvardhan sapkal interview bjp is a witch who eats the party harshvardhan sapkals blunt criticism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2025 | 09:53 AM

Topics:  

  • Congress
  • Congress Politics
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्तांची घेतली भेट; केली ‘ही’ मोठी मागणी
1

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्तांची घेतली भेट; केली ‘ही’ मोठी मागणी

विनोद पवार सरकारी अनास्थेचा बळी; कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रीया
2

विनोद पवार सरकारी अनास्थेचा बळी; कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रीया

पीडित तरुणींवरच गुन्हा दाखल : पुणे पोलिसांचे जंगलराज सुरु आहे का? सपकाळांचा संतप्त सवाल
3

पीडित तरुणींवरच गुन्हा दाखल : पुणे पोलिसांचे जंगलराज सुरु आहे का? सपकाळांचा संतप्त सवाल

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा
4

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.