Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुन्हा रद्द करण्यासाठी हसन मुश्रीफ यांची उच्च न्यायालयात धाव, ‘हेतुपुरस्सर’ कारवाई होत असल्याचा याचिकेत दावा ; लवकरच सुनावणीची शक्यता

सुरुवातीला कंपनी कायद्यांतर्गत पुणे सत्र न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता, जिथे मुश्रीफ यांच्या मुलांना समन्स बजावण्यात आले होते. या प्रकरणाला 'विशेष कायद्यायांतर्गत दाखल गुन्हा' मानण्यात आला. मात्र, त्यासाठी ईडीने कथित मनी-लाँडरिंगची चौकशी सुरू करणे आवश्यक असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Mar 04, 2023 | 08:19 PM
गुन्हा रद्द करण्यासाठी हसन मुश्रीफ यांची उच्च न्यायालयात धाव, ‘हेतुपुरस्सर’ कारवाई होत असल्याचा याचिकेत दावा ; लवकरच सुनावणीची शक्यता
Follow Us
Close
Follow Us:

मयुर फडके, मुंबई : फसवणुकीच्या आरोपाखाली (On Charges Of Fraud) कोल्हापुरात (Kolhapur) दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी (To quash the offense filed) राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ (NCP Leader Hasan Mushrif) यांनी मुंबई उच्च न्यायालयात (High Court, Mumbai) धाव घेतली आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) खटल्यांमध्ये मुश्रीफ यांच्यावर ‘हेतुपुरस्सर’ कारवाई होत असल्याचा दावा याचिकेत केला आहे. जोपर्यंत याचिकेवर सुनावणी होत नाही तोपर्यंत त्यांच्यावर कोणतीही सक्तीची कारवाई करू नये आणि आरोपपत्रही दाखल करू नये, असे पोलिसांना निर्देश देण्याची मागणी याचिकेत केली आहे.

२३ फेब्रुवारी रोजी कोल्हापुरातील मुरगूड पोलीस ठाण्यात मुश्रीफ यांच्याविरोधात विवेक कुलकर्णी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र हा गुन्हा ‘राजकीय हेतूने प्रेरित षडयंत्र’ असल्याचे सांगून तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका ॲड. प्रशांत पाटील यांच्यामार्फत मुश्रीफ यांनी केली आहे. मागील ६ ते ७ महिन्यांमध्ये घडलेल्या घटनांवरून स्पष्टपणे दिसून येते की, मुश्रीफ यांना ईडीच्या खटल्यांमध्ये अडकवण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न होत असल्याचेही याचिकेत म्हटले आहे.

सुरुवातीला कंपनी कायद्यांतर्गत पुणे सत्र न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता, जिथे मुश्रीफ यांच्या मुलांना समन्स बजावण्यात आले होते. या प्रकरणाला ‘विशेष कायद्यायांतर्गत दाखल गुन्हा’ मानण्यात आला. मात्र, त्यासाठी ईडीने कथित मनी-लाँडरिंगची चौकशी सुरू करणे आवश्यक असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

[read_also content=”निवडणुकीच्या निकालांचा, निर्णयाचा विचार जरुर होईल, कसबा निकालावरून बदलाचे वारे सुरू: शरद पवार https://www.navarashtra.com/maharashtra/election-results-decisions-will-definitely-be-considered-winds-of-change-are-starting-from-kasba-result-sharad-pawar-nrvb-373977.html”]

पुढे कंपनी कायद्यांतर्गत कारवाईला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने, तपास सुरू ठेवण्यासाठी कोल्हापुरात दाखल केलेल्या एफआयआरच्या माध्यमातून आणखी एक अधिसूचित गुन्हा तयार करण्याचा प्रयत्न ईडीकडून केला जात आहे. मुश्रीफ यांच्यावर सूड उगवण्यासाठी ईडीने द्वेषयुक्त आणि चुकीच्या हेतूने ही कार्यवाही केली आहे. अलीकडच्या काळात ईडीचा वापर सूडबुद्धीने राजकीय कारकिर्द उध्वस्त आणि गंभीर नुकसान पोहोचवण्यासाठी केला जात असल्याचेही याचिकेत म्हटले आहे.

काय आहे कोल्हापूरमधील गुन्हा

कोल्हापुरातील दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, २०१२ मध्ये मुश्रीफ यांनी बैठका आणि वृत्तपत्रांमधून आवाहन करून अनेकांकडून भागभांडवल म्हणून १० हजार रुपये घेतले व त्यामोबदल्यात त्या व्यक्तींना प्रत्येक महिन्याला ५ किलो साखर नाममात्र दराने आणि लाभांश रूपात अन्य आर्थिक लाभ मिळतील, अशी प्रलोभने दाखविली. मात्र, या रकमेच्या बदल्यात कोणालाही शेअर सर्टिफिकेट किंवा त्यांना भागधारक बनवले गेले नसल्याचा आरोप तक्रारदाराने केला आणि सुमारे ४० कोटींची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

[read_also content=”६५ वर्षीय वृध्दाचा लोकलमध्ये मृत्यू, गूढ कायम; वादातून घडली घटना, वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/crime/kalyan-crime-65-year-old-dies-in-local-train-mystery-remains-the-incident-that-happened-due-to-the-dispute-read-in-detail-nrvb-373985.html”]

पुढे चौकशी केली असता त्यांना सरसेनापती शुगर ‘एलएलपी’ या नावाने पोच पावत्या देण्यात आल्या. नॉन क्युम्युलेटी व प्रेफरेंशियल शेअर्स या सदराखाली या पोच पावत्या दिल्याचे दिसून आले. कारखाना उभा करताना रोख, धनादेश स्वरूपात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कागलमधील शाखा क्रमांक एक व दोनमधून त्यांच्या कुटुंबीयांच्या व्यक्तिगत तसेच सरसेनापती शुगर पब्लिक लिमिटेड (नियोजित)च्या नावाने आमच्याकडे भाग देतो, असे सांगून पैसे गोळा केलेले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच अन्य १३ जणांनाही अशाच प्रकारचा त्रास झाल्याचे म्हटले आहे. याच मुद्द्याला मुश्रीफ यांनी विरोध केला आहे. हा गुन्हा दाखल कऱणाऱ्याविरोधातही काहींनी काऊटर एफआयआर नोंदवला आहे. त्यानुसार, २०१२ मध्ये १० हजार रुपये गुंतवून नफा मिळाल्याचा दावा केला आहे.

Web Title: Hasan mushrif move to the high court to quash the crime claims that purposeful action is being taken in the petition hearing likely soon nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2023 | 08:19 PM

Topics:  

  • Hasan Mushrif
  • High court

संबंधित बातम्या

पोटगी प्रकरणात मोठा निर्णय! पतीचे उत्पन्न वाढवून सांगितल्यास कारवाई नाही; हायकोर्टाचा निर्वाळा
1

पोटगी प्रकरणात मोठा निर्णय! पतीचे उत्पन्न वाढवून सांगितल्यास कारवाई नाही; हायकोर्टाचा निर्वाळा

Hindu Succession Act : “पत्नीच्या माहेरच्या मालमत्तेवर पतीचा हक्क…”, हायकोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निकाल
2

Hindu Succession Act : “पत्नीच्या माहेरच्या मालमत्तेवर पतीचा हक्क…”, हायकोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निकाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.