Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Weather: गेल्या दहा वर्षातील यंदाचा एप्रिल सर्वाधिक ‘हॉट’; ४० अंशाच्या वर पोहोचले तापमान

यंदाच्या हंगामात उन्हाचा पारा चांगलाच वर जात आहे. सध्या सरासरी 43 अंशांपर्यंत पाऱ्याने मजल मारली आहे. गेल्या 2-3 दिवसांमध्ये तर उन्हाचा कहरच पाहायला मिळत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 02, 2025 | 02:35 AM
Maharashtra Weather: गेल्या दहा वर्षातील यंदाचा एप्रिल सर्वाधिक ‘हॉट’; ४० अंशाच्या वर पोहोचले तापमान
Follow Us
Close
Follow Us:

पुणे: यंदाचा एप्रिल महिना गेल्या दहा वर्षातील ‘हाॅट’ ठरला अाहे. या एप्रिलमधील सर्वाधिक दिवस तापमान ४० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक हाेते. गेल्या दहा वर्षांत २०१६मध्ये ११, २०१९मध्ये १२ दिवस तापमान ४० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक होते.

तापमानाचा पारा यंदा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच वाढू लागला हाेता.  कमाल तापमानासह किमान तापमानातही वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसभर उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. तसेच, शहरात तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे. कोरडे हवामान, उत्तरेकडून येणारे उष्ण वारे अशा कारणांमुळे तापमानात वाढ होत राहिली आहे.

हवामान विभागाच्या गेल्या दहा वर्षांतील एप्रिलमधील तापमानाचा आढावा घेतला असता, शिवाजीनगर येथे २०१६मध्ये ११ दिवस, २०१९मध्ये १२ दिवस तापमान ४० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक राहिले होते. तर यंदा नवा विक्रम नोंदवला जाऊन गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक १३ दिवस तापमान ४० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक राहिले आहे. २०१५मध्ये एक, २०१६मध्ये ११, २०१७मध्ये सहा, २०१८मध्ये दोन, २०१९मध्ये १२, २०२०मध्ये एक, २०२२मध्ये सात, २०२३मध्ये एक, २०२४मध्ये सात दिवस तापमान ४० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक नोंदवले गेले होते. तर २०२१मध्ये एकदाही तापमानाने चाळीशी गाठली नाही.

यंदा एप्रिलमध्ये १३ दिवस तापमान ४० अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक राहण्यामागे ठोस असे कारण नाही. तापमानात चढ-उतार होत राहतात. पुढील तीन ते चार दिवस तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर ४ मेच्या सुमारास तापमानात काही प्रमाणात घट होऊ शकेल. हवेतील आर्द्रता वाढण्याची, तसेच हवामान ढगाळ राहण्याची शक्यता असल्याचे सानप यांनी सांगितले.

–         एस. डी. सानप, शास्त्रज्ञ, हवामान विभाग

राज्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढला

यंदाच्या हंगामात उन्हाचा पारा चांगलाच वर जात आहे. सध्या सरासरी 43 अंशांपर्यंत पाऱ्याने मजल मारली आहे. गेल्या 2-3 दिवसांमध्ये तर उन्हाचा कहरच पाहायला मिळत आहे. मंगळवारी (दि. 29) सकाळपासून उन्हसावलीचा खेळ सुरू होता. तरीही वातावरणात कमालीची उष्णता होती.

राज्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढला; वाशिममध्ये तापमान 43 अंशांवर

सकाळपासूनच सूर्याचा प्रकोप पाहिला मिळत आहे. आकाशात अधूनमधून ढगांची गर्दीही असल्याने सावलीनेही किंचित दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तळपत्या उन्हापुढे हा दिलासा फोल ठरत होता. दुपारी सर्वोच्च तापमान अनुभवण्यास मिळत आहे. दुपारी 4.30 वाजेपर्यंत उन्ह कायम राहते. तर रात्री 9 वाजेपर्यंत उष्ण वाऱ्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागला. यंदा मार्चमध्ये तापमानवाढीला सुरुवात होऊन एप्रिलमध्ये पाऱ्याने उच्चांक गाठायला सुरुवात केली. एप्रिलचे 21 दिवस तापमान चांगलेच वर राहिले.

Web Title: Heatwave in maharashtra temperature cross in 40 celsius pune maharashtra weather news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Heat Wave in Maharashtra
  • Maharashtra Weather
  • Pune

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Alert:  महाराष्ट्रात पावसाचा कहर! धोका वाढला; काळाकुट्ट अंधार अन्…. , काही तास अत्यंत महत्वाचे
1

Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पावसाचा कहर! धोका वाढला; काळाकुट्ट अंधार अन्…. , काही तास अत्यंत महत्वाचे

Maharashtra Rain: काही तास कोकणासाठी महत्वाचे! पाऊस असा कोसळणार की…; IMD चा ‘या’ जिल्ह्यांना हायअलर्ट
2

Maharashtra Rain: काही तास कोकणासाठी महत्वाचे! पाऊस असा कोसळणार की…; IMD चा ‘या’ जिल्ह्यांना हायअलर्ट

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी
3

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाकडून मेडिकल चालकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी; सर्वप्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद
4

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाकडून मेडिकल चालकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी; सर्वप्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.