Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yavatmal News: २६ हजार हेक्टर पिकांना तडाखा! तब्बल २३,९५२ शेतकरी बाधित; अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

मुसळधार पावसामुळे यवतमाळमध्ये तब्बल ९८ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. एका दिवसांमध्ये तब्बल १३५ मिमी विक्रमी पावसाची नोंद होवून नदी, नाल्याना मोठा पूर आला आहे. तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 03, 2026 | 10:52 AM
२६ हजार हेक्टर पिकांना तडाखा! तब्बल २३,९५२ शेतकरी बाधित; अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

२६ हजार हेक्टर पिकांना तडाखा! तब्बल २३,९५२ शेतकरी बाधित; अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

Follow Us
Follow Us:

यवतमाळमध्ये बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने तब्बल ९८ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. यात एकाच दिवसात तब्बल १३५ मिमी विक्रमी पावसाची नोंद होवून नदी, नाल्याला प्रचंड पूर आला. यासह जीवहाणीसह वित्त हानीसुध्दा झाली. तसेच २६ हजारावरील शेतपिकांना या अतिवृष्टीचा फटका बसला. अतिवृष्टीच्या दणक्याने एका दिवसात शेतीचे होत्याचे नव्हते केले. यावर्षीच्या हंगामात सुरूवातीपासूनच शेतकऱ्यांना प्रचंड फटका बसत आहे. आधीच १५ दिवस पेरण्या उशीरा झाल्या. त्यानंतर १२ ते १४ दिवस पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांनावर दुबार पेरणीचे संकट कोसळले. त्यानंतर बोगस बियाण्यातूनही अनेक शेतकऱ्यांच्या शेतात काहीच उगवले नाही. यातून उरले सुरले पीक आता या अतिवृष्टीने गारद केले.(फोटो सौजन्य – AI)

Yavatmal News: पीकविमा अर्जप्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव! परिसरातील शेतकरी संभ्रमात; नुकसानभरपाईबाबत अनिश्चितता

जिल्ह्यात मागील दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले असून प्राथमिक अहवालानुसार ४४७गावातील २३ हजार ९५२ शेतकरी बाधित झाले आहेत. एकूण २६ हजार ०८८.५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद प्रशासनाने केली असून पंचनाम्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील ९८ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून अनेक भागात नद्या नाले दुथडी भरून वाहिल्याने शेती पाण्याखाली गेली.

यवतमाळ तालुक्यासह अनेक भागात जोरदार पावसामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशी आणि तूर या प्रमुख खरीप पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. यात कापूस १४ हजार ९२३ हेक्टर, सोयाबीन ८ हजार १५ हेक्टर, तुर २ हजार ७९० तर भाजीपाला व फळपिकांना २ हजार २३८ हेक्टरवरील नुकसान झाले. यात सर्वाधिक फटका घाटंजी तालुकाला बसला असून तेथे तब्बल ७ हजार ६३५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक अहवालानुसार कपाशीचे सुमारे २ हजार ०२ हेक्टर, सोयाबीनचे १ हजार २६७ हेक्टर आणि तुरीचे ७४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. इतर पिकांनाही फटका बसल्याची नोंद करण्यात आली आहे. बेंबळा नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठच्या गावातील शेतजमिनी मोठ्या प्रमाणावर पाण्याखाली गेल्या.

Yavatmal News: दररोज होते ३६ हजार लिटर दुधाचे उत्पादन! सात टक्क्याने आवक घटली; खाजगी दूध विक्रेत्यांची संख्या मोठी

अनेक शेतांमध्ये अजूनही पाणी साचून असल्याने पिके कुजण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अतिवृष्टीने उभ्या पिकांवर पाणी फिरल्याने बळीराजाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आधीच उत्पादन खर्च वाढलेला असताना या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा आर्थिक अडचणींचे सावट निर्माण झाले आहे. प्रशासनाने नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेऊन मदत प्रक्रियेला गती देण्याचे काम सुरू केले आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Heavy rain batters 26 000 hectares of crops nearly 23 952 farmers affected as agricultural losses mount

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 10:52 AM

Topics:  

  • farmer
  • yavatmal latest news

संबंधित बातम्या

आदरणीय पी डी पाटील यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवले – बाळासाहेब पाटील
1

आदरणीय पी डी पाटील यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवले – बाळासाहेब पाटील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.