तासगाव शहरासह पुर्व भागात मुसळधार पाऊस ,मणेराजुरी मंडलात पावसाने दाणादाण ; ओढे – नाले वाहते
तासगाव शहर आणि तालुक्याच्या पुर्व भागाला मंगळवारी दुपारनंतर मुसळधार अशा पावसाने झोडपून काढले. सलग दोन ते अडीच तास पडलेल्या पावसामुळे पुर्व भागात ओढे - नाले वाहते झाले. मणेराजुरी गावासह परिसरामध्ये तुफान पाऊस पडला.सावळज, मांजर्डे, चिंचणी आणि येळावी या मंडलामध्येही दमदार पाऊस पडला.
तासगाव : तासगाव शहर आणि तालुक्याच्या पुर्व भागाला मंगळवारी दुपारनंतर मुसळधार अशा पावसाने झोडपून काढले. सलग दोन ते अडीच तास पडलेल्या पावसामुळे पुर्व भागात ओढे – नाले वाहते झाले. मणेराजुरी गावासह परिसरामध्ये तुफान पाऊस पडला.सावळज, मांजर्डे, चिंचणी आणि येळावी या मंडलामध्येही दमदार पाऊस पडला.
सोमवारी सकाळपासून हवेमध्ये प्रचंड उष्णता जाणवत होती. दुपार नंतर पावसाला सुरुवात झाली, कांही वेळात पावसाचा जोर वाढतच गेला. अर्ध्या तासात धुवांधार पाऊस सुरु झाला. जवळपास दोन – अडीच तास हा पाऊस सुरुच होता.तासगाव शहरासह मंडलातील सर्व गावात जोरदार पाऊस झाला. मणेराजुरी व मंडलातील सावर्डे, वाघापूर, योगेवाडी, उपळावी, वाघापूर, कौलगे, लोढे परिसरात जवळपास दीड ते दोन तास मुसळधार असा पाऊस झाला.
सावळज आणि मंडलातील, अंजनी, गव्हाण, नागेवाडी, वडगाव, डोंगरसोनी, सिध्देवाडी, दहिवडी, जरंडी, वायफळे, बिरणवाडी गावांत मुसळधार पाऊस पडला. येरळा काठावर निंबळक, चिखलगोठण, बोरगाव, लिंब, आळते, शिरगांव, विसापूर भागामध्ये चांगल्या पावसाने हजेरी लावली. मांजर्डे मंडलातील गावामध्येही मुसळधार अशा पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे पुर्व भागातील ओढे – नाले वाहते झाले आहेत. येरळा काठावर बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर चांगल्या पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी वर्गातून समाधान होत आहे.
Web Title: Heavy rain in eastern areas including tasgaon city scattered rain in manerajuri mandal streams flow nrab