Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरकारी कार्यालयात जाण्यापूर्वी ‘हे’ वाचाचं; नाहीतर…; आजपासून कारवाईला सुरुवात

शासकीय कार्यालयात दुचाकीने येणार्‍या कर्मचार्‍यांना आता हेल्मेट बंधनकारक असणार असून, याची अंमलबजावणी आजपासून केली जाणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 25, 2024 | 11:51 AM
सरकारी कार्यालयात जाण्यापूर्वी 'हे' वाचाचं; नाहीतर...; आजपासून कारवाईला सुरुवात

सरकारी कार्यालयात जाण्यापूर्वी 'हे' वाचाचं; नाहीतर...; आजपासून कारवाईला सुरुवात

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : शासकीय कार्यालयात दुचाकीने येणार्‍या कर्मचार्‍यांना आता हेल्मेट बंधनकारक असणार असून, याची अंमलबजावणी आजपासून केली जाणार असून, पुणे प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कारवाई करणार आहे. शहरातील विविध शासकीय कार्यालयाच्या बाहेर आरटीओची पथके तैनात असणार असून, कर्मचार्‍यांमध्ये हेल्मेटबाबत जनजागृती देखील केली जाणार आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांना आता हेल्मेट वापरावे बंधनकारक असणार आहे.

राज्यात रस्ते अपघातात मृत्यू होणार्‍यांत दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक आहे. त्यातही हेल्मेटअभावी डोक्याला गंभीर दुखापत होऊन दगावणार्‍यांची संख्या मोठी आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीने याबाबत चिंता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या सूचनेनासार राज्य परिवहन विभागाकडून हेल्मेट वापराबाबत वेळोवेळी जनजागृती केली जाते. पोलीस देखील मोठ्या प्रमाणात कारवाई करतात. मात्र, त्यानंतरही हेल्मेट वापरणार्‍यांची संख्या कमीच असते. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी शहरातील शासकीय कार्यालयात दुचाकीवरून येणार्‍या कर्मचार्‍यांना हेल्मेट बंधनकारक केले आहे. हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला होता. या निर्णयाची आता आरटीओकडून अंमलबजावणी केली जाणार आहे. आजपासून (दि.२५) शासकीय कार्यालयांच्या बाहेर हेल्मेट तपासणी केली जाणार आहे.

हे सुद्धा वाचा : काडादी, आडम यांच्यासह शेकडो उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; सोलापूर जिल्ह्यात 10 हजार ‘नोटा’ला मते

शहरातील विविध शासकीय कार्यालयाच्या बाहेर आरटीओची पथके तैनात असणार आहेत. दरम्यान, तत्कालीन परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दोन वर्षांपुर्वीच याबाबतचे परिपत्रक काढले होते. सरकारी कार्यालयात दुचाकीस्वार विनाहेल्मेट आल्यास कारवाई करावी आणि कार्यालयातील अधिकार्‍यांपासून सामान्य नागरिकांपर्यंत कोणालाही सवलत देऊ नये, असे यामध्ये म्हटले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नव्हती. अखेर आता आरटीओकडून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : पुण्यात मोठा दरोडा टाकण्याचा प्लॅन फसला; आरोपींना पोलिसांनी केली अटक

…तर दुचाकीस्वार नागरिकांवरही कारवाई

सरकारी कार्यालयात विनाहेल्मेट येणार्‍या दुचाकीस्वार कर्मचार्‍यांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात याबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. त्यानंतर विविध कामांसाठी सरकारी कार्यालयांत येणार्‍या इतर नागरिकांवरही कारवाई केली जाणार आहे.

विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशानूसार शहरातील विविध सरकारी कार्यालयांबाहेर हेल्मेट तपासणी मोहीम राबविली जाणार आहे. यासाठी आरटीओचे पथके तैनात केली जातील.

– स्वप्निल भोसले, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.

Web Title: Helmets will now be mandatory for employees coming to government offices on two wheelers nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2024 | 11:51 AM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित
1

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले
2

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
3

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
4

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.