Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दारूसाठी पैसे मागितले, नकार मिळताच चाकूने हल्ला; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून तिघांनी दोन सख्ख्या भावांना अडवून चाकूने हल्ला केला आहे. यात एक भाऊ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर घाटी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 10, 2026 | 11:44 AM
दारूसाठी पैसे मागितले, नकार मिळताच चाकूने हल्ला; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

दारूसाठी पैसे मागितले, नकार मिळताच चाकूने हल्ला; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

Follow Us
Follow Us:
  • दारूच्या पैशांवरून दोन सख्ख्या भावांवर चाकू हल्ला
  • एकावर घाटी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू
  • तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण होत आहे. अशातच आता दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून तिघांनी दोन सख्ख्या भावांना अडवून चाकूने हल्ला केला आहे. यात एक भाऊ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर घाटी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. ही घटना ६ नोव्हेंबर रोजी भीमराजनगर परिसरातील उद्धवराव पाटील शाळेच्या पाठीमागे घडली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

 

प्रविण अशोक खरात (रा. सावित्रीबाई फुलेनगर), वैभम रमेश खरात, सागर बाळू खरात (दोघे रा. भिमराजनगर) अशी चाकू हल्ला करणाऱ्यांची नावे असून त्यांच्याविरोधात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अभय बाळू नावकर (वय २१, रा. भिमराजनगर, हिमायतबाग) याने फिर्याद दिली.

अभय हा महानगरपालिकेच्या घनकचरा विभागात कामाला आहे. शुक्रवारी रात्री तो मोठा भाऊ आकाश याच्यासोबत शहरातून दिवाळीची खरेदी करून मोपेडने घरी परतत होता. उद्धवराव पाटील शाळेच्या पाठीमागे आले असता, ओळखीच्या प्रविण खरात याने आकाशला आवाज देऊन थांबवले. त्यावेळी वैभव आणि सागर हे दोघेही त्याच्यासोबत होते. प्रविणने आकाशकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. पैसे नसल्याचे सांगत आकाशने नकार दिल्यानंतर प्रविणने त्याचा मोबाइल मागितला.

हे सुद्धा वाचा  : धक्कादायक ! फटाके फोडण्यास रोखल्याने तरुणावर चाकूने हल्ला करून हत्या; वाढदिवस साजरा करण्यास एकत्र आले अन्…

मोबाइल देण्यास विरोध करताच तिघांनी तुला आता मारून टाकतो अशी धमकी देत चाकूने आकाशच्या पाठीवर, पोटावर, कमरेवर, डाव्या मांडीवर आणि उजव्या गुडघ्यावर वार केले. भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या अभयच्या डाव्या गुडघ्यावरही प्रविणने चाकूने वार केला. त्यानंतर तिघेही घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणात बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक राम यादव करित आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: चाकूने हल्ला का करण्यात आला?

    Ans: दारू पिण्यासाठी पैसे देण्यास आकाशने नकार दिला आणि मोबाइल देण्यासही विरोध केला. त्यामुळे तिघांनी त्याच्यावर चाकूने हल्ला केला.

  • Que: चाकू हल्ल्यात कोण जखमी झाले?

    Ans: या हल्ल्यात आकाश नावकर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर घाटी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. तसेच त्याचा भाऊ अभय याच्या डाव्या गुडघ्याला चाकूने दुखापत झाली.

  • Que: या प्रकरणात आरोपी कोण आहेत आणि कोणत्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला?

    Ans: प्रविण अशोक खरात, वैभव रमेश खरात आणि सागर बाळू खरात अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक राम यादव करीत आहेत.

Web Title: An incident has occurred in sambhajinagar where two brothers were attacked with a knife nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 11:44 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

Shrirampur Clash News: दिवाळीत फटाक्यांवरून तुफान राडा! दोन गटांत दगडफेक, लाकडी दांड्यांनी मारहाण अन् कार पेटवली…
1

Shrirampur Clash News: दिवाळीत फटाक्यांवरून तुफान राडा! दोन गटांत दगडफेक, लाकडी दांड्यांनी मारहाण अन् कार पेटवली…

मानसिक छळामुळे तरुणाने संपवले जीवन, पुण्यातील घटनेनं खळबळ; दोघींविरुद्ध गुन्हा दाखल
2

मानसिक छळामुळे तरुणाने संपवले जीवन, पुण्यातील घटनेनं खळबळ; दोघींविरुद्ध गुन्हा दाखल

बिल्डरच्या सांगण्यावरून नागरिकांना घर खाली करण्याच्या नोटिसा? KDMC सहाय्यक आयुक्त सुनील लोंढे यांच्यावर कारवाईची मागणी
3

बिल्डरच्या सांगण्यावरून नागरिकांना घर खाली करण्याच्या नोटिसा? KDMC सहाय्यक आयुक्त सुनील लोंढे यांच्यावर कारवाईची मागणी

ट्रकचालकाला बेदम मारहाण करून जीव घेतला; दोन आरोपींना न्यायालयाचा मोठा दणका
4

ट्रकचालकाला बेदम मारहाण करून जीव घेतला; दोन आरोपींना न्यायालयाचा मोठा दणका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.