Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यार्थ्यांची भरउन्हात परीक्षा! शिक्षण मंडळाने फेरविचार करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

विदर्भातील उच्चांकी तापमानाचा विचार करता एप्रिल महिन्यात होणा-या शालेय परीक्षांच्या वेळापत्रकाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली. शिक्षण मंडळाने फेरविचार करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश दिले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 08, 2025 | 04:26 PM
येत्या शैक्षणिक वर्षापासून नवे शैक्षणिक धोरण; आता 'या' चार टप्प्यांत होणार शिक्षण

येत्या शैक्षणिक वर्षापासून नवे शैक्षणिक धोरण; आता 'या' चार टप्प्यांत होणार शिक्षण

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : राज्यभरामध्ये उन्हाचा पारा चढला आहे. अवकाळी पावसानंतर आता वाढणाऱ्या गर्मीमुळे सर्वांच्या शरिराची अक्षरशः लाही लाही झाली आहे. भर उन्हाळ्यामध्ये विद्यार्थ्यांना देखील परिक्षाचा ताण सहन करावा लागणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना उन्हाच्या तडाख्यामध्ये परिक्षा द्यावी लागणार आहे. विदर्भातील उच्चांकी तापमानाचा विचार करता एप्रिल महिन्यात होणा-या शालेय परीक्षांच्या वेळापत्रकाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली. न्यायमूर्तीद्वय नितीन सांबरे आणि वृषाली जोशी यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाल्यानंतर शिक्षणाधिका-यांना निवेदन देण्याचे आदेश याचिकाकर्त्यांना दिले. तसेच निवेदनावर त्वरीत निर्णय घेण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले. शालेय शिक्षण विभागाच्या 27 फेब्रुवारी 2025 रोजीच्या परिपत्रकानुसार उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. भानसाद कुलकर्णी तर शिक्षण विभागाच्या वतीने अॅड. ऋषीकेश यांनी बाजू मांडली.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी, पुण्याच्या महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने शालेय परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. या परीपत्रकानसार, परीक्षा 25 एप्रिलपर्यंत संपवायच्या तसेच निकाल 1 मेपर्यंत जाहीर करायचा असल्याचे सांगण्यात आले. स्थानिक परिस्थिती वेगळी असेल तर शिक्षणाधिकारी संस्थेची परवानगी घेऊन वेळापत्रकात बदल करू शकतील, असेही नमूद करण्यात आले. काही पालकांनी उन्हाची तीव्रता लक्षात घेता वेळापत्रकात बदल करण्याची विनंती शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली, परंतु त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अखेर त्यांना उच्च न्यायालयात जावे लागल्याचे त्यांनी नमुद केले.

पाच दिवसांत निकाल कसा द्यायचा?

पुण्याच्या संस्थेने इयत्ता सहावी व सातवीच्या परीक्षा 19 ते 25 एप्रिलदरम्यान, पाचवीची परीक्षा 9 ते 25 एप्रिल, तिसरी व चौथीची परीक्षा 22 ते 25 एप्रिल, आणि पहिली व दुसरीची परीक्षा 23 ते 25 एप्रिलदरम्यान घेण्याचे आदेश काढले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, या सर्व परीक्षांचा निकाल अवघ्या पाच दिवसांत, म्हणजेच 1 मे रोजी लावावा लागणार आहे. ज्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या जास्त आहे, त्यांच्यासाठी हा कालावधी अत्यंत कमी आहे. 1 मे रोजी निकाल कसा जाहीर करायचा, असा प्रश्न सध्या शिक्षकांपुढे निर्माण झाला आहे. याबाबतही योग्य निर्णय घेण्याची विनंती न्यायालयाकडे करण्यात आली आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

उच्च न्यायालयाचे आदेश काय?

या याचिकेवर उच्च न्यायालयाने पहिल्याच सुनावणीत निर्णय दिला आहे. परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे शिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्याचे आदेश दिले. शिक्षणाधिकारी आपल्या अधिकारांनुसार नवीन वेळापत्रक तयार करून ते पुण्याच्या संस्थेला पाठवतील. तसेच, पुण्याच्या शिक्षण संस्थेलाही या प्रश्नावर त्वरित निर्णय घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे आता विद्यार्थ्यांना भर उन्हामध्ये परिक्षेला जावे लागणार की नाही याचा निकाल लवकरच हाती येणार आहे.

 

Web Title: High court orders education board to reconsider exams in the heat of summer for students

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 04:26 PM

Topics:  

  • Education Department
  • Nagpur Case
  • summer care tips

संबंधित बातम्या

अजब-गजब ! शिक्षण विभागातील तब्बल 45 फाईल्स झाल्या गायब; शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ
1

अजब-गजब ! शिक्षण विभागातील तब्बल 45 फाईल्स झाल्या गायब; शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ

शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना चौकशीनंतरच अटक; अधिकारी संघाचे आंदोलन अखेर स्थगित
2

शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना चौकशीनंतरच अटक; अधिकारी संघाचे आंदोलन अखेर स्थगित

पूर्ण गुण मिळूनही विद्यार्थी ‘नापास’; नागपूर विद्यापीठाच्या चुकीचा विद्यार्थ्याला फटका
3

पूर्ण गुण मिळूनही विद्यार्थी ‘नापास’; नागपूर विद्यापीठाच्या चुकीचा विद्यार्थ्याला फटका

गोंदियात पालिकेच्या शाळा पडल्या ओस; 14 शाळांमध्ये केवळ 695 विद्यार्थी
4

गोंदियात पालिकेच्या शाळा पडल्या ओस; 14 शाळांमध्ये केवळ 695 विद्यार्थी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.