पत्नीसमोरच पतीची हत्या; चाकूने पोटावर केले सपासप वार अन्... (फोटो - iStock)
वडगाव मावळ : मावळमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. मागील एकाच आठवड्यामध्ये दोन खून झाले होते. यानंतर आता प्रेमविवाहाच्या कारणावरुन तरुणावर प्राणघातक हल्ला केला आहे. यातील तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. मावळ तालुक्यातील सांगवी येथील प्रेमविवाहातून झालेल्या हल्ला प्रकरणातील तिन्ही आरोपींना सोमवारी अखेर अटक करण्यात आली. वडगाव मावळ पोलिसांनी ही कारवाई केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी याबाबत माहिती दिली.
सांगवी गावच्या हद्दीत अनुष्का हॉटेलजवळ ही धक्कादायक घटना घडली. 05 एप्रिल रोजी रात्री 08 वाजता ही घटमा घडली होती. प्रेमविवाह केलेल्या युवकावर त्याच्या पत्नीच्या नातेवाईकांनीच प्राणघातक हल्ला केला होता. संकेत मारुती तोडकर (वय वर्षे 29, रा. तोडकर आळी, सांगवी) हे आपल्या चुलत भावासह स्कुटीवर बसून गावातील यात्रेच्या वर्गणीचा हिशोब करत असताना, शिवराज बंडू जाधव या आरोपीने आपल्या बहिणीशी झालेल्या प्रेमविवाहाचा राग मनात धरून इतर दोन आरोपी यश अजय जाधव (वय वर्षे 22) आणि विशाल पाथरवट यांच्या मदतीने स्कुटीला मोटारसायकलने धडक दिली.
क्राईम न्यूज वाचण्यासाठी क्लिक करा
त्यानंतर तिघांनी मिळून कोयता, लोखंडी रॉडने संकेत तोडकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात संकेत यांच्या उजव्या हाताचा दंड, खांदा आणि डोक्यावर गंभीर मारहाण करण्यात आली होती. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणानंतर पोलीसांनी कडक कारवाई केली आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
घरगुती वादातून पुतण्याने केला चुलत्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. घरगुती वादातून पुतण्यासह एकाने चुलत्याच्या मानेवर कोयत्याने वार करून खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.4) घडली. दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास मावळ तालुक्यातील धामणे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ तालीम येथे घडली. शिरगाव परंदवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणामध्ये महादेव भगवान गराडे (वय 73 रा. धामणे ता.मावळ) असे खून झालेल्या चुलत्याचे नाव आहे. तर मंगेश किसन गराडे (वय 38 रा.धामणे मावळ) व एक अनोळखी असे खुनातील आरोपी आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महादेव गराडे व आरोपी मंगेश गराडे यांच्यात घरगुती वाद होते. त्यातून आरोपी मंगेश गराडे व त्याच्या एका साथीदाराने मयत महादेव गराडे यांच्या मानेवर कोयत्याने वार केले. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. खून केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. मावळ तालुक्यात चार दिवसात दुसरा खून झाला असून नात्यातील व्यक्तीचा खून होत असल्याने दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे.