Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नितेश राणेंना १२ जानेवारीपर्यंत उच्च न्यायालयाचा दिलासा, कठोर कारवाई न करण्याची सरकारकची हमी कायम

शिवसेना पदाधिकारी संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी राणेंकडून उच्च न्यायालयात मुदतवाढ मागण्यात आली. हि मुदतवाढ मान्य होईपर्यंत त्यांच्याविरोधात कोणतीही कठोर कारवाई करणार नसल्याची राज्य सरकारकडून हमी कायम ठेवण्यात आली.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 07, 2022 | 07:14 PM
नितेश राणेंना १२ जानेवारीपर्यंत उच्च न्यायालयाचा दिलासा, कठोर कारवाई न करण्याची सरकारकची हमी कायम
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : शिवसेनचे संतोश परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटकेची टांगती तलवार असलेले आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना १२ जानेवरीपर्यंत दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारकडून दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करण्यासाठी राणेंकडून उच्च न्यायालयात मुदतवाढ मागण्यात आली. ती मुदतवाढ मान्य होईपर्यंत त्यांच्याविरोधात कोणतीही कठोर कारवाई करणार नसल्याची राज्य सरकारकडून हमी कायम ठेवण्यात आली.

शिवसेना पदाधिकारी संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना कणकवली येथील सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिल्यानंतर नितेश राणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विधिमंडळाबाहेर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची खिल्ली उडवल्याने आणि सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहभागी होण्यापासून रोखण्याच्या हेतूने आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप राणे यांनी याचिकेत केला असून आपल्याला खोटया प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावाही यांनी याचिकेत केला आहे. नितेश राणे यांना चुकीच्या पद्धतीने या प्रकरणात गोवण्यात आले आहे. राणे आणि गोट्या सावंत यांना नोटीस बजावण्यात आल्यानंतर त्यांची पोलीस ठाण्यात ३ ते ४ तास चौकशी करण्यात आली. राणे तपासात सहकार्य करत आहेत. जेव्हा जबाब नोंदविण्यासाठी बोलवण्यात तेव्हा ते हजर होते. त्यामुळे राणे यांना कठोर कारवाईपासून संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी अॅड. नितीन प्रधान यांनी केली आहे.

या हल्ल्यात राणे मुख्य सुत्रधार आहेत. ते प्रभावशाली व्यक्ति असल्यामुळे इतर साक्षीदारांच्या जबाबांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे यासंदर्भात सविस्तर प्रतिज्ञापत्रावर भूमिका मांडण्याची संधी पोलिसांच्या वतीने मागण्यात आली होती. त्यानुसार शुक्रवारी न्या. सी. व्ही. भडंग यांच्यासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली. तेव्हा, सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर केल्याची माहिती विशेष सरकारी वकिलांकडून देण्यात आली. त्या प्रतिज्ञापत्रावर प्रत्यूत्तर दाखल करण्यासाठी राणे यांच्याकडून मुदतवाढ मागण्यात आली. ती मुदतवाढ मान्य होईपर्यंत राणेंविरोधात कोणतीही कठोर कारवाई करणार नसल्याची राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलेली हमी कायम ठेवत न्यायालयाने सुनावणी १२ जानेवारीपर्यत तहकूब केली.

Web Title: High court reassures nitesh rane till january twelve government assuranced not to take drastic action nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2022 | 07:09 PM

Topics:  

  • Nitesh Rane
  • Santosh Parab

संबंधित बातम्या

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी सुटणार ‘या’ दोन खास ट्रेन, राणे कुटुंबाचा पुढाकार
1

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी सुटणार ‘या’ दोन खास ट्रेन, राणे कुटुंबाचा पुढाकार

Nitesh Rane: “राज्यातील मत्स्योत्पादन वाढीसाठी…”; मंत्री नितेश राणेंचे निर्देश
2

Nitesh Rane: “राज्यातील मत्स्योत्पादन वाढीसाठी…”; मंत्री नितेश राणेंचे निर्देश

स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून याला राहुल गांधी म्हणतात – नितेश राणे
3

स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून याला राहुल गांधी म्हणतात – नितेश राणे

CM Fadnavis on Malegaon blast :दहशतवाद भगवा कधीच नव्हता…; मालेगाव बॉम्बस्फोट निकालावर मुख्यमंत्री फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया
4

CM Fadnavis on Malegaon blast :दहशतवाद भगवा कधीच नव्हता…; मालेगाव बॉम्बस्फोट निकालावर मुख्यमंत्री फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.