Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sindhudurga News: जानेवारी अखेरपर्यंत विकास कामे पूर्ण करा: नितेश राणेंचे निर्देश

सर्व यंत्रणांनी घेतलेली कामे गुणवत्तेसह वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणाची असल्याने सर्वांनी जबाबदारीणे काम करावे, असे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 30, 2025 | 02:19 PM
Sindhudurga News: जानेवारी अखेरपर्यंत विकास कामे पूर्ण करा: नितेश राणेंचे निर्देश
Follow Us
Close
Follow Us:

जिल्हा परिषदेच्या विविध विकासकामांचा आढावा
दर्जात्मक बाबींमध्ये कुठलीही तडजोड नको
कामात हलगर्जीपणा केल्यास कारवाई

सिंधुदुर्गनगरी: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परिषदेला मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकास कामे व प्रकल्पांची कालबध्द नियोजनातून अंमलबजावणी करावी. जिल्हा परीषदेने आराखड्यात घेतलेली विकास कामे जानेवारी अखेरपर्यंत गुणवत्तेसह पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री नीतेश राणे यांनी दिले, पालकमंत्री नीतेश राणे यांनी जिल्हा परीषदेच्या विविध विकास कामांचा आढावा घेतला.

दर्जात्मक बाबींमध्ये कुठलीही तडजोड नको
पालकमंत्री नीतेश राणे पुढे म्हणाले की, सर्व यंत्रणांनी घेतलेली कामे गुणवत्तेसह वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणाची असल्याने सर्वांनी जबाबदारीणे काम करावे. प्रत्येक काम है दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असावे. जिल्ह्यातील विविध यंत्रणांनी शाश्वत गुणवत्तापूर्ण कामाची आखणी करताना दर्जात्मक बाबींमध्ये कुठलीही तडजोड करू नये. तसेब जिल्हा परीषदेला विकासात्मक कामासाठी दिलेला निधी वेळेत खर्च करावा. कोणत्याही विभागाचा निधी अखर्चित राहणार नाही तसेच निधी समर्पित होणार नाही याची दक्षता विभाग प्रमुखांनी घ्यावी, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

अधिकाऱ्यांची उपस्थिती

यावेळेस जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पुंड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री परब, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सई धुरी, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, तसेच जिल्हा परीषदेच्या विविध त्रणाचे अधिकारी उपस्थित होते.

काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने करा

रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात व्हावी यासाठी संबधित  विभागांनी आवश्यक प्रक्रिया गतीने कराव्यात, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी जयगड, रत्नागिरी बंदरातून काजू निर्यात संदर्भातील आढावा बैठकीत दिल्या. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीस मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप लाड यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक प्रक्रिया गतीने करा! मंत्री नितेश राणे यांच्या सूचना

मंत्री. राणे म्हणाले की, जयगड  बंदरातून मोठ्या प्रमाणात काजू निर्यात झाल्यास त्याचा फायदा काजू उत्पादकांना होईल. या बंदरातून काजू निर्यातीसाठी आवश्यक असलेले परवाने तातडीने मिळावेत यासाठीही संबंधित विभागाने कार्यवाही करावी. या आढावा बैठकीत पणन मंडळ, स्मार्ट व मॅग्नेट, एफएसएसआय, रेल्वे या विभागाकडील कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Nitesh rane instructs that development works be completed by the end of january

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 02:17 PM

Topics:  

  • Nitesh Rane
  • Sindhudurg
  • Sindhudurg News

संबंधित बातम्या

Sindhudurg : नववर्षाच्या जल्लोषासाठी भोगवे हाऊसफुल्ल!
1

Sindhudurg : नववर्षाच्या जल्लोषासाठी भोगवे हाऊसफुल्ल!

Sindhudurg : नववर्षाच्या जल्लोषासाठी भोगवे हाऊसफुल्ल!
2

Sindhudurg : नववर्षाच्या जल्लोषासाठी भोगवे हाऊसफुल्ल!

Sindhudurg News : आंबा काजू पिकाची दरवर्षी E KYC चीअडसरच; बागायती शेतकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी
3

Sindhudurg News : आंबा काजू पिकाची दरवर्षी E KYC चीअडसरच; बागायती शेतकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.