Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Metro line 3: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो कधी सुरू होणार? उद्घाटनाचा पुन्हा नवा मुहूर्त

Pune Metro Line 3: गणेशखिंड रस्त्यावरील कामांना झालेल्या विलंबामुळे संपूर्ण प्रकल्पाच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. दरम्यान, या मार्गावरील सर्व स्थानकांवर पूर्ण क्षमतेने मेट्रो सेवा सुरू होण्यासाठी पुढील वर्षीच्या मार्चपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 16, 2026 | 02:16 PM
Pune Metro, Hinjewadi Shivajinagar Metro, Pune Metro News

Pune Metro, Hinjewadi Shivajinagar Metro, Pune Metro News

Follow Us
Follow Us:
  • हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटनासाठी पुन्हा एकदा नवा मुहूर्त
  • हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कला पुण्याच्या मध्यवर्ती भाग असलेल्या शिवाजीनगरला जोडणारी तिसरी मेट्रो मार्गिका
  • हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाला मुदतीपेक्षा वर्षभराहून अधिक विलंब झाल्याने प्रकल्पाच्या खर्चात सुमारे २० टक्क्यांनी वाढ
Pune Metro line 3 : पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांसासाठी एक दिलासादायक बातमी आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या बहुप्रतीक्षित मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटनासाठी पुन्हा एकदा नवा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. नियोजनानुसार, ही मेट्रो सेवा जुलैअखेरीस किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. ही सेवा सुरू झाल्यानंतर हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या हजारो आयटी कर्मचाऱ्यांसह लाखो प्रवाशांचा प्रवास अधिक जलद आणि सुकर होणार आहे.

वारंवार पुढे ढकलले गेले उद्घाटन

हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कला पुण्याच्या मध्यवर्ती भाग असलेल्या शिवाजीनगरला जोडणारी तिसरी मेट्रो मार्गिका आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) आणि पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (PITCMRL) यांच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

दिंड्यांना 2 कोटी 80 लाखांचे अनुदान मंजूर, थेट खात्यात वाटप सुरू; प्रत्येक दिंडीला मिळणार तब्बल…

ही सेवा मूळतः मार्च २०२५ मध्ये सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, विविध कामे अपूर्ण राहिल्यामुळे उद्घाटन वारंवार पुढे ढकलावे लागले. त्यानंतर अनेक वेळा नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या, मात्र प्रत्यक्षात सेवा सुरू होऊ शकली नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मार्च महिन्यात पुण्यातील एका कार्यक्रमात पहिला टप्पा मेमध्ये आणि दुसरा टप्पा जुलैमध्ये सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तेही वेळेत पूर्ण होऊ शकले नाही.

Mumbai crime: ‘डोळे बंद कर, सरप्राइज आहे’… पुढच्याच क्षणी गळा चिरला; ‘क्राइम पेट्रोल’ पाहून रचला हत्ये

प्रकल्प खर्चात २० टक्क्यांनी वाढ

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाला मुदतीपेक्षा वर्षभराहून अधिक विलंब झाल्याने प्रकल्पाच्या खर्चात सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाढीव खर्चाचा भार पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (PITCMRL) उचलणार असल्याची माहिती आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, गणेशखिंड रस्त्यावरील कामांना झालेल्या विलंबामुळे संपूर्ण प्रकल्पाच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. दरम्यान, या मार्गावरील सर्व स्थानकांवर पूर्ण क्षमतेने मेट्रो सेवा सुरू होण्यासाठी पुढील वर्षीच्या मार्चपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते.

 

मेट्रो उद्घाटनाचे बदललेले मुहूर्त

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या उद्घाटनासाठी आतापर्यंत अनेक वेळा तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

– मार्च २०२५
– सप्टेंबर २०२५
– डिसेंबर २०२५
– मार्च २०२६
– मे २०२६
– १५ जून २०२६
– १५ जुलै २०२६
– आता जुलैअखेरीस किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सेवा सुरू होण्याचे नियोजन

मेट्रो सेवा प्रत्यक्षात कधी सुरू होते, याकडे आता पुणेकर आणि विशेषतः हिंजवडी आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 

 

 

Web Title: Hinjawadi shivajinagar metro line 3 inauguration july august pmrda pitcmrl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 02:16 PM

Topics:  

  • Pune Metro

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.