
Historical Bandra Fort Alcohol Party Shiv Sena Thackeray Group Akhil Chitre Aggressive
अखिल चित्रे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी व्हिडिओ शेअर करत लिहिल आहे की, महाराष्ट्रातील किल्ल्यांवर हे काय सुरु आहे? पोर्तुगीजांनी बांधलेल्या व नंतर ब्रिटिश आणि मराठा अशा साम्राज्यांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या हेरिटेज वास्तू असलेल्या वांद्रे किल्ल्यावर दारूची पार्टी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचं राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि महापालिका परवानगी देतंच कसं? आणि किल्ल्यावरील ह्या दारू पार्टीसाठी संयोजक कोण तर ‘महाराष्ट्र पर्यटन’ विभाग ? नक्की काय सुरु आहे ? कुठे आहेत स्थानिक आमदार आणि महाराष्ट्राचे so called ‘सांस्कृतिक मंत्री’ आशिष कुरेशी? असा प्रश्न अखिल चित्रे यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्रातील किल्ल्यांवर हे काय सुरु आहे? पोर्तुगीजांनी बांधलेल्या व नंतर ब्रिटिश आणि मराठा अशा साम्राज्यांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या हेरिटेज वास्तू असलेल्या वांद्रे किल्ल्यावर दारूची पार्टी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचं राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि @mybmc @mybmcWardHW… pic.twitter.com/pV1Urn0C6b — Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) November 16, 2025
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सुरुवात राजधानी मुंबईतील उपेक्षित किल्ल्यांपासून करायची आणि बोभाटा झाला नाही तर ह्याच दारू पार्ट्यांचे उपद्व्याप महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांवर करायचे… हेच भाजपा आणि त्यांच्या नोकरपक्षांचं ढोंगी हिंदुत्व अन् लबाड संस्कृती, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी लगावला आहे. हा व्हिडिओ स्थानिक रहिवाशांनी, रविवारी रात्री उशिरा, १६ नोव्हेंबरच्या मध्यरात्री काढलेला आहे. असे देखील अखिल चित्रे यांनी सांगितले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा